लॉन्चच्या आधीच समोर आला Vivo V17 चा खरा फोटो, सर्वात वेगळी असेल याची कॅमेरा डिजाईन

91मोबाईल्सने महिन्याच्या सुरवातीला टेक कंपनी VIVO संबंधित एक एक्सक्लूसिव बातमी दिली होती, ज्यात कंपनीच्या ‘वी सीरीज’ च्या आगामी डिवाईस Vivo V17 ची माहिती दिली होती. रिपोर्ट मध्ये खुलासा केला गेला होता कि Vivo वी सीरीजच्या आगामी डिवाईस Vivo V17 चे प्रोडक्शन सुरु झाले आहे आणि हा स्मार्टफोन डिसेंबरच्या आधी सप्ताह भारतीय बाजारात येईल. आता Vivo V17 ची लाईव ईमेज पण इंटरनेट वर वायरल झाली आहे ज्यात फोनच्या लुक आणि डिजाईनचा खुलासा झाला आहे.

Vivo V17 चे फोटोज रशियन टेक पब्लिकेशन ने शेयर केले आहेत. या फोटोज मध्ये फोनचे फ्रंट आणि बॅक दोन्ही पॅनल्स दाखवण्यात आले आहेत जिथिन लॉन्चच्या आधीच Vivo V17 च्या लुक आणि डिजाईनची संपूर्ण माहिती मिळाली आहे. Vivo V17 चा रियर लुक चीन मध्ये लॉन्च होणाऱ्या Vivo S5 स्मार्टफोन सारखा दिसतो. फोनच्या बॅक पॅनल वर डायमंड शेप रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे तर फ्रंटला वॉटरड्राप नॉच आहे.

Vivo V17 लुक

फोनचा बॅक पॅनल पाहता या पॅनलच्या मधोमध रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे जो ‘डायमंड शेप’ मध्ये आहे. या कॅमेरा सेटअप मध्ये चार कॅमेरा सेंसर देण्यात आले आहेत. तीन सेंसर वर्टिकल शेप मध्ये आहेत तर चौथा सेंसर या तिन्ही सेंसरच्या उजवीकडे आहे. कॅमेरा सेंसर्सच्या डावीकडे कॅमेरा डिटेल्स आहेत. कॅमेरा सेटअपच्या डायमंड शेपच्या खाली फ्लॅश लाईट आहे. फोनच्या बॅक पॅनल वर खाली वर्टिकल शेप मध्ये Vivo Camera & Music लिहिण्यात आले आहे.

Vivo V17 च्या बॅक पॅनल वर कोणताही फिंगरप्रिंट सेंसर नाही, त्यामुळे बोलले जात आहे कि हा डिवाईस इन डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसरला सपोर्ट करेल. फोनचा फ्रंट पॅनल पाहता इथे बेजल लेस डिस्प्ले देण्यात आला आहे ज्याच्या वरच्या बाजूला ‘यू’ शेप नॉच आहे. डिस्प्लेच्या खाली थोडा रुंद चिन पार्ट देण्यात आला आहे. फोटो मध्ये फोनच्या उजवीकडील पॅनल वर वाल्यूम बटण आणि पावर रॉकर दाखवण्यात आला आहे.

Vivo V17 स्पेसिफिकेशन्स

फोनच्या स्पेसिफिकेशन्सची माहिती पण लीक द्वारे समोर आली आहे, ज्यानुसार हा स्मार्टफोन 6.38 इंचाच्या फुलएचडी+ एमोलेड डिस्प्ले सह लॉन्च केला जाईल. असे बोलले जात आहे कि Vivo V17 मध्ये इन डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर असेल. Vivo V17 मध्ये 8 जीबी पावरफुल रॅम असू शकतो ज्या सोबत 256 जीबी इंटरनल स्टोरेज मिळेल. Vivo V17 बाजारात एकापेक्षा जास्त वेरिएंट मध्ये लॉन्च केला जाऊ शकतो.

Vivo V17 क्वॉड रियर कॅमेरा सेटअप सह लॉन्च केला जाईल ज्यात प्राइमरी सेंसर 48 मेगापिक्सलचा असू शकतो. तर पावर बॅकअप साठी Vivo V17 मध्ये 4500एमएएच ची बॅटरी असल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे आम्हाला मिळलेल्या माहितीनुसार Vivo V17 भारतात 25,000 रुपयांच्या बजेट मध्ये लॉन्च केला जाईल आणि आमच्या टीमला अशी आबातमी पण मिळाली आहे कि Vivo V17 बाजारात आल्यानंतर कंपनी Vivo V17 Pro बंद पण करू शकते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here