8जीबी रॅम, 48-एमपी ट्रिपल रियर कॅमेरा आणि 4420एमएएच बॅटरी सह Vivo चा नवीन फोन लीक

Vivo बद्दल गेल्याच आठवड्यात आम्ही माहिती दिली होती कि हि टेक कंपनी एका नवीन स्मार्टफोन वर काम करत आहे जो Vivo Y90 नावाने याच महिन्यात भारतात लॉन्च केला जाईल. आपल्या रिपोर्ट मध्ये आम्ही Vivo Y90 च्या अनेक महत्वाच्या स्पेसिफिकेशन्सची माहिती दिली होती. आता Vivo च्या अजून एका नवीन स्मार्टफोनची माहिती समोर येत आहे. Vivo चा हा आगामी स्मार्टफोन चीनी सर्टिफिकेशन्सा साइट टेना वर लिस्ट केला गेला आहे तिथे फोनच्या डिजाईन सोबतच याच्या स्पेसिफिकेशन्सचा पण खुलासा झाला आहे.

Vivo चा हा आगामी स्मार्टफोन टेना वर V1921A मॉडेल नंबर सह लिस्ट केला गेला आहे. सर्टिफिकेशन्स साइट वर फोनच्या नावाचा खुलासा झाला नाही पण तिथे Vivo V1921A च्या स्पेसिफिकेशन्सची माहिती उपलब्द आहे. समोर आलेल्या माहितीनुसार हा स्मार्टफोन वॉटरड्रॉप नॉच डिस्प्ले वर सादर केला जाऊ शकतो. Vivo च्या या फोन मध्ये इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर मिळेल. टेना वर फोनचे डायमेंशन 159.53 x 75.23 x 8.13एमएम आणि वजन 189.6 ग्राम सांगण्यात आले आहे.

हे देखील वाचा: 4जीबी रॅम सह Realme 3i वेबसाइट वर लिस्ट, 15 जुलैला होईल इंडिया मध्ये लॉन्च

स्पेसिफिकेशन्स

Vivo V1921A चे स्पेसिफिकेशन्स पाहता टेना नुसार हा स्मार्टफोन 6.38-इंचाच्या एमोलेड डिस्प्ले वर लॉन्च केला जाऊ शकतो. लीक नुसार हा डिस्प्ले फुलएचडी+ म्हणजे रेज्ल्यूशनचा असेल. टेना वर हा फोन एंडरॉयड 9.0 आधारित असल्याचे सांगण्यात आले आहे जो फनटच ओएस 9.0 वर चालेल. लिस्टिंग मध्ये चिपसेटची माहिती समजली नाही पण असे समजले आहे कि फोन मध्ये 2.3गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड वाला आक्टा-कोर प्रोसेसर दिला जाईल.

टेना नुसार Vivo V1921A मॉडेल नंबर वाला स्मार्टफोन 6जीबी रॅम किंवा 8जीबी रॅम सह लॉन्च केला जाऊ शकतो जो 64जीबी मेमरी, 128जीबी मेमरी आणि 256जीबी स्टोरेज वाल्या वेरिएंट्स मध्ये बाजारात येईल. वीवोच्या या फोन मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप असल्याचे समोर आले आहे. टेना नुसार Vivo V1921A मॉडेल नंबर वाल्या फोन मध्ये 48-मेगापिक्सलचा प्राइमरी कॅमेरा सेंसर मिळेल.

हे देखील वाचा: फक्त 7,999 रुपयांमध्ये लॉन्च झाला 4000एमएमएच बॅटरी आणि 4 कॅमेरा असलेला Infinix Hot 7

इतर कॅमेरा सेंसर्स पाहता बॅक पॅनल वर 8-मेगापिक्सलचा सेकेंडरी सेंसर आणि 2-मेगापिक्सलची तिसरी लेंस दिली जाऊ शकते. तसेच सेल्फी साठी या फोन मध्ये 32-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा मिळू शकतो. टेनानुसार Vivo V1921A मध्ये गूगल असिस्टेंट साठी वेगळा फिजिकल बटण दिला जाईल. तसेच पावर बॅकअप साठी या फोन मध्ये 4,420एमएएच ची बॅटरी मिळू शकते जी 22.5वॉट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here