Vivo V1921A - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Thu, 06 Jul 2023 08:24:48 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 31 जुलैला लॉन्च होईल 8जीबी रॅम आणि 48-एमपी ट्रिपल रियर कॅमेरा असलेला Vivo Z5 https://www.91mobiles.com/marathi/vivo-z5-v1921a-to-launch-on-31-july-specs-revealed/ https://www.91mobiles.com/marathi/vivo-z5-v1921a-to-launch-on-31-july-specs-revealed/#respond Wed, 17 Jul 2019 10:56:03 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=4816 हा फोन येत्या 31 जुलैला बाजारात येईल.

The post 31 जुलैला लॉन्च होईल 8जीबी रॅम आणि 48-एमपी ट्रिपल रियर कॅमेरा असलेला Vivo Z5 first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Vivo बद्दल कालच एक माहिती समोर आली होती ज्यात कंपनीचा एक आगामी स्मार्टफोन चीनी बेंचमार्किंग साइट गीकबेंच वर लिस्ट झाला होता. गीकबेंच वर हा फोन V1921A मॉडेल नंबर सह लिस्टकेला गेला होता. या मॉडेल नंबर सह हा स्मार्टफोन याआधी सर्टिफिकेशन्स साइट टेना वर पण लिस्ट झाला आहे. तर आज पुन्हा याच स्मार्टफोन संबंधित एक नवीन बातमी समोर आली आहे ज्यात सांगण्यात आले आहे कि Vivo V1921A मॉडेल नंबर असलेला स्मार्टफोन Vivo Z5 नावाने टेक मंचावर सादर केला जाईल आणि हा फोन येत्या 31 जुलैला बाजारात येईल.

Vivo Z5 च्या लॉन्च संबंधित बातमी चीन मधून आली आहे. मीडिया रिपोर्ट्स मध्ये सांगण्यात आले आहे कि कंपनी येत्या 31 जुलैला चीन मध्ये एका ईवेंटचे आयोजन करणार आहे आणि या ईवेंटच्या मंचावरून Vivo Z5 सादर केला जाईल. Vivo Z5 ची टीजर ईमेज पण चीन मध्ये शेयर करण्यात आली आहे ज्यात लॉन्च डेट 31 जुलैचा खुलासा झाला आहे. रिपोर्ट्स नुसार Vivo Z5 तोच स्मार्टफोन आहे जो गेल्या काही दिवसांत Vivo V1921A मॉडेल नंबर सह समोर आला होता.

हे देखील वाचा: 4,500एमएएच बॅटरी, तीन रियर कॅमेरा आणि 32MP सेल्फी कॅमेरा सह आला Vivo S1 चा ग्लोबल वेरिएंट, जाणून घ्या किंमत

Vivo Z5

आतापर्यंत समोर आलेल्या Vivo V1921A च्या लिस्टिंग नुसार Vivo Z5 कंपनी द्वारा 1080 x 2340 पिक्सल रेज्ल्यूशन वाल्या 6.38-इंचाच्या फुलएचडी+ एमोलेड डिस्प्ले वर लॉन्च केला जाऊ शकतो. मीडिया रिपोर्ट्स मध्ये सांगण्यात आले आहे कि हा फोन इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर टेक्नोलॉजी सह बाजारात येईल. लिस्टिंग नुसार Vivo Z5 एंडरॉयड 9 पाई सह फनटच ओएस 9.0 वर चालेल.

Vivo Z5 बद्दल बोलले जात आहे कि हा फोन 8जीबी रॅम आणि 6जीबी रॅम सह लॉन्च केला जाऊ शकतो तसेच फोन मध्ये 64जीबी मेमरी, 128जीबी मेमरी आणि 256जीबी ची इंटरनल स्टोरेज मिळू शकते. लिस्टिंग मध्ये फोनच्या चिपसेटची माहिती तर समोर आली नाही पण असे समजले आहे कि Vivo Z5 मध्ये 2.3गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड वाला आक्टा-कोर प्रोसेसर दिला जाईल.

हे देखील वाचा: Xiaomi चा मास्टर स्ट्रोक, भारतात लॉन्च झाले फ्लॅगशिप किलर Redmi K20 आणि K20 Pro

फोटोग्राफी साठी वीवोच्या या फोन मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप मिळू शकतो. टेना नुसार Vivo V1921A मॉडेल नंबर वाला फोन म्हणजे Vivo Z5 मध्ये 48-मेगापिक्सलचा प्राइमरी कॅमेरा सेंसर मिळेल तसेच बॅक पॅनल वर 8-मेगापिक्सलचा सेकेंडरी सेंसर आणि 2-मेगापिक्सलची तिसरी लेंस दिली जाऊ शकतो. त्याचबरोबर सेल्फी साठी Vivo Z5 मध्ये 32-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा मिळू शकतो. सांगण्यात आले आहे कि या फोन मध्ये गूगल असिस्टेंट बटण दिला जाईल. तसेच पावर बॅकअप साठी Vivo Z5 मध्ये 22.5वॉट फास्ट चार्जिंग सपोर्ट असेलली 4,420एमएएच ची बॅटरी मिळू शकते.

वीवो झेड1 प्रो वीडियो

The post 31 जुलैला लॉन्च होईल 8जीबी रॅम आणि 48-एमपी ट्रिपल रियर कॅमेरा असलेला Vivo Z5 first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/vivo-z5-v1921a-to-launch-on-31-july-specs-revealed/feed/ 0
8जीबी रॅम, 48-एमपी ट्रिपल रियर कॅमेरा आणि 4420एमएएच बॅटरी सह Vivo चा नवीन फोन लीक https://www.91mobiles.com/marathi/vivo-v1921a-tenna-listing-specifications-leaked/ https://www.91mobiles.com/marathi/vivo-v1921a-tenna-listing-specifications-leaked/#respond Tue, 09 Jul 2019 12:53:33 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=4758 Vivo चा हा आगामी स्मार्टफोन चीनी सर्टिफिकेशन्सा साइट टेना वर लिस्ट केला गेला आहे तिथे फोनच्या डिजाईन सोबतच याच्या स्पेसिफिकेशन्सचा पण खुलासा झाला आहे.

The post 8जीबी रॅम, 48-एमपी ट्रिपल रियर कॅमेरा आणि 4420एमएएच बॅटरी सह Vivo चा नवीन फोन लीक first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Vivo बद्दल गेल्याच आठवड्यात आम्ही माहिती दिली होती कि हि टेक कंपनी एका नवीन स्मार्टफोन वर काम करत आहे जो Vivo Y90 नावाने याच महिन्यात भारतात लॉन्च केला जाईल. आपल्या रिपोर्ट मध्ये आम्ही Vivo Y90 च्या अनेक महत्वाच्या स्पेसिफिकेशन्सची माहिती दिली होती. आता Vivo च्या अजून एका नवीन स्मार्टफोनची माहिती समोर येत आहे. Vivo चा हा आगामी स्मार्टफोन चीनी सर्टिफिकेशन्सा साइट टेना वर लिस्ट केला गेला आहे तिथे फोनच्या डिजाईन सोबतच याच्या स्पेसिफिकेशन्सचा पण खुलासा झाला आहे.

Vivo चा हा आगामी स्मार्टफोन टेना वर V1921A मॉडेल नंबर सह लिस्ट केला गेला आहे. सर्टिफिकेशन्स साइट वर फोनच्या नावाचा खुलासा झाला नाही पण तिथे Vivo V1921A च्या स्पेसिफिकेशन्सची माहिती उपलब्द आहे. समोर आलेल्या माहितीनुसार हा स्मार्टफोन वॉटरड्रॉप नॉच डिस्प्ले वर सादर केला जाऊ शकतो. Vivo च्या या फोन मध्ये इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर मिळेल. टेना वर फोनचे डायमेंशन 159.53 x 75.23 x 8.13एमएम आणि वजन 189.6 ग्राम सांगण्यात आले आहे.

हे देखील वाचा: 4जीबी रॅम सह Realme 3i वेबसाइट वर लिस्ट, 15 जुलैला होईल इंडिया मध्ये लॉन्च

स्पेसिफिकेशन्स

Vivo V1921A चे स्पेसिफिकेशन्स पाहता टेना नुसार हा स्मार्टफोन 6.38-इंचाच्या एमोलेड डिस्प्ले वर लॉन्च केला जाऊ शकतो. लीक नुसार हा डिस्प्ले फुलएचडी+ म्हणजे रेज्ल्यूशनचा असेल. टेना वर हा फोन एंडरॉयड 9.0 आधारित असल्याचे सांगण्यात आले आहे जो फनटच ओएस 9.0 वर चालेल. लिस्टिंग मध्ये चिपसेटची माहिती समजली नाही पण असे समजले आहे कि फोन मध्ये 2.3गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड वाला आक्टा-कोर प्रोसेसर दिला जाईल.

टेना नुसार Vivo V1921A मॉडेल नंबर वाला स्मार्टफोन 6जीबी रॅम किंवा 8जीबी रॅम सह लॉन्च केला जाऊ शकतो जो 64जीबी मेमरी, 128जीबी मेमरी आणि 256जीबी स्टोरेज वाल्या वेरिएंट्स मध्ये बाजारात येईल. वीवोच्या या फोन मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप असल्याचे समोर आले आहे. टेना नुसार Vivo V1921A मॉडेल नंबर वाल्या फोन मध्ये 48-मेगापिक्सलचा प्राइमरी कॅमेरा सेंसर मिळेल.

हे देखील वाचा: फक्त 7,999 रुपयांमध्ये लॉन्च झाला 4000एमएमएच बॅटरी आणि 4 कॅमेरा असलेला Infinix Hot 7

इतर कॅमेरा सेंसर्स पाहता बॅक पॅनल वर 8-मेगापिक्सलचा सेकेंडरी सेंसर आणि 2-मेगापिक्सलची तिसरी लेंस दिली जाऊ शकते. तसेच सेल्फी साठी या फोन मध्ये 32-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा मिळू शकतो. टेनानुसार Vivo V1921A मध्ये गूगल असिस्टेंट साठी वेगळा फिजिकल बटण दिला जाईल. तसेच पावर बॅकअप साठी या फोन मध्ये 4,420एमएएच ची बॅटरी मिळू शकते जी 22.5वॉट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करेल.

The post 8जीबी रॅम, 48-एमपी ट्रिपल रियर कॅमेरा आणि 4420एमएएच बॅटरी सह Vivo चा नवीन फोन लीक first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/vivo-v1921a-tenna-listing-specifications-leaked/feed/ 0