iQOO Neo 6 च्या किंमतीत 5,000 रुपयांची मोठी कपात; जाणून घ्या नवी प्राइस

Highlights

  • iQOO Neo 6 च्या किंमतीत 5000 रुपयांची कपात करण्यात आली आहे.
  • आता 24,999 रुपयांमध्ये 8GB/128GB मॉडेल आणि 29,999 रुपयांमध्ये 12GB/256GB मॉडेल मिळेल.
  • नवीन किंमत आयकू आणि अ‍ॅमेझॉनच्या वेबसाइटवर लागू झाली आहे.

चिनी स्मार्टफोन निर्माता ब्रँड आयकूनं काही दिवसांपूर्वी आपला नवीन फोन iQOO Neo 7 भारतात लाँच केला होता. आणि आता लागेचच कंपनीनं आपल्या जुन्या iQOO Neo 6 स्मार्टफोनची किंमत भारतात 5,000 रुपयांनी कमी केली आहे. त्यामुळे आता फोनचा बेस व्हेरिएंट 24,999 रुपयांमध्ये घरी घेऊन येत येईल. कंपनीनं ही कपात स्टॉक संपवण्यासाठी केली असली तरी या प्राइस रेंजमध्ये अजूनही iQOO Neo 6 एक चांगला पर्याय म्हणता येईल. हा फोन मे 2021 मध्ये लाँच करण्यात आला होता आणि याचे रिव्युज चांगले आहेत. चला जाणून घेऊया iQOO Neo 6 ची नवी किंमत.

आयकू नियो 6 ची नवीन किंमत

iQOO Neo 6 जेव्हा लाँच झाला होता तेव्हा 29,999 रुपयांमध्ये 8GB/128GB मॉडेल आणि 33,999 रुपयांमध्ये 12GB/256GB व्हर्जन सादर करण्यात आला होता. आता कपातीनंतर हे मॉडेल्स अनुक्रमे 24,999 रुपये आणि 29,999 रुपयांमध्ये उपलब्ध झाले आहेत. ही नवीन किंमत अ‍ॅमेझॉन आणि आयकूच्या वेबसाइटवर लागू झाली आहे. तसेच हा फोन नो-कॉस्ट ईएमआयवर देखील विकत घेता येईल. iQOO Neo 6 स्मार्टफोन भारतात डार्क नोवा, सायबर रेज आणि मॅव्हरीक ऑरेंज कलरमध्ये उपलब्ध झाला आहे. हे देखील वाचा: OnePlus Nord CE 3 Lite 5G झाला भारतात लाँच; फोनमध्ये 108MP कॅमेऱ्यासह 16GB रॅम

आयकू नियो 6 चे स्पेसिफिकेशन्स

  • 6.62″ FHD AMOLED Display
  • Snapdragon 870 SoC
  • 64MP Triple rear camera
  • 80W, 4700mAh Battery

iQOO Neo 6 स्मार्टफोनमध्ये 6.62-इंचाचा फुलएचडी+ ई4 अ‍ॅमोलेड डिस्प्ले देण्यात आला आहे. जो 120हर्ट्झ रिफ्रेश रेट, एचडीआर10+, 1,300 निट्झ ब्राइटनेस आणि मध्यभागी पंचकट होलला सपोर्ट करतो. प्रोसेसिंगसाठी कंपनीनं यात क्वॉलकॉमच्या स्नॅपड्रॅगन 870 चिपसेटचा वापर करण्यात आला आहे, जोडीला ग्राफिक्ससाठी एड्रेनो 650 जीपीयू देण्यात आला आहे.

फोटोग्राफीसाठी आयकू नियो 6 मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. यात 64 मेगापिक्सलचा सॅमसंग जीडब्लू1पी सेन्सर मुख्य कॅमेरा म्हणून देण्यात आला आहे, जो ओआयएस आणि एफ 1.89 अपर्चरसह येतो. जोडीला 8 मेगापिक्सलची लेन्स आणि 2 मेगापिक्सलची मॅक्रो लेन्स आहे. तर सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी कंपनीनं 16 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा दिला आहे. हे देखील वाचा: 60MP Selfie कॅमेऱ्यासह Motorola Edge 40 Pro ग्लोबली लाँच; क्वॉलकॉमच्या सर्वात शक्तिशाली प्रोसेसरची ताकदही यात

आयकू नियो 6 स्मार्टफोन अँड्रॉइड 12 आधारित फनटच ओएसवर चालतो. पावर बॅकअपसाठी या फोनमध्ये 4,700एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे, जी 80वॉट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. त्याचबरोबर या डिवाइसमध्ये लिक्विड कुलिंग, स्टिरियो स्पिकर्स, सिक्योरिटीसाठी इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर आणि हाय-फाय ऑडिओ असे फीचर्स देखील मिळतात.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here