50MP कॅमेरा आणि 8GB RAM सह Vivo T2x आला भारतात; मीडियाटेक प्रोसेसरसह घेतली एंट्री

Highlights

  • Vivo T2x 5G भारतात लाँच झाला आहे.
  • हा विवो फोन MediaTek Dimensity 6020 प्रोसेसरवर चालतो.
  • या मोबाइलमध्ये 50MP Rear आणि 8MP Selfie कॅमेरा आहे.

Vivo नं भारतीय बाजारात आपल्या ‘टी’ सीरीजचा विस्तार करत दोन नवीन मोबाइल फोन Vivo T2x 5G आणि Vivo T2x 5G लाँच केले आहेत. यातील एक्स मॉडेलमध्ये 50MP Camera, 8GB RAM आणि MediaTek Dimensity 6020 चिपसेट असे स्पेसिफिकेशन्स देण्यात आले आहेत. चला जाणून घेऊया या स्मार्टफोनची किंमत, स्पेसिफिकेशन्स व फीचर्सची माहिती.

विवो टी2एक्स 5जीचे स्पेसिफिकेशन्स

  • 6.58″ FHD+ IPS LCD display
  • 50MP Dual rear camera
  • 8GB RAM
  • MediaTek Dimensity 6020
  • 5,000mAh battery

विवो टी2एक्स 5जी फोनमध्ये 2400 x 1080 पिक्सल रिजोल्यूशन असलेला 6.58 इंचाचा फुलएचडी+ डिस्प्ले देण्यात आला आहे. वॉटरड्रॉप नॉच स्टाईल असेलली ही स्क्रीन आयपीएस एलसीडी पॅनलवर बनली आहे. प्रोसेसिंगसाठी या मोबाइल फोनमध्ये मीडियाटेक डिमेनसिटी 6020 ऑक्टाकोर प्रोसेसर देण्यात आला आहे.

फोटोग्राफीसाठी हा फोन ड्युअल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. याच्या बॅक पॅनलवर असलेला 50 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर देण्यात आला आहे जो 2 मेगापिक्सलच्या सेन्सरसह येतो. तसेच सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी या फोनमध्ये 8 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.

Vivo T2x 5G फोन अँड्रॉइड 13 ओएसवर लाँच झाला आहे जोडीला फनटच ओएसची लेयर मिळते. फोनमध्ये कनेक्टिव्हिटीसाठी 5G, 4G, WiFi, Bluetooth आणि USB-C port मिळतो. विवोनं आपला नवीन मोबाइल फोन 5,000एमएएचच्या बॅटरीसह बाजारात आणला आहे, जी 18W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.

विवो टी2एक्स 5जी ची किंमत

Vivo T2x 5G स्मार्टफोनचे तीन मेमरी व्हेरिएंट्स भारतात आले आहेत. तिन्हीमध्ये 128 जीबी स्टोरेज देण्यात आली आहे. या फोनच्या 4जीबी रॅम मॉडेलची किंमत 12,999 रुपये आहे, 6जीबी रॅमसाठी 13,999 मोजावे लागतील. 8जीबी रॅम असलेला सर्वात मोठा व्हेरिएंट 15,999 रुपयांमध्ये विकला जाईल. या फोनची विक्री 21 एप्रिलपासून ईकॉमर्स प्लॅटफॉर्म फ्लिपकार्टच्या माध्यमातून केली जाईल. हा फोन Marine Blue, Aurora Gold आणि Glimmer Black कलरमध्ये विकत घेता येईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here