शाओमीचा सर्वात शक्तिशाली स्मार्टफोन लाँचच्या उंबरठ्यावर; Xiaomi 13 Ultra ला मिळालं IMDA सर्टिफिकेट

Highlights

  • Xiaomi 13 Ultra स्मार्टफोन सिंगापूरच्या IMDA सर्टिफिकेशन वेबसाइटवर दिसला आहे.
  • Xiaomi 13 Ultra फोन पुढील काही महिन्यांमध्ये लाँच होणे अपेक्षित आहे.
  • फोनमध्ये क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 8 जेन 2 चिपसेट दिला जाऊ शकतो.

शाओमी 13 सीरिज अधिकृतपणे लाँच केल्यानंतर आता कंपनीनं आगामी महिन्यांमध्ये Xiaomi 13 Ultra सादर करण्याची योजना बनवत आहे. कंपनीनं अद्याप अचूक अशी लाँच डेट सांगितली नाही. परंतु आता शाओमी 13 अल्ट्रा स्मार्टफोन सिंगापूरच्या IMDA सर्टिफिकेशन वेबसाइटवर दिसल्यामुळे लवकरच हा फोन बाजारात येणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. याआधी आलेल्या रिपोर्ट्सनुसार हा फोन यंदा मे किंवा जूनमध्ये ग्राहकांच्या भेटीला येऊ शकतो. हा फोन क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 8 जेन 2 प्रोसेसरसह येणारा सर्वात शक्तिशाली स्मार्टफोन असू शकतो.

शाओमी 13 अल्ट्रा दिसला सिंगापूरच्या वेबसाइटवर

आगामी Xiaomi 13 Ultra स्मार्टफोन सिंगापूरच्या सर्टिफिकेशन साइट IMDA वर दिसला आहे. इथे हा फोन 2304FPN6DG या मॉडेल नंबरसह लिस्ट करण्यात आला आहे. त्यामुळे या फोनमध्ये 5जी, ब्लूटूथ, वाय-फाय आणि एनएफसी सपोर्ट असेल हे स्पष्ट झालं आहे. हे देखील वाचा: 60MP Selfie कॅमेऱ्यासह Motorola Edge 40 Pro ग्लोबली लाँच; क्वॉलकॉमच्या सर्वात शक्तिशाली प्रोसेसरची ताकदही यात

शाओमी 13 अल्ट्राचे स्पेसिफिकेशन्स (अपेक्षित)

अपकमिंग Xiaomi 13 Ultra स्मार्टफोनमध्ये 6.7 इंचाचा क्यूएचडी+ अ‍ॅमोलेड एलटीपीओ डिस्प्ले असण्याची शक्यता आहे, जो 120हर्ट्झ रिफ्रेश रेटला सपोर्ट करू शकतो. या फोनमध्ये लाइका ब्रँडिंगसह क्वॉड कॅमेरा सेटअप मिळण्याची शक्यता आहे. या कॅमेरा सेटअपमध्ये 50 मेगापिक्सलचा मुख्य कॅमेरा, 50 मेगापिक्सलची अल्ट्रा वाइड अँगल लेन्स आणि दोन 50 मेगापिक्सलचे टेलीफोटो कॅमेरा मिळू शकतात. तर फ्रंटला कंपनी 32 मेगापिक्सलच्या सेल्फी शुटरचा वापर करू शकते.

Xiaomi 13 Ultra मध्ये क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 8 जेन 2 चिपसेटची पावर मिळू शकते. जोडीला कंपनी 16जीबी रॅम आणि 512जीबी स्टोरेज देऊ शकते. हा फोन 1टीबी स्टोरेज ऑप्शनसह देखील सादर केला जाऊ शकतो, अशी चर्चा आहे परंतु ठोस माहिती मिळाली नाही. फोनमध्ये 4,900एमएएचची बॅटरी दिली जाऊ शकते, जी 90W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करू शकते. हा फोन अँड्रॉइड 13 आधारित मीयुआय 14 वर चालू शकतो. हे देखील वाचा: iQOO Neo 6 च्या किंमतीत 5,000 रुपयांची मोठी कपात; जाणून घ्या नवी प्राइस

याआधी फेब्रुवारीमध्ये कंपनीनं आपला Xiaomi 13 Pro स्मार्टफोन क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 8 जेन 2 चिपसेटसह सादर केला होता. यात देखील लाइकाचे कॅमेरे होते आणि याची किंमत भारतात 79,999 रुपयांपासून सुरु होते. हा फोन सिरॅमिक ब्लॅक आणि सिरॅमिक व्हाइट कलरमध्ये सादर करण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here