4जीबी रॅम सह Realme 3i वेबसाइट वर लिस्ट, 15 जुलैला होईल इंडिया मध्ये लॉन्च

Realme येत्या 15 जुलैला भारतात एका मोठ्या ईवेंटचे आयोजन करणार आहे आणि या ईवेंटच्या मंचावरून दोन नवीन फोन लॉन्च केले जातील. या स्मार्टफोन्स मध्ये कंपनी आपला पहिला पॉप-सेल्फी कॅमेरा असलेला स्मार्टफोन Realme X आणि सोबतच लो बजेट स्मार्टफोन Realme 3i स्मार्टफोन याचा समावेश असेल. आजच Realme 3i संबंधित बातमी पब्लिश केली होती ज्यात फोनच्या फ्लिपकार्ट लिस्टिंगचा उल्लेख केला गेला होता. तसेच आता लॉन्चच्या आधीच हा स्मार्टफोन चीनी बेंचमार्किंग साइट गीकबेंच वर पण लिस्ट झाला आहे.

Realme 3i ची हि बेंचमार्किंग लिस्टिंग 9 जुलै म्हणजे आजची आहे. हा फोन RMX1827 मॉडेल नंबर सह लिस्ट केला गेला आहे जो एमएसपी वेबसाइट ने स्पॉट केला आहे. गीकबेंच वर Realme 3i संबंधित महत्वाची माहिती व स्पेसिफिकेशन्सचा खुलासा झाला आहे. गीकबेंच नुसार Realme 3i एंडरॉयड 9.0 पाई ओएस वर सादर केला जाईल सोबतच हा फोन आक्टाकोर प्रोसेसर आणि मीडियाटेक हेलीया पी60 चिपसेट वर चालेल.

गीकबेंच वर Realme 3i 4जीबी रॅम सह येणार असल्याचे सांगण्यात आले आहे. सोबतच असे बोलले जात आहे कि कंपनी आपला हा आगामी स्मार्टफोन एकापेक्षा जास्त वेरिंएट्स मध्ये लॉन्च केला जाऊ शकतो. गीकबेंच स्कोर पाहता Realme 3i ला सिंगल-कोर मध्ये सर्टिफिकेशन्स साइट द्वारा 1420 स्कोर देण्यात आला आहे तर मल्टी-कोर मध्ये या फोनला 5070 स्कोर मिळाला आहे.

फ्लिपकार्ट लिस्टिंग

Realme 3i साठी ई-कॉमर्स साइट फ्लिपकार्ट वर प्रोडक्ट पेज बनवण्यात आले आहे. या पेज वर एक फोनची स्केच ईमेज दाखवण्यात आली आहे ज्यात वॉटरड्रॉप नॉच दिसत आहे. फोटो पाहून असे म्हणता येईल कि Realme 3i पण कंपनी द्वारा वॉटरड्रॉप नॉच वर लॉन्च केला जाईल. Realme 3i ला कंपनीने ‘स्मार्टफोनचा चॅम्पीयन’ म्हटले आहे. या प्रोडक्ट पेज नुसार हा स्मार्टफोन मोठ्या डिस्प्ले, पावरफुल कॅमेरा आणि दमदार बॅटरी सह लॉन्च केला जाऊ शकतो.

हे देखील वाचा: फक्त 7,999 रुपयांमध्ये लॉन्च झाला 4000एमएमएच बॅटरी आणि 4 कॅमेरा असलेला Infinix Hot 7

Realme 3 Pro

Realme 3 Pro पाहता हा फोन 19:9 आसपेक्ट रेशियो वर सादर केला गेला आहे जो गोरिल्ला ग्लास 6 ने प्रोटेक्टेड 6.3-इंचाच्या फुलएचडी+ डिस्प्लेला सपोर्ट करतो. Realme 3 Pro एंडरॉयड 9 पाई वर सादर केला आहे जो कलरओएस 6.0 आधारित आहे. हा फोन क्वालकॉमच्या 10 नॅनोमीटर फॅब्रिकेशन वाल्या स्नॅपड्रॅगॉन 710 चिपसेट वर चालतो आणि यात 2.2 गीगाहट्र्जचा ऑक्टाकोर प्रोसेसर आहे. सोबतच एड्रीनो 616जीपीयू आहे.

Realme 3 Pro मध्ये 25-मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे जो एआई ब्यूटी फिल्टर्स सह येतो. तसेच बॅक पॅनल वर डुअल रियर कॅमेरा आहे ज्यात एक सेंसर 16-मेगापिक्सलचा आहे तर दुसरा 5-मेगापिक्सलचा आहे. हा कॅमेरा सेटअप बोका इफेक्ट सोबत सुपर स्लो मोशन वीडियो रेकॉर्डिंगला पण सपोर्ट करतो. तसेच कंपनीने हा पिक्सल बिनिंग फीचर सह दिला आहे मेन कॅमेरा 64एमपी पिक्सल रेजल्यूशन वर फोटो घेऊ शकतो.

हे देखील वाचा: Nokia 6.1 ची किंमत पुन्हा झाली कमी, 16,999 रुपयांचा फोन आता विकत घेता येईल फक्त 6,999 रुपयांमध्ये

डुअल सिम आणि 4जी वोएलटीई सपोर्ट सोबत Realme 3 Pro मध्ये बेसिक कनेक्टिविटी फीचर्स आहेत. सिक्योरिटी साठी फोनच्या बॅक पॅनल वर फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे तसेच हा फोन फेस अनलॉक फीचरला पण सपोर्ट करतो. तसेच पावर बॅकअप साठी Realme 3 Pro मध्ये 4,045एमएएच ची मोठी बॅटरी देण्यात आली आहे जी फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.

रियलमी एक्स वीडियो

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here