Vivo V17 - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Wed, 18 Dec 2019 12:34:53 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 Vivo Christmas Carnival सुरु, आर्कषक ऑफर्स आणि भरपूर डिस्काउंट सह Selfie Stick पण मिळत आहे फ्री https://www.91mobiles.com/marathi/vivo-christmas-carnival-offers-discounts-cashback-free-selfie-stick-z1pro-z1x-u20-v17pro-u20/ https://www.91mobiles.com/marathi/vivo-christmas-carnival-offers-discounts-cashback-free-selfie-stick-z1pro-z1x-u20-v17pro-u20/#respond Wed, 18 Dec 2019 12:34:53 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=6074 या सेल अंतर्गत Vivo ब्रँडच्या सर्व स्मार्टफोन 12 महिन्यांपर्यंत नो कॉस्ट ईएमआई वर सेल साठी उपलब्ध होतील.

The post Vivo Christmas Carnival सुरु, आर्कषक ऑफर्स आणि भरपूर डिस्काउंट सह Selfie Stick पण मिळत आहे फ्री first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
क्रिसमस आणि न्यू ईयरच्या तयारीने बाजार सजला आहे. त्याचबरोबर सर्व स्मार्टफोन आणि टेक ब्रँड या संधीचा फायदा घेण्यासाठी नवीन व आर्कषक ऑफर घेऊन येत आहेत. यात स्मार्टफोन ब्रँड Vivo ने पण क्रिसमस कार्निवलची घोषणा केली आहे. Vivo Christmas Carnival आज म्हणजे 18 डिसेंबरला सुरु होऊन 20 डिसेंबर पर्यंत सुरु राहील. या तीन दिवसीय फेस्टिवल सेलचे आयोजन कंपनीने फक्त ऑनलाइन प्लॅटफॉर्म वर केले आहे आणि यूजर्स वीवोच्या अधिकृत वेबसाइट वरच सेल अंतर्गत मिळणाऱ्या शानदार ऑफर्स, डिस्काउंट आणि फ्री गिफ्ट मिळवू शकतील.

सर्वात आधी Vivo Z सीरीज बद्दल बोलायचे तर क्रिसमस कॉर्निवल अंतर्गत Vivo Z1 Pro वर कंपनी थेट 1,000 रुपयांचा डिस्काउंट देत आहे. 13,990 रुपयांचा फोनचा 4 जीबी रॅम + 64 जीबी स्टोरेज वेरिएंट डिस्काउंटनंतर 12,990 रुपयांमध्ये विकत घेता येईल तसेच 14,990 रुपयांचा 6 जीबी रॅम + 64 जीबी मेमरी वेरिएंट 13,990 रुपयांमध्ये मिळेल. Vivo Z1 Pro चा 6 जीबी रॅम + 128 जीबी स्टोरेज वेरिएंट Vivo प्रीपेड पेमेंट वर 1,000 रुपयांनी स्वस्त विकला जात आहे.

त्याचप्रमाणे Vivo Z1x चा 4 जीबी रॅम + 128 जीबी स्टोरेज वेरिएंट पण Vivo Christmas Carnival अंतर्गत 1,000 डिस्काउंट सह विकत घेता येईल, ज्यामुळे 15,990 रुपयांचा हा फोन 14,990 रुपयांमध्ये मिळेल. तर Vivo Z1x चा 6 जीबी रॅम + 64 जीबी स्टोरेज वेरिएंट तसेच 6 जीबी रॅम + 128 जीबी मेमरी वेरिएंट प्रीपेड पेमेंट सह विकत घेतल्यास 1,000 चा ऑफ मिळत आहे.

Vivo U10 चा 3 जीबी रॅम वेरिएंट्स क्रिसमस कॉर्निवल अंतर्गत 500 रुपये डिस्काउंट सह विकत घेता येईल. सेल अंतर्गत 8,990 रुपयांचा Vivo U10 चा 3 जीबी रॅम + 32 जीबी मेमरी वेरिएंट 8,490 रुपयांमध्ये मिळत आहे तसेच 9,490 रुपयांचा Vivo U10 चा 3 जीबी रॅम + 64 जीबी मेमरी वेरिएंट 8,990 रुपयांमध्ये सेल साठी उपलब्ध आहे. तर Vivo U10 चा 4 जीबी रॅम + 64 जीबी मेमरी वेरिएंटचे प्रीपेड पेमेंट केल्यास हा वेरिएंट थेट 1,000 स्वस्त मिळत आहे.

Vivo Christmas Carnival संबंधित अजून एक खास बाब अशी कि या सेल अंतर्गत Vivo Z1 Pro, Vivo Z1x आणि Vivo U20 स्मार्टफोन विकत घेतल्यास कंपनी कडून मोबाईल यूजर्सना एक Selfie Stick पण फ्री मिळत आहे. तर Vivo V17, Vivo V17 Pro, Vivo V15 Pro, Vivo S1 आणि Vivo Y19 च्या खरेदीवर एचडीएफसी आणि आईसीआईसीआई बँकेचे क्रेडिट कार्ड वापरणाऱ्या ग्राहकांना 5 टक्के कॅशबॅक मिळेल. या सेल अंतर्गत Vivo ब्रँडच्या सर्व स्मार्टफोन 12 महिन्यांपर्यंत नो कॉस्ट ईएमआई वर सेल साठी उपलब्ध होतील.

The post Vivo Christmas Carnival सुरु, आर्कषक ऑफर्स आणि भरपूर डिस्काउंट सह Selfie Stick पण मिळत आहे फ्री first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/vivo-christmas-carnival-offers-discounts-cashback-free-selfie-stick-z1pro-z1x-u20-v17pro-u20/feed/ 0
Vivo V17 झाला भारतात लॉन्च, यात आहे 4 रियर कॅमेरा, यात आहे पंच-होल डिस्प्ले आणि 4500एमएएच बॅटरी https://www.91mobiles.com/marathi/vivo-v17-launched-punch-hole-display-design-features-specifications-price-sale-india/ https://www.91mobiles.com/marathi/vivo-v17-launched-punch-hole-display-design-features-specifications-price-sale-india/#respond Mon, 09 Dec 2019 11:37:44 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=6007 Vivo V17 मीडनाईट ओशियन आणि ग्लेशियर आइस कलर मध्ये 22,990 रुपयांमध्ये लॉन्च झालं आहे तसेच येत्या 17 डिसेंबर पासून विकत घेता येईल.

The post Vivo V17 झाला भारतात लॉन्च, यात आहे 4 रियर कॅमेरा, यात आहे पंच-होल डिस्प्ले आणि 4500एमएएच बॅटरी first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Vivo V17 Pro हिट झाल्यानंतर आज वीवोने भारतात आपल्या ‘वी सीरीज’ चा अजून एक नवीन डिवाईस लॉन्च केला आहे. कंपनीने Vivo V17 स्मार्टफोन भारतीय बाजारात आणला आहे ज्याने मीड बजेट मध्ये एंट्री घेतली आहे. पंच-होल डिस्प्ले आणि क्वॉड रियर कॅमेऱ्यासह हा फोन शानदार डिजाईन वर बनला आहे. Vivo फॅन्ससाठी हा नवीन प्रोडक्ट येत्या 17 डिसेंबर पासून भारतात विक्री साठी उपलब्ध होईल. चला जाणून घेऊया कसा आहे Vivo V17 चा लुक आणि किती दमदार आहेत याचे स्पेसिफिकेशन्स.

लुक व डिजाईन

Vivo V17 पंच-होल डिस्प्ले डिजाईन वर लॉन्च केला गेला आहे. हा होल डिस्प्लेच्या वरच्या बाजूला डावीकडे उजवीकडे आहे तसेच या होल मध्ये फोनचा सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे. फोन डिस्प्लेच्या तीन कडा बेजल लेस आहेत तर खालच्या बाजूला बारीक बॉडी पार्ट देण्यात आला आहे. Vivo V17 स्मार्टफोन इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर टेक्नॉलॉजी सह बाजारात येईल. हा स्मार्टफोन क्वॉड रियर कॅमेरा वर लॉन्च केला गेला आहे. Vivo V17 चा हा कॅमेरा सेटअप बॅक पॅनल वर डावीकडे वरच्या बाजूला आहे.

Vivo V17 चा रियर कॅमेरा सेटअप L-शेप आहे ज्यात तीन कॅमेरा सेंसर एकाच लाईन मध्ये वर्टिकल शेप मध्ये आहेत तर चौथा कॅमेरा सेंसर उजव्याबाजूला आहे. या चौथ्या सेंसरच्या वर फ्लॅश लाईट आहे. Vivo V17 कॅमेरा सेटअपच्या खाली सेंसर डिटेल पण आहेत. फोनच्या उजव्या पॅनल वर वाल्यूम रॉकर आणि पावर बटण देण्यात आला आहे तर डाव्या पॅनल वर सिम स्लॉट आहे. फोनच्या लोवर पॅनल वर 3.5एमएम जॅक, यूएसबी टाईप सी पोर्ट आणि स्पीकर ग्रिल आहे.

कॅमेरा डिटेल

Vivo V17 क्वॉड रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनल वर फ्लॅश लाईट सह एफ/1.8 अपर्चर असलेला 48 मेगापिक्सलचा प्राइमरी सेंसर देण्यात आला आहे. तसेच हा स्मार्टफोन एफ/2.2 अपर्चर असलेल्या 8 मेगापिक्सल वाइड अँगल लेंस, एफ/2.4 अपर्चर असलेल्या 2 मेगापिक्सलच्या डेफ्थ सेंसर आणि एफ/2.4 अपर्चर असलेल्या 2 मेगापिक्सलचा मॅक्रो लेंसला सपोर्ट करतो. तसेच सेल्फी व वीडियो कॉलिंग साठी Vivo V17 मध्ये एफ/2.45 अपर्चर असलेला 32 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.

स्पेसिफिकेशन्स

Vivo V17 चे इतर स्पेसिफिकेशन्स पाहता हा डिवाईस 20:9 आस्पेक्ट रेशियो सह लॉन्च झाला आहे जो 2400 × 1080 पिक्सल रेज्ल्यूशन असलेल्या 6.44 इंचाच्या फुलएचडी+ ई3 सुपर एमोलेड पंच-होल डिस्प्लेला सपोर्ट करतो. कंपनीने या फोनच्या पंच-होलला जगातील सर्वात छोटी साईज म्हटले आहे. कंपनीने वी17 च्या स्क्रीन मध्ये इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर दिला आहे. इंडियन मार्केट मध्ये हा स्मार्टफोन 8 जीबी रॅम सह लॉन्च झाला आहे जो 128 जीबी इंटरनल स्टोरेज सपोर्ट करतो.

Vivo V17 एंडरॉयड 9 पाई आधारित फनटच ओएस 9.2 सह लॉन्च झाला आहे जो क्वॉलकॉमच्या स्नॅपड्रॅगॉन 675 एआईई चिपसेट वर चालतो. Vivo V17 डुअल सिम फोन आहे जो 4जी वोएलटीई ला सपोर्ट करतो. तसेच पावर बॅकअप साठी या डिवाईस मध्ये 18वॉट फास्ट चार्जिंग सपोर्ट सह 4500एमएएच ची मोठी बॅटरी देण्यात आली आहे. Vivo V17 मीडनाईट ओशियन आणि ग्लेशियर आइस कलर मध्ये 22,990 रुपयांमध्ये लॉन्च झालं आहे तसेच येत्या 17 डिसेंबर पासून विकत घेता येईल. हा स्मार्टफोन ऑफलाईन रिटेल स्टोर्स सोबत ऑनलाईन शॉपिंग साइट वर सेल साठी उपलब्ध होईल.

The post Vivo V17 झाला भारतात लॉन्च, यात आहे 4 रियर कॅमेरा, यात आहे पंच-होल डिस्प्ले आणि 4500एमएएच बॅटरी first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/vivo-v17-launched-punch-hole-display-design-features-specifications-price-sale-india/feed/ 0
Exclusive: बघा Vivo V17 ची झलक आणि जाणून घ्या याचे भारतातील स्पेसिफिकेशन https://www.91mobiles.com/marathi/vivo-v17-first-look-and-specifications/ https://www.91mobiles.com/marathi/vivo-v17-first-look-and-specifications/#respond Mon, 02 Dec 2019 14:10:04 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=5937 आज आमच्याकडे या फोनबद्दल बरीच माहिती आहे. फक्त फोनचा लुक नाही तर संपूर्ण स्पेसिफिकेशनची माहिती आली आहे.

The post Exclusive: बघा Vivo V17 ची झलक आणि जाणून घ्या याचे भारतातील स्पेसिफिकेशन first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
तुम्हाला तर माहित आहे कि Vivo नेहमी आपल्या V सीरीज मध्ये दोन मॉडेल सादर करते. यावर्षीच्या सुरवातीला कंपनीने Vivo V15 सह Vivo V15 Pro आणला होता. तर दिवाळीच्या आधी कंपनीने आपला फ्लॅगशिप फोन V17 Pro भारतात सादर केला पण V17 मॉडेलचा उल्लेख केला नाही. पण 91मोबाईल्सला याबाबत एक्सक्लूसिव माहिती मिळाली आणि जगात सर्वात आधी आम्ही सांगितले होते कि डिसेंबर मध्ये Vivo V17 मॉडेल सादर केला जाऊ शकतो. तर आज आमच्याकडे या फोनबद्दल बरीच माहिती आहे. फक्त फोनचा लुक नाही तर संपूर्ण स्पेसिफिकेशनची माहिती आली आहे.

Vivo V17 ची डिजाइन

Vivo V17 मॉडेल काही दिवसांपूर्वी रशिया मध्ये लॉन्च केला गेला होता आणि हा फोन पंच होल डिस्प्ले सह सादर केला गेला होता. भारतात हा फोन खूप वेगळा आहे. कंपनी हा 6.44 इंचाच्या पंच होल डिस्प्ले सह सादर करणार आहे आणि याचे नाव आईव्यू असेल. चांगल्या डिस्प्ले क्वालिटी साठी यात E3 OLED पॅनलचा वापर केला गेला आहे. तसेच आम्हाला जो पोस्टर मिळाला आहे त्यात स्पष्टपणे दिसत आहे कि फोनच्या मागच्या पॅनल मध्ये एलशेप असलेला क्वाड कॅमेरा सेटअप आहे. फोन मध्ये तुम्हाला रियर पॅनल फिंगरप्रिंट स्कॅनर मिळणार नाही तर कंपनी यात इन डिस्प्ले फिंगरप्रिंट स्कॅनर देईल.

Vivo V17 चे स्पेसिफिकेशंस

आम्ही आधी सांगितल्याप्रमाणे या फोन मध्ये पंच होल मध्ये तुम्हाला 32 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा मिळेल. तर बॅक पॅनल पाहता यावर 48—मेगापिक्सलचा मेन कॅमेरा देण्यात आला आहे जो एफ/1.8 अपर्चर सह येईल. याचा दुसरा सेंसर 8 मेगापिक्सलचा आहे जो एफ/2.2 अपर्चर सह देण्यात आला आहे. तिसरा आणि चौथा सेंसर 2 एमपी चा आहे जो एफ/2.4 अपर्चर सह येतो.

Vivo V17 कंपनी क्वालकॉम स्नॅपड्रॅगॉन 675 चिपसेट वर सादर करणार आहे आणि हा फोन भारतीय बाजारात 8जीबी रॅम आणि 128जीबी मेमरी सह लॉन्च होईल. फोन मध्ये तुम्हाला तीन स्लॉट मिळतील. अर्थात तुम्ही दोन सिम कार्ड सह एक मेमरी कार्ड वापरू शकाल. 4जी आधारित या फोन मध्ये यूएसबी टाईप—सी देण्यात आली आहे आणि हा 4,500 एमएएच बॅटरी सह लॉन्च होईल. कंपनीने सोबत 18 वॉट फास्ट चार्जिंग दिली आहे.

लॉन्च व किंमत

आम्हाला जी माहिती मिळाली आहे त्या नुसार या फोनची किंमत 22 हजार रुपयांच्या आसपास असू शकते आणि 9 डिसेंबरला हा भारतात लॉन्च केला जाणार आहे.

The post Exclusive: बघा Vivo V17 ची झलक आणि जाणून घ्या याचे भारतातील स्पेसिफिकेशन first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/vivo-v17-first-look-and-specifications/feed/ 0
9 डिसेंबरला भारतात लॉन्च होईल पंच-होल डिस्प्ले आणि क्वॉड रियर कॅमेरा असलेला Vivo V17, याचा लुक असेल वेगळा https://www.91mobiles.com/marathi/vivo-v17-launch-date-in-india-9-december-punch-hole-display-quad-rear-camera/ https://www.91mobiles.com/marathi/vivo-v17-launch-date-in-india-9-december-punch-hole-display-quad-rear-camera/#respond Fri, 29 Nov 2019 13:00:26 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=5916 कंपनीने शेयर केलेल्या इन्वाईट मध्ये पंच-होल डिस्प्ले असलेला स्मार्टफोन दाखवण्यात आला आहे.

The post 9 डिसेंबरला भारतात लॉन्च होईल पंच-होल डिस्प्ले आणि क्वॉड रियर कॅमेरा असलेला Vivo V17, याचा लुक असेल वेगळा first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
91मोबाईल्सने या आठवड्यात आपल्या एक्सक्लूसिव रिपोर्ट मध्ये माहिती दिली होती कि कंपनी डिसेंबर महिन्यात भारतात आपली ‘वी सीरीज’ वाढवणार आहे आणि या सीरीजचा नवीन स्मार्टफोन Vivo V17 असेल. आम्ही आपल्या रिपोर्ट मध्ये असा खुलासा पण केला होता कि Vivo V17 स्मार्टफोन कंपनी पंच-होल डिस्प्ले डिजाईन सह सादर करेल. आज Vivo ने आमच्या रिपोर्ट वर शिक्कामोर्तब करत Vivo V17 च्या लॉन्चची माहिती दिली आहे. Vivo ने अधिकृतपणे खुलासा केला आहे कि येत्या 9 डिसेंबरला भारतात Vivo V सीरीजचा नवीन स्मार्टफोन लॉन्च केला जाईल.

Vivo ने मीडिया ईन्वाईट पाठवत स्मार्टफोनच्या लॉन्च डेटची माहिती दिली आहे. कंपनीने सांगितले आहे कि येत्या 9 डिसेंबरला Vivo भारतात एका ईवेंटचे आयोजन केले जाईल आणि या ईवेंटच्या मंचावर ब्रँडच्या ‘वी सीरीज’ चा आगामी डिवाईस इंडियन मार्केट मध्ये येईल. Vivo ने या डिवाईसचे नाव सांगितले नाही, पण आम्हाला वाटते कि 9 डिसेंबरला लॉन्च होणारा स्मार्टफोन Vivo V17 असेल. सर्वात मोठी बाब अशी कि कंपनीने शेयर केलेल्या इन्वाईट मध्ये पंच-होल डिस्प्ले असलेला स्मार्टफोन दाखवण्यात आला आहे.

विशेष म्हणजे Vivo V17 याच महिन्यात चीनी मार्केट मध्ये लॉन्च केला गेला आहे. पण चीन मध्ये Vivo ने हा स्मार्टफोन Vivo S5 नावाने आणला होता आणि वीवो एस5 च भारतात Vivo V17 नावाने लॉन्च होईल. कंपनीने फोन मध्ये इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर दिला आहे. तसेच आम्हाला मिळालेल्या एक्सक्लूसिव माहितीनुसार भारतात Vivo V17 ची किंमत 22,000 रुपयांच्या आसपास असेल.

हे देखील वाचा: Samsung Galaxy A11, Galaxy A31 आणि Galaxy A41 ची महत्वाची माहिती आली समोर, 128जीबी स्टोरेज सह येतील 2020 मध्ये

Vivo V17

फोनचे स्पेसिफिकेशन्स पाहता Vivo V17 को 20:9 आस्पेक्ट रेशियो सह सादर केला गेला आहे जो 2400 x 1080 पिक्सल रेज्ल्यूशन असलेल्या 6.44 इंचाच्या फुलएचडी+ डिस्प्लेला सपोर्ट करतो. चीनी बाजारात हा स्मार्टफोन एंडरॉयड 9 पाई वर सादर केला गेला आहे जो ब्रँडच्या जोवी असिस्टेंट सह काम करतो. प्रोसेसिंग साठी Vivo V17 म्हणजे चीनच्या Vivo S5 मध्ये 2.3गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड असलेला आक्टा-कोर प्रोसेसर सह क्वॉलकॉमचा स्नॅपड्रॅगॉन 712 चिपसेट देण्यात आला आहे.

फोटोग्राफी सेग्मेंट पाहता Vivo S5 क्वॉड रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनल वर फ्लॅश लाईट सह 48 मेगापिक्सलचा प्राइमरी सेंसर देण्यात आला आहे. त्याचबरोबर फोन मध्ये 8 मेगापिक्सलची अल्ट्रा वाइड अँगल लेंस, 2 मेगापिक्सलची टेलीफोटो लेंस आणि 2 मेगापिक्सलची मॅक्रो लेंस देण्यात आली आहे. तसेच सेल्फी व वीडियो कॉलिंग साठी Vivo S5 / Vivo V17 32 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो.

हे देखील वाचा: Samsung चा दमदार स्मार्टफोन Galaxy Note 10 Lite झाला गीकबेंच वर लिस्ट, लवकरच होईल लॉन्च

Vivo S5 नावाने चीनी बाजारात हा फोन दोन वेरिएंट्स मध्ये लॉन्च केला गेला आहे, ज्यात 8 जीबी रॅम + 128 मेमरी आणि 8 जीबी रॅम + 256 मेमरी देण्यात आली आहे. Vivo S5 मल्टी टर्बो फीचर सह येतो जो फोन मध्ये गेमिंग लॅग फ्री व स्मूद करतो. सिक्योरिटी साठी Vivo S5 इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसरला सपोर्ट करतो तसेच हा डिवाईस फेस अनलॉक फीचरने पण ऍक्सेस केला जाऊ शकतो. पावर बॅकअप साठी Vivo S5 म्हणजे Vivo V17 मध्ये 4100 एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे जी 22.5 वॉट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.

The post 9 डिसेंबरला भारतात लॉन्च होईल पंच-होल डिस्प्ले आणि क्वॉड रियर कॅमेरा असलेला Vivo V17, याचा लुक असेल वेगळा first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/vivo-v17-launch-date-in-india-9-december-punch-hole-display-quad-rear-camera/feed/ 0
Exclusive: पंच-होल डिस्प्ले डिजाइन सह भारतात लॉन्च होईल Vivo V17 https://www.91mobiles.com/marathi/exclusive-vivo-v17-to-come-in-india-with-a-punch-hole-display-design/ https://www.91mobiles.com/marathi/exclusive-vivo-v17-to-come-in-india-with-a-punch-hole-display-design/#respond Wed, 27 Nov 2019 11:05:35 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=5890 भारत वीवो साठी मोठी बाजारपेठ आहे त्यामुळे आपल्या फोनला पंच-होल डिजाइन सह प्रीमियम लुक देण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो जसा गॅलेक्सी एस10 मध्ये होता.

The post Exclusive: पंच-होल डिस्प्ले डिजाइन सह भारतात लॉन्च होईल Vivo V17 first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Vivo V17 भारतात पंच-होल डिजाइन डिस्प्ले सह सादर केला जाईल. कंपनीने काही दिवसांपुवी रशियात Vivo V17 वॉटरड्रॉप नॉच डिस्प्ले सह सादर केला होता. पंच-होल डिजाइनची माहिती आम्हाला इंडस्ट्री सोर्स कडून मिळाली आहे. अलीकडेच 91मोबाईल्सने एक्सक्लूसिवली माहिती दिली होती कि Vivo V17 भारतात डिसेंबर मध्ये लॉन्च केला जाईल. याची किंमत भारतीय मार्केट मध्ये 22,000 रुपयांच्या आसपास असेल.

आता आम्हाला भारतात येणाऱ्या Vivo V17 च्या डिजाइनची माहिती मिळाली आहे. विशेष म्हणजे कंपनीने अलीकडेच रशियात V17 वॉटरड्रॉप नॉच डिजाइन सह सादर केला आहे. भारत वीवो साठी मोठी बाजारपेठ आहे त्यामुळे आपल्या फोनला पंच-होल डिजाइन सह प्रीमियम लुक देण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो जसा गॅलेक्सी एस10 मध्ये होता.

हे देखील वाचा: जगातील पहिला 60x Super Zoom आणि 64MP सेंसर असलेला स्मार्टफोन Vivo X30 येणार आहे बाजारात, बदलेले कॅमेऱ्यांची व्याख्या

दमदार कॅमेरा

फोनचा कॅमेरा सेग्मेंट पाहता Vivo V17 क्वॉड रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनल वर एफ/1.8 अपर्चरचा 48 मेगापिक्सलचा जीएम1 सेंसर देण्यात आला आहे. सोबत बॅक पॅनल वर एफ/2.2 अपर्चरची 8 मेगापिक्सलची अल्ट्रा वाईड अँगल लेंस आणि एफ/2.4 अपर्चर असलेला 2 मेगापिक्सलचा डेफ्थ सेंसर तसेच 2 मेगापिक्सलची मॅक्रो लेंस आहे. तसेच सेल्फी आणि वीडियो कॉलिंग साठी Vivo V17 एफ/2.0 अपर्चरच्या 32 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो.

वीवो चा हा फोन 19.5:9 आस्पेक्ट रेशियो वर सादर केला गेला आहे जो 1080 x 2340 पिक्सल रेज्ल्यूशनच्या 6.38 इंचाच्या फुलएचडी+ सुपर एमोलेड डिस्प्लेला सपोर्ट करतो. Vivo V17 कंपनीने इन डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर टेक्नॉलॉजी सह बाजारात आणला आहे. हा स्मार्टफोन एंडरॉयड 9.0 पाई आधारित फनटच 9.2 ओएस वर सादर झाला आहे जो 2गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड असलेल्या आक्टाकोर प्रोसेसर सह क्वालकॉमच्या स्नॅपड्रॅगॉन 665 चिपसेट वर चालतो. तसेच ग्राफिक्स साठी या फोन मध्ये एड्रेनो 610 जीपीयू आहे.

हे देखील वाचा: 5000एमएएच बॅटरी आणि 6 जीबी रॅम सह लॉन्च झाला VIVO U20, फक्त 10,990 रुपयांमध्ये मिळेल हा शानदार फोन

Vivo V17 रशिया मध्ये 8 जीबी रॅम सह लॉन्च केला गेला आहे तसेच फोन मध्ये 128 जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे. हा एक डुअल सिम फोन आहे जो 4जी वोएलटीई ला सपोर्ट करतो. पावर बॅकअप साठी Vivo V17 मध्ये 18वॉट फास्ट चार्जिंग सपोर्ट असलेली 4500एमएएच ची मोठी बॅटरी देण्यात आली आहे. किंमत पाहता रशिया मध्ये हा फोन 22,990 रुबल मध्ये लॉन्च केला गेला आहे जे इंडियन करंसी नुसार 25,800 रुपये होतात.

The post Exclusive: पंच-होल डिस्प्ले डिजाइन सह भारतात लॉन्च होईल Vivo V17 first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/exclusive-vivo-v17-to-come-in-india-with-a-punch-hole-display-design/feed/ 0
Vivo V17 झाला लॉन्च, यात आहे 8 जीबी रॅम, 4500एमएएच बॅटरी, 32एमपी सेल्फी आणि 48एमपी क्वॉड रियर कॅमेरा https://www.91mobiles.com/marathi/vivo-v17-officially-launched-32mp-selfie-48mp-quad-rear-camera-4500mah-battery-8gb-ram-specs-price/ https://www.91mobiles.com/marathi/vivo-v17-officially-launched-32mp-selfie-48mp-quad-rear-camera-4500mah-battery-8gb-ram-specs-price/#respond Mon, 25 Nov 2019 09:38:43 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=5859 अशा आहे कि हा स्मार्टफोन भारतात Vivo S1 Pro नाही तर Vivo V17 म्हणून येईल.

The post Vivo V17 झाला लॉन्च, यात आहे 8 जीबी रॅम, 4500एमएएच बॅटरी, 32एमपी सेल्फी आणि 48एमपी क्वॉड रियर कॅमेरा first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
VIVO ‘वी सीरीज’ च्या आगामी स्मार्टफोन V17 बद्दल अनेक दिवसांपासून बातम्या समोर येत आहेत. सर्टिफिकेशन्स साइट वर लिस्ट केल्यानंतर या फोनचे रियल फोटोज पण समोर आले होते. काही दिवसांपूर्वी हा स्मार्टफोन एका म्यूजिक वीडियो मध्ये पण दिसला होता ज्यावरून समजले होते कि Vivo V17 तयार आहे आणि लवकरच टेक बाजारात येणार आहे. आता परदेशी मीडिया कडून बातमी समोर आली आहे कि Vivo V17 अंर्तराष्ट्रीय बाजारात सादर करण्यात आला आहे आणि या फोनने रशियन मार्केट मधून टेक मंचावर एंट्री घेतली आहे.

Vivo V17 रशियन बाजारात लॉन्च केला गेला आहे. हा स्मार्टफोन Vivo च्या अधिकृत रशियन वेबसाइट वर लिस्ट झाला आहे जिथे हा प्रीआर्डर साठी उपलब्ध आहे. Vivo V17 च्या प्रोडक्ट पेज वर फोनचे संपूर्ण माहिती प्रसिद्ध करण्यात आली आहे ज्यात फोनच्या लुक, डिजाईन, फीचर्स व स्पेसिफिकेशन्स सर्व माहिती आहे. Vivo V17 गेल्या आठवड्यात फिलिपिंस मध्ये लॉन्च केल्या गेलेल्या स्मार्टफोन Vivo S1 Pro चा रिब्रँडेड वर्जन असल्याचे बोलले जात आहे.

Vivo V17 लुक

फोनचा बॅक पॅनल पाहता पॅनलच्या मधोमध रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे जो ‘डायमंड शेप’ मध्ये आहे. कॅमेरा सेटअप मध्ये चार कॅमेरा सेंसर देण्यात आले आहेत. तीन सेंसर वर्टिकल शेप मध्ये आहेत तर चौथा सेंसर या तिन्ही सेंसरच्या उजवीकडे आहे. कॅमेरा सेंसर्सच्या डावीकडे ‘म्यूजिक वेव’ सारखे चिन्ह आहे. कॅमेरा सेटअपच्या डायमंड शेपच्या खाली फ्लॅश लाईट आहे. फोनच्या बॅक पॅनल वर खाली वर्टिकल शेप मध्ये Vivo Camera & Music लिहिण्यात आले आहे.

Vivo V17 च्या बॅक पॅनल वर कोणताही फिंगरप्रिंट सेंसर नाही, त्यामुळे बोलले जात आहे कि हा डिवाईस इन डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसरला सपोर्ट करेल. फोनचा फ्रंट पॅनल पाहता इथे बेजल लेस डिस्प्ले देण्यात आला आहे ज्याच्या वरच्या बाजूला ‘यू’ शेप नॉच आहे. डिस्प्लेच्या खाली थोडा रुंद चिन पार्ट देण्यात आला आहे. फोटो मध्ये फोनच्या उजवीकडील पॅनल वर वाल्यूम बटण आणि पावर रॉकर दाखवण्यात आला आहे आणि खालच्या पॅनल वर यूएसबी पोर्ट आहे.

क्वॉड कॅमेरा

फोनचा कॅमेरा सेग्मेंट पाहता Vivo V17 क्वॉड रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनल वर एफ/1.8 अपर्चरचा 48 मेगापिक्सलचा जीएम1 सेंसर देण्यात आला आहे. सोबत बॅक पॅनल वर एफ/2.2 अपर्चरची 8 मेगापिक्सलची अल्ट्रा वाईड अँगल लेंस आणि एफ/2.4 अपर्चर असलेला 2 मेगापिक्सलचा डेफ्थ सेंसर तसेच 2 मेगापिक्सलची मॅक्रो लेंस आहे. तसेच सेल्फी आणि वीडियो कॉलिंग साठी Vivo V17 एफ/2.0 अपर्चरच्या 32 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो.

Vivo V17 स्पेसिफिकेशन्स

वीवो चा हा फोन 19.5:9 आस्पेक्ट रेशियो वर सादर केला गेला आहे जो 1080 x 2340 पिक्सल रेज्ल्यूशनच्या 6.38 इंचाच्या फुलएचडी+ सुपर एमोलेड डिस्प्लेला सपोर्ट करतो. Vivo V17 कंपनीने इन डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर टेक्नॉलॉजी सह बाजारात आणला आहे. हा स्मार्टफोन एंडरॉयड 9.0 पाई आधारित फनटच 9.2 ओएस वर सादर झाला आहे जो 2गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड असलेल्या आक्टाकोर प्रोसेसर सह क्वालकॉमच्या स्नॅपड्रॅगॉन 665 चिपसेट वर चालतो. तसेच ग्राफिक्स साठी या फोन मध्ये एड्रेनो 610 जीपीयू आहे.

Vivo V17 रशिया मध्ये 8 जीबी रॅम सह लॉन्च केला गेला आहे तसेच फोन मध्ये 128 जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे. हा एक डुअल सिम फोन आहे जो 4जी वोएलटीई ला सपोर्ट करतो. पावर बॅकअप साठी Vivo V17 मध्ये 18वॉट फास्ट चार्जिंग सपोर्ट असलेली 4500एमएएच ची मोठी बॅटरी देण्यात आली आहे. किंमत पाहता रशिया मध्ये हा फोन 22,990 रुबल मध्ये लॉन्च केला गेला आहे जे इंडियन करंसी नुसार 25,800 रुपये होतात. अशा आहे कि हा स्मार्टफोन भारतात Vivo S1 Pro नाही तर Vivo V17 म्हणून येईल.

The post Vivo V17 झाला लॉन्च, यात आहे 8 जीबी रॅम, 4500एमएएच बॅटरी, 32एमपी सेल्फी आणि 48एमपी क्वॉड रियर कॅमेरा first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/vivo-v17-officially-launched-32mp-selfie-48mp-quad-rear-camera-4500mah-battery-8gb-ram-specs-price/feed/ 0
5000एमएएच बॅटरी आणि 6 जीबी रॅम सह लॉन्च झाला VIVO U20, फक्त 10,990 रुपयांमध्ये मिळेल हा शानदार फोन https://www.91mobiles.com/marathi/vivo-u20-launched-in-india-price-triple-rear-camera-5000mah-battery/ https://www.91mobiles.com/marathi/vivo-u20-launched-in-india-price-triple-rear-camera-5000mah-battery/#respond Fri, 22 Nov 2019 12:25:00 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=5849 VIVO U20 कंपनीने लो बजेट सेग्मेंट मध्ये आणला आहे जो 10,990 रुपयांच्या बेस किंमतीती 28 नोव्हेंबर पासून सेल साठी उपलब्ध होईल.

The post 5000एमएएच बॅटरी आणि 6 जीबी रॅम सह लॉन्च झाला VIVO U20, फक्त 10,990 रुपयांमध्ये मिळेल हा शानदार फोन first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
सध्या VIVO च्या डायमंड शेप रियर कॅमेरा असलेल्या स्मार्टफोन V17 ची चर्चा सगळीकडे आहे. दिवसांपासून प्रश्न विचारला जात आहे कि VIVO V17 भारतात कधी लॉन्च केला जाणार आहे. कंपनीने V17 च्या लॉन्च तर कोणतीही माहिती दिली नाही पण VIVO V17 च्या आधी कंपनीने आज भारतीय बाजारात एक दुसरा स्मार्टफोन VIVO U20 लॉन्च केला आहे. VIVO U20 कंपनीने लो बजेट सेग्मेंट मध्ये आणला आहे जो 10,990 रुपयांच्या बेस किंमतीती 28 नोव्हेंबर पासून सेल साठी उपलब्ध होईल.

लुक व डिजाईन

Vivo U20 बेजल लेस वॉटरड्रॉप नॉच सह सादर केला गेला आहे ज्यात स्क्रीनच्या वर ‘यू’ शेप थोडी रुंद नॉच देण्यात आली आहे. डिस्प्लेच्या तीन कडा बेजल लेस आहेत तर खालच्या बाजूला बारीक बॉडी पार्ट आहे. नॉचच्या वर स्पीकर देण्यात आला आहे. Vivo U20 च्या उजव्या पॅनल वर वॉल्यूम रॉकर आणि पावर बटण देण्यात आला आहे तसेच डाव्या पॅनल वर सिम स्लॉट आहे.

Vivo U20 च्या बॅक पॅनल वर ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. फोनचा रियर कॅमेरा सेटअप बॅक पॅनल वर वरच्या बाजूला वर्टिकल शेप मध्ये आहे. या कॅमेरा सेटअप मध्ये तीन कॅमेरा सेंसर आणि एक फ्लॅश लाईट देण्यात आली आहे. कॅमेरा सेटअपच्या खाली ‘AI Triple Camera’ लिहिण्यात आले आहे. फोनच्या रियर पॅनल वर मधोमध फिंगरप्रिंट सेंसर आहे तर खालच्या बाजूला Vivo ची ब्रॅण्डिंग देण्यात आली आहे. तर फोनच्या लोवर पॅनल वर यूएसबी टाईप सी पोर्ट आहे, ज्याच्या उजव्या बाजूला 3.5एमएम जॅक आहे.

स्पेसिफिकेशन्स

Vivo U20 90.3 टक्के स्क्रीन-टू-बॉडी रेशियो वर बनला आहे तसेच हा स्मार्टफोन 1080 x 2340 पिक्सल रेज्ल्यूशन असलेल्या 6.53 इंचाच्या फुलएचडी+ डिस्प्लेला सपोर्ट करतो. कंपनीने Vivo U20 एंडरॉयड 9 पाई आधारित फनटच ओएस वर सादर केला आहे जो आक्टाकोर प्रोसेसर सह क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगॉन 675 एआईई चिपसेट वर चालतो.

फोटोग्राफी सेग्मेंट पाहता Vivo U20 ट्रिपल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनल वर फ्लॅश लाईट सह एफ/1.78 अपर्चर असलेला 16 मेगापिक्सलचा प्राइमरी सेंसर देण्यात आला आहे. त्याचबरोबर हा फोन एफ/2.2 अपर्चर असलेल्या 8 मेगापिक्सलच्या सुपर वाइड अँगल लेंस आणि एफ/2.4 अपर्चर असलेल्या 2 मेगापिक्सलच्या सुपर मॅक्रो लेंसला सपोर्ट करतो. सेल्फी आणि वीडियो कॉलिंग साठी Vivo U20 मध्ये एफ/2.0 अपर्चर असलेला 16 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे.

Vivo U20 भारतात दोन रॅम वेरिएंट्स मध्ये लॉन्च केला गेला आहे. फोनचा बेस वेरिएंट 4 जीबी रॅम सह 64 जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो तर दुसऱ्या वेरिएंट मध्ये 6 जीबी रॅम सह 64 जीबी मेमरी देण्यात आली आहे. दोन्ही वेरिएंट्सची स्टोरेज माइक्रोएसडी कार्डने वाढवता येते. Vivo U20 डुअल सिम फोन आहे जो 4जी एलटीई ला सपोर्ट करतो. सिक्योरिटी साठी फोनच्या बॅक पॅनल वर फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे तर पावर बॅकअप साठी हा डिवाईस 5000एमएएच च्या बॅटरी सपोर्ट करतो.

किंमत व सेल

Vivo U20 चा 4 जीबी + 64 जीबी वेरिएंट 10,990 रुपयांमध्ये लॉन्च केला गेला आहे तर फोनचा 6 जीबी + 64 जीबी वेरिएंट 11,990 रुपयांमध्ये बाजारात आला आहे. Vivo U20 ग्रेडिएंट फिनिशन वाले ब्लॅक आणि ब्लू कलर वेरिएंट मध्ये येत्या 28 नोव्हेंबर पासून शॉपिंग साइट अमेझॉन इंडिया वरून विकत घेता येईल. VIVO फॅन्स साठी कंपनीने लॉन्च ऑफर पण सादर केली आहे ज्या अंतर्गत Vivo U20 प्रीपेड पेमेंट सह विकत घेतल्यास फोन 1,000 रुपये स्वस्त मिळेल. म्हणजे 4 जीबी रॅम वेरिएंट 9,990 आणि 6 जीबी रॅम वेरिएंट 10,990 रुपयांमध्ये विकत घेता येईल.

The post 5000एमएएच बॅटरी आणि 6 जीबी रॅम सह लॉन्च झाला VIVO U20, फक्त 10,990 रुपयांमध्ये मिळेल हा शानदार फोन first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/vivo-u20-launched-in-india-price-triple-rear-camera-5000mah-battery/feed/ 0
4500एमएएच बॅटरी, 8 जीबी रॅम आणि 32एमपी सेल्फी कॅमेऱ्यासह लॉन्च झाला क्वॉड रियर कॅमेरा असलेला Vivo S1 Pro https://www.91mobiles.com/marathi/vivo-s1-pro-launched-with-quad-rear-camera-4500mah-battery-8gb-ram-price-specifications-v17/ https://www.91mobiles.com/marathi/vivo-s1-pro-launched-with-quad-rear-camera-4500mah-battery-8gb-ram-price-specifications-v17/#respond Wed, 20 Nov 2019 13:38:30 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=5832 फिलिपिंस मध्ये हा फोन PHP 15,999 म्हणजे जवळपास 22,600 रुपयांमध्ये लॉन्च केला आहे तसेच Vivo S1 Pro फॅन्सी स्काई आणि नाईट ब्लॅक कलर मध्ये सेल साठी उपलब्ध होईल.

The post 4500एमएएच बॅटरी, 8 जीबी रॅम आणि 32एमपी सेल्फी कॅमेऱ्यासह लॉन्च झाला क्वॉड रियर कॅमेरा असलेला Vivo S1 Pro first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Vivo ने अलीकडेच अंर्तराष्ट्रीय बाजारात आपली ‘एस सीरीज’ वाढवत नवीन डिवाईस Vivo S5 लॉन्च केला होता. हा स्मार्टफोन चीनी बाजारात आला आहे जो डायमंड शेप रियर कॅमेरा सेटअप सह येतो. असाच कॅमेरा शेप असलेला एक नवीन स्मार्टफोन काल फिलिपिंस मध्ये लॉन्च झाला आहे, ज्याचे नाव आहे Vivo S1 Pro. वीवोचा हा नवीन स्मार्टफोन मागे लीक झालेल्या Vivo V17 सारख्या डिजाईन वर बनलेला आहे. बोलले जात आहे कि फिलिपिंस मध्ये लॉन्च झालेला Vivo S1 Pro येत्या काही दिवसांत भारतात Vivo V17 नावाने लॉन्च केला जाऊ शकतो.

Vivo S1 Pro लुक

फोनचा बॅक पॅनल पाहता पॅनलच्या मधोमध रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे जो ‘डायमंड शेप’ मध्ये आहे. कॅमेरा सेटअप मध्ये चार कॅमेरा सेंसर देण्यात आले आहेत. तीन सेंसर वर्टिकल शेप मध्ये आहेत तर चौथा सेंसर या तिन्ही सेंसरच्या उजवीकडे आहे. कॅमेरा सेंसर्सच्या डावीकडे ‘म्यूजिक वेव’ सारखे चिन्ह आहे. कॅमेरा सेटअपच्या डायमंड शेपच्या खाली फ्लॅश लाईट आहे. फोनच्या बॅक पॅनल वर खाली वर्टिकल शेप मध्ये Vivo Camera & Music लिहिण्यात आले आहे.

Vivo S1 Pro च्या बॅक पॅनल वर कोणताही फिंगरप्रिंट सेंसर नाही, त्यामुळे बोलले जात आहे कि हा डिवाईस इन डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसरला सपोर्ट करेल. फोनचा फ्रंट पॅनल पाहता इथे बेजल लेस डिस्प्ले देण्यात आला आहे ज्याच्या वरच्या बाजूला ‘यू’ शेप नॉच आहे. डिस्प्लेच्या खाली थोडा रुंद चिन पार्ट देण्यात आला आहे. फोटो मध्ये फोनच्या उजवीकडील पॅनल वर वाल्यूम बटण आणि पावर रॉकर दाखवण्यात आला आहे आणि खालच्या पॅनल वर यूएसबी पोर्ट आहे.

क्वॉड कॅमेरा

फोनचा कॅमेरा सेग्मेंट पाहता Vivo S1 Pro क्वॉड रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनल वर एफ/1.8 अपर्चरचा 48 मेगापिक्सलचा जीएम1 सेंसर देण्यात आला आहे. सोबत बॅक पॅनल वर एफ/2.2 अपर्चरची 8 मेगापिक्सलची अल्ट्रा वाईड अँगल लेंस आणि एफ/2.4 अपर्चर असलेला 2 मेगापिक्सलचा डेफ्थ सेंसर तसेच 2 मेगापिक्सलची मॅक्रो लेंस आहे. तसेच सेल्फी आणि वीडियो कॉलिंग साठी Vivo S1 Pro एफ/2.0 अपर्चरच्या 32 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो.

Vivo S1 Pro स्पेसिफिकेशन्स

वीवो चा हा फोन 19.5:9 आस्पेक्ट रेशियो वर सादर केला गेला आहे जो 1080 x 2340 पिक्सल रेज्ल्यूशनच्या 6.38 इंचाच्या फुलएचडी+ सुपर एमोलेड डिस्प्लेला सपोर्ट करतो. Vivo S1 Pro कंपनीने इन डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर टेक्नॉलॉजी सह बाजारात आणला आहे. हा स्मार्टफोन एंडरॉयड 9.0 पाई आधारित फनटच 9.2 ओएस वर सादर झाला आहे जो 2गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड असलेल्या आक्टाकोर प्रोसेसर सह क्वालकॉमच्या स्नॅपड्रॅगॉन 665 चिपसेट वर चालतो. तसेच ग्राफिक्स साठी या फोन मध्ये एड्रेनो 610 जीपीयू आहे.

Vivo S1 Pro फिलिपिंस मध्ये 8 जीबी रॅम मेमरी सह लॉन्च केला गेला आहे तसेच फोन मध्ये 128 जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे. हा एक डुअल सिम फोन आहे जो 4जी वोएलटीई ला सपोर्ट करतो. पावर बॅकअप साठी Vivo S1 Pro मध्ये 18वॉट फास्ट चार्जिंग सपोर्ट असलेली 4500एमएएच ची मोठी बॅटरी देण्यात आली आहे. किंमत पाहता फिलिपिंस मध्ये हा फोन PHP 15,999 म्हणजे जवळपास 22,600 रुपयांमध्ये लॉन्च केला आहे तसेच Vivo S1 Pro फॅन्सी स्काई आणि नाईट ब्लॅक कलर मध्ये सेल साठी उपलब्ध होईल.

The post 4500एमएएच बॅटरी, 8 जीबी रॅम आणि 32एमपी सेल्फी कॅमेऱ्यासह लॉन्च झाला क्वॉड रियर कॅमेरा असलेला Vivo S1 Pro first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/vivo-s1-pro-launched-with-quad-rear-camera-4500mah-battery-8gb-ram-price-specifications-v17/feed/ 0
लॉन्चच्या आधीच समोर आला Vivo V17 चा खरा फोटो, सर्वात वेगळी असेल याची कॅमेरा डिजाईन https://www.91mobiles.com/marathi/vivo-v17-real-image-diamond-shape-rear-camera-setup-design-look-india-launch-soon/ https://www.91mobiles.com/marathi/vivo-v17-real-image-diamond-shape-rear-camera-setup-design-look-india-launch-soon/#respond Fri, 08 Nov 2019 12:25:28 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=5730 Vivo V17 बाजारात आल्यानंतर कंपनी Vivo V17 Pro बंद पण करू शकते.

The post लॉन्चच्या आधीच समोर आला Vivo V17 चा खरा फोटो, सर्वात वेगळी असेल याची कॅमेरा डिजाईन first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
91मोबाईल्सने महिन्याच्या सुरवातीला टेक कंपनी VIVO संबंधित एक एक्सक्लूसिव बातमी दिली होती, ज्यात कंपनीच्या ‘वी सीरीज’ च्या आगामी डिवाईस Vivo V17 ची माहिती दिली होती. रिपोर्ट मध्ये खुलासा केला गेला होता कि Vivo वी सीरीजच्या आगामी डिवाईस Vivo V17 चे प्रोडक्शन सुरु झाले आहे आणि हा स्मार्टफोन डिसेंबरच्या आधी सप्ताह भारतीय बाजारात येईल. आता Vivo V17 ची लाईव ईमेज पण इंटरनेट वर वायरल झाली आहे ज्यात फोनच्या लुक आणि डिजाईनचा खुलासा झाला आहे.

Vivo V17 चे फोटोज रशियन टेक पब्लिकेशन ने शेयर केले आहेत. या फोटोज मध्ये फोनचे फ्रंट आणि बॅक दोन्ही पॅनल्स दाखवण्यात आले आहेत जिथिन लॉन्चच्या आधीच Vivo V17 च्या लुक आणि डिजाईनची संपूर्ण माहिती मिळाली आहे. Vivo V17 चा रियर लुक चीन मध्ये लॉन्च होणाऱ्या Vivo S5 स्मार्टफोन सारखा दिसतो. फोनच्या बॅक पॅनल वर डायमंड शेप रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे तर फ्रंटला वॉटरड्राप नॉच आहे.

Vivo V17 लुक

फोनचा बॅक पॅनल पाहता या पॅनलच्या मधोमध रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे जो ‘डायमंड शेप’ मध्ये आहे. या कॅमेरा सेटअप मध्ये चार कॅमेरा सेंसर देण्यात आले आहेत. तीन सेंसर वर्टिकल शेप मध्ये आहेत तर चौथा सेंसर या तिन्ही सेंसरच्या उजवीकडे आहे. कॅमेरा सेंसर्सच्या डावीकडे कॅमेरा डिटेल्स आहेत. कॅमेरा सेटअपच्या डायमंड शेपच्या खाली फ्लॅश लाईट आहे. फोनच्या बॅक पॅनल वर खाली वर्टिकल शेप मध्ये Vivo Camera & Music लिहिण्यात आले आहे.

Vivo V17 च्या बॅक पॅनल वर कोणताही फिंगरप्रिंट सेंसर नाही, त्यामुळे बोलले जात आहे कि हा डिवाईस इन डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसरला सपोर्ट करेल. फोनचा फ्रंट पॅनल पाहता इथे बेजल लेस डिस्प्ले देण्यात आला आहे ज्याच्या वरच्या बाजूला ‘यू’ शेप नॉच आहे. डिस्प्लेच्या खाली थोडा रुंद चिन पार्ट देण्यात आला आहे. फोटो मध्ये फोनच्या उजवीकडील पॅनल वर वाल्यूम बटण आणि पावर रॉकर दाखवण्यात आला आहे.

Vivo V17 स्पेसिफिकेशन्स

फोनच्या स्पेसिफिकेशन्सची माहिती पण लीक द्वारे समोर आली आहे, ज्यानुसार हा स्मार्टफोन 6.38 इंचाच्या फुलएचडी+ एमोलेड डिस्प्ले सह लॉन्च केला जाईल. असे बोलले जात आहे कि Vivo V17 मध्ये इन डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर असेल. Vivo V17 मध्ये 8 जीबी पावरफुल रॅम असू शकतो ज्या सोबत 256 जीबी इंटरनल स्टोरेज मिळेल. Vivo V17 बाजारात एकापेक्षा जास्त वेरिएंट मध्ये लॉन्च केला जाऊ शकतो.

Vivo V17 क्वॉड रियर कॅमेरा सेटअप सह लॉन्च केला जाईल ज्यात प्राइमरी सेंसर 48 मेगापिक्सलचा असू शकतो. तर पावर बॅकअप साठी Vivo V17 मध्ये 4500एमएएच ची बॅटरी असल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे आम्हाला मिळलेल्या माहितीनुसार Vivo V17 भारतात 25,000 रुपयांच्या बजेट मध्ये लॉन्च केला जाईल आणि आमच्या टीमला अशी आबातमी पण मिळाली आहे कि Vivo V17 बाजारात आल्यानंतर कंपनी Vivo V17 Pro बंद पण करू शकते.

The post लॉन्चच्या आधीच समोर आला Vivo V17 चा खरा फोटो, सर्वात वेगळी असेल याची कॅमेरा डिजाईन first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/vivo-v17-real-image-diamond-shape-rear-camera-setup-design-look-india-launch-soon/feed/ 0
Exclusive : Vivo V17 Pro चा खरा फोटो बघा सर्वात आधी इथे, डुअल पॉप-अप सह असेल क्वॉड रियर कॅमेरा https://www.91mobiles.com/marathi/exclusive-vivo-v17-pro-real-photo-india-launch-confirmed-promoter-training-from-9-september/ https://www.91mobiles.com/marathi/exclusive-vivo-v17-pro-real-photo-india-launch-confirmed-promoter-training-from-9-september/#respond Wed, 04 Sep 2019 15:18:17 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=5226 Vivo V17 Pro 48-मेगापिक्सलच्या प्राइमरी रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करेल.

The post Exclusive : Vivo V17 Pro चा खरा फोटो बघा सर्वात आधी इथे, डुअल पॉप-अप सह असेल क्वॉड रियर कॅमेरा first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
91मोबाईल्सने गेल्या महिन्यात आपल्या एक्सक्लूसिव रिपोर्ट मध्ये सांगितले होते कि Vivo कंपनी लवकरच भारतात आपली ‘वी सीरीज’ वाढवणार आहे आणि या सीरीज अंतर्गत Vivo V17 Pro आणि Vivo V17 स्मार्टफोन लॉन्च केले जातील. आम्ही सांगितले होते कि Vivo V17 Pro कंपनी डुअल पॉप-अप सेल्फी कॅमेऱ्यासह लॉन्च करेल. म्हणजे फोनच्या पॉप-अप सेटअप वर दोन सेल्फी सेंसर दिले जातील. आता Vivo V17 सीरीजच्या आगामी स्मार्टफोनचा अधिकृत पोस्टर पण समोर आला आहे ज्यात डुअल पॉप-अप सेल्फी कॅमेरा समोर आला आहे.

Vivo V17 Pro लवकरच भारतात लॉन्च होणार आहे. अश्या बातम्या आतापर्यंत फक्त लीक्स मधेच समोर येत होत्या पण 91मोबाईल्स आज Vivo V17 Pro च्या भारतातील इंडिया लॉन्चच्या बातमीवर शिकामोर्तब केला आहे. फोन लॉन्चच्या आधी आम्ही Vivo की V17 Pro संबंधित स्ट्रॅटेजीची माहिती मिळाली आहे कि कंपनी या आठवड्यात 9 तारखेला भारतात Vivo V17 Pro ट्रेनिंग सुरु करत आहे ज्यात वीवो प्रोमोटर्सना स्मार्टफोनच्या फीचर्स, स्पेसिफिकेशन्स आणि किंमत व सेल संबंधित माहिती तसेच कंपनीचे प्लानिंग सांगण्यात येईल.

Vivo V17 Pro ची हि खास ट्रेनिंग 9 सप्टेंबर पासून सुरु होईल. इंडस्ट्रीमधील सूत्रांकडून मिळालेल्या माहिती नुसार फोन ट्रेनिंग संपल्यावर कंपनी हा फोन डिजीटल मीडिया वर टीज करायला सुरवात करेल, त्यानंतर काही आठवडयांनी हा स्मार्टफोन इंडियन मार्केट मध्ये लॉन्च केला जाईल. Vivo V17 Pro पाहता हा स्मार्टफोन वीवो चा पहिला स्मार्टफोन आहे जो 6 कॅमेरा सेंसर्सना सपोर्ट करतो.

आम्हाला मिळालेल्या Vivo V17 Pro पोस्टर मध्ये हा स्मार्टफोन बॉलीवुड अभिनेता आमिर खानच्या हातात आहे. फोनचा लुक पाहता हा फोन फुलव्यू बेजल लेस डिजाईन वर बनला आहे. डिस्प्ले वर कोणतीही नॉच किंवा इतर कोणताही सेंसर नाही. डिस्प्लेच्या चारही कडा पूर्णपणे बेजल लेस आहेत. सेल्फी साठी फोन मध्ये पॉप-अप मेकॅनिज्म देण्यात आले आहे. त्याचप्रमाणे Vivo V17 Pro च्या बॅक पॅनल वर क्वॉड रियर कॅमेरा सेटअप दिला जाईल. हा कॅमेरा सेटअप फोनच्या बॅक पॅनल वर वर्टिकल शेप मध्ये दिला जाईल. या कॅमेरा सेटअप मध्ये फ्लॅश लाईट असेल. दोन सेंसर फ्लॅशच्या वर असतील तर दोन कॅमेरा सेंसर फ्लॅश लाईटच्या खाली आहेत.

यूनिक कॅमेरा सेग्मेंट

Vivo V17 Pro ची सर्वात मोठी खासियत फोनचा कॅमेरा सेटअप असेल. फोनच्या फ्रंट पॅनल वर 2 कॅमेरा सेंसर मिळेल तसेच बॅक पॅनल वर 4 सेंसर असलेला क्वॉड रियर कॅमेरा सेटअप असेल. सेल्फी कॅमेरा पाहता इथे दोन्ही सेंसर पॉप-अप मेकॅनिज्म वर असतील. विशेष म्हणजे आतापर्यंत सिंगल पॉप-अप सेल्फी कॅमेरा आणि शार्कफिन पॉप-अप सेल्फी कॅमेरा असलेले फोन बाजारात आले आहेत. डुअल पॉप-अप सेल्फी कॅमेऱ्यासह लॉन्च होणारा Vivo V17 Pro पहिला स्मार्टफोन असेल. Vivo V17 Pro 48-मेगापिक्सलच्या प्राइमरी रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करेल.

स्पेसिफिकेशन्स

Vivo V17 Pro च्या बॅक पॅनल वर फिंगरप्रिंट सेंसर नाही त्यामुळे असे म्हणता येईल कि वीवो आपला फोन इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर सह बाजारात आणेल. Vivo V17 Pro चे स्पेसिफिकेशन्स अजूनतरी समोर आले नाहीत पण मीडिया रिपोर्ट्स नुसार फोन मध्ये 48-मेगापिक्सल प्राइमरी रियर कॅमेऱ्यासह 8-मेगापिक्सल, 5-मेगापिक्सल आणि 2-मेगापिक्सलचे कॅमेरा सेंसर्स दिले जाऊ शकतात आणि डुअल पॉप-अप कॅमेऱ्यावर 16-मेगापिक्सलचा सेंसर मिळू शकतो.

Vivo V17 Pro कंपनी क्वालकॉमच्या स्नॅपड्रॅगॉन 730 चिपसेट वर लॉन्च करू शकते जो भारतात 6जीबी रॅम आणि 8जीबी रॅम मेमरी असलेल्या दोन वेरिएंट्स मध्ये सेल साठी उपलब्ध होईल. त्याचबरोबर Vivo V17 Pro मध्ये 128जीबी आणि 256जीबी ची इंटरनल स्टोरेज मिळू शकते. आशा आहे कि 6 सप्टेंबरला Vivo Z1x भारतात लॉन्च झाल्यानंतर काही दिवसांनी कंपनी V17 Series पण सादर करेल. Vivo V17 Pro भारतात कधी लॉन्च होईल हे आम्ही लवकरच तुम्हाला सांगू.

The post Exclusive : Vivo V17 Pro चा खरा फोटो बघा सर्वात आधी इथे, डुअल पॉप-अप सह असेल क्वॉड रियर कॅमेरा first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/exclusive-vivo-v17-pro-real-photo-india-launch-confirmed-promoter-training-from-9-september/feed/ 0