Vivo T2X 5G - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Tue, 11 Apr 2023 08:23:12 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 50MP कॅमेरा आणि 8GB RAM सह Vivo T2x आला भारतात; मीडियाटेक प्रोसेसरसह घेतली एंट्री https://www.91mobiles.com/marathi/50mp-rear-camera-5000mah-battery-and-fast-charging-phone-vivo-t2x-launched/ https://www.91mobiles.com/marathi/50mp-rear-camera-5000mah-battery-and-fast-charging-phone-vivo-t2x-launched/#respond Tue, 11 Apr 2023 08:22:50 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=20194 Vivo नं भारतीय बाजारात आपल्या ‘टी’ सीरीजचा विस्तार करत दोन नवीन मोबाइल फोन Vivo T2x 5G आणि Vivo T2x 5G लाँच केले आहेत. यातील एक्स मॉडेलमध्ये 50MP Camera, 8GB RAM आणि MediaTek Dimensity 6020 चिपसेट असे स्पेसिफिकेशन्स देण्यात आले आहेत. चला जाणून घेऊया या स्मार्टफोनची किंमत, स्पेसिफिकेशन्स व फीचर्सची माहिती. विवो टी2एक्स 5जीचे स्पेसिफिकेशन्स 6.58″ […]

The post 50MP कॅमेरा आणि 8GB RAM सह Vivo T2x आला भारतात; मीडियाटेक प्रोसेसरसह घेतली एंट्री first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Highlights

  • Vivo T2x 5G भारतात लाँच झाला आहे.
  • हा विवो फोन MediaTek Dimensity 6020 प्रोसेसरवर चालतो.
  • या मोबाइलमध्ये 50MP Rear आणि 8MP Selfie कॅमेरा आहे.

Vivo नं भारतीय बाजारात आपल्या ‘टी’ सीरीजचा विस्तार करत दोन नवीन मोबाइल फोन Vivo T2x 5G आणि Vivo T2x 5G लाँच केले आहेत. यातील एक्स मॉडेलमध्ये 50MP Camera, 8GB RAM आणि MediaTek Dimensity 6020 चिपसेट असे स्पेसिफिकेशन्स देण्यात आले आहेत. चला जाणून घेऊया या स्मार्टफोनची किंमत, स्पेसिफिकेशन्स व फीचर्सची माहिती.

विवो टी2एक्स 5जीचे स्पेसिफिकेशन्स

  • 6.58″ FHD+ IPS LCD display
  • 50MP Dual rear camera
  • 8GB RAM
  • MediaTek Dimensity 6020
  • 5,000mAh battery

विवो टी2एक्स 5जी फोनमध्ये 2400 x 1080 पिक्सल रिजोल्यूशन असलेला 6.58 इंचाचा फुलएचडी+ डिस्प्ले देण्यात आला आहे. वॉटरड्रॉप नॉच स्टाईल असेलली ही स्क्रीन आयपीएस एलसीडी पॅनलवर बनली आहे. प्रोसेसिंगसाठी या मोबाइल फोनमध्ये मीडियाटेक डिमेनसिटी 6020 ऑक्टाकोर प्रोसेसर देण्यात आला आहे.

फोटोग्राफीसाठी हा फोन ड्युअल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. याच्या बॅक पॅनलवर असलेला 50 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर देण्यात आला आहे जो 2 मेगापिक्सलच्या सेन्सरसह येतो. तसेच सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी या फोनमध्ये 8 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.

Vivo T2x 5G फोन अँड्रॉइड 13 ओएसवर लाँच झाला आहे जोडीला फनटच ओएसची लेयर मिळते. फोनमध्ये कनेक्टिव्हिटीसाठी 5G, 4G, WiFi, Bluetooth आणि USB-C port मिळतो. विवोनं आपला नवीन मोबाइल फोन 5,000एमएएचच्या बॅटरीसह बाजारात आणला आहे, जी 18W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.

विवो टी2एक्स 5जी ची किंमत

Vivo T2x 5G स्मार्टफोनचे तीन मेमरी व्हेरिएंट्स भारतात आले आहेत. तिन्हीमध्ये 128 जीबी स्टोरेज देण्यात आली आहे. या फोनच्या 4जीबी रॅम मॉडेलची किंमत 12,999 रुपये आहे, 6जीबी रॅमसाठी 13,999 मोजावे लागतील. 8जीबी रॅम असलेला सर्वात मोठा व्हेरिएंट 15,999 रुपयांमध्ये विकला जाईल. या फोनची विक्री 21 एप्रिलपासून ईकॉमर्स प्लॅटफॉर्म फ्लिपकार्टच्या माध्यमातून केली जाईल. हा फोन Marine Blue, Aurora Gold आणि Glimmer Black कलरमध्ये विकत घेता येईल.

The post 50MP कॅमेरा आणि 8GB RAM सह Vivo T2x आला भारतात; मीडियाटेक प्रोसेसरसह घेतली एंट्री first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/50mp-rear-camera-5000mah-battery-and-fast-charging-phone-vivo-t2x-launched/feed/ 0
विवो घेऊन येत आहे दोन नवीन 5जी फोन; Vivo T2 आणि T2x 5G होतील 11 एप्रिलला भारतात लाँच https://www.91mobiles.com/marathi/11-april-vivo-t2-5g-t2x-5g-phone-launch-date-in-india/ https://www.91mobiles.com/marathi/11-april-vivo-t2-5g-t2x-5g-phone-launch-date-in-india/#respond Thu, 06 Apr 2023 04:09:20 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=20059 विवो भारतीय बाजारात दोन नवीन 5जी फोन घेऊन येत आहे. कंपनीनं घोषणा केली आहे की येत्या 11 एप्रिलला भारतात Vivo T2 Series लाँच होईल आणि टी2 5जी तथा टी2एक्स 5जी फोन बाजारात येतील. या सीरीजचं प्रोडक्ट पेज ई-कॉमर्स साइट फ्लिपकार्टवर लाइव्ह करण्यात आलं आहे जिथे इंडिया लाँचपूर्वीच Vivo T2 आणि T2x 5G फोनचे महत्वाचे स्पेसिफिकेशन्स […]

The post विवो घेऊन येत आहे दोन नवीन 5जी फोन; Vivo T2 आणि T2x 5G होतील 11 एप्रिलला भारतात लाँच first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Highlights

  • Vivo T2 Series 11 एप्रिलला भारतात लाँच होईल.
  • सीरीजमध्ये T2 5G आणि T2x 5G फोनचा समावेश करण्यात येईल.
  • विवो टी2 सीरीजची विक्री फ्लिपकार्टवरून केली जाईल.

विवो भारतीय बाजारात दोन नवीन 5जी फोन घेऊन येत आहे. कंपनीनं घोषणा केली आहे की येत्या 11 एप्रिलला भारतात Vivo T2 Series लाँच होईल आणि टी2 5जी तथा टी2एक्स 5जी फोन बाजारात येतील. या सीरीजचं प्रोडक्ट पेज ई-कॉमर्स साइट फ्लिपकार्टवर लाइव्ह करण्यात आलं आहे जिथे इंडिया लाँचपूर्वीच Vivo T2 आणि T2x 5G फोनचे महत्वाचे स्पेसिफिकेशन्स समोर ठेवण्यात आले आहेत.

विवो टी2 सीरीज इंडिया लाँचची माहिती

कंपनीनं अधिकृत घोषणा करून सांगितलं आहे की येत्या 11 एप्रिलला Vivo T2 5G आणि Vivo T2x 5G भारतात लाँच होतील. कंपनी व्हर्च्युअल इव्हेंटच्या माध्यमातून आपले नवीन फोन्स भारतीय बाजारात आणेल जो 11 एप्रिलला दुपारी 12 वाजता सुरु होईल. हा लाँच इव्हेंट कंपनीच्या अधिकृत वेबसाइट व विवो इंडिया सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर लाइव्ह स्ट्रीम होईल. फ्लिपकार्टवर Vivo T2 Series प्रोडक्ट पेज लाइव्ह झालं आहे तसेच दोन्ही 5जी फोन्सची विक्री याच शॉपिंग साइटवर होईल. हे देखील वाचा: iQOO Neo 6 च्या किंमतीत 5,000 रुपयांची मोठी कपात; जाणून घ्या नवी प्राइस

विवो टी2 सीरीजचे स्पेसिफिकेशन्स

लाँच डेटची माहिती देण्यासोबतच कंपनीनं सांगितलं आहे की या सीरीजमध्ये अ‍ॅमोलेड डिस्प्ले मिळेल. फोन स्क्रीन वॉटरड्रॉप नॉच स्टाईलसह येईल जी फुलएचडी+ रिजोल्यूशनवर चालेल. तसेच विवो टी2 सीरीज स्मार्टफोनवर 1300निट्स ब्राइटनेस, 6000000:1 कॉन्ट्रास्ट रेशियो तसेच 360हर्ट्ज टच सॅम्पलिंग रेट सारखे फीचर्स देखील दिले जातील.

फोटोग्राफीसाठी Vivo T2 Series मध्ये ड्युअल रियर कॅमेरा दिला जाईल. यात 50 मेगापिक्सलच्या प्रायमरी सेन्सरचा समावेश असू शकतो. लीकमध्ये समोर आलेली माहिती पाहता या सीरीजच्या मोबाइल फोनमध्ये क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 695 चिपसेट मिळू शकतो. तसेच फोन्समध्ये 8जीबी पर्यंतचा रॅम आणि 128जीबी पर्यंतची स्टोरेज दिली जाऊ शकते. हे देखील वाचा: शाओमीचा सर्वात शक्तिशाली स्मार्टफोन लाँचच्या उंबरठ्यावर; Xiaomi 13 Ultra ला मिळालं IMDA सर्टिफिकेट

बाजारातील Vivo T Series चे फोन्स

विवो टी2 5जी आणि टी2एक्स 5जी फोनच्या फुल स्पेसिफिकेशन्स आणि किंमतची माहिती 11 एप्रिलला समोर येईल. या सीरीज अंतगर्त कंपनीनं भारतात चार मोबाइल फोन लाँच केले आहेत ज्यात Vivo T1 Pro 5G, Vivo T1x, Vivo T1 5G आणि Vivo T1 4G चा समावेश आहे. यांची किंमत 11,999 रुपयांपासून सुरु होऊन 23,999 रुपयांपर्यंत जाते.

The post विवो घेऊन येत आहे दोन नवीन 5जी फोन; Vivo T2 आणि T2x 5G होतील 11 एप्रिलला भारतात लाँच first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/11-april-vivo-t2-5g-t2x-5g-phone-launch-date-in-india/feed/ 0