Vivo S1 भारतात लॉन्च होणार असल्याची माहिती 91मोबाईल्सने काही दिवसांपूर्वी दिली होती. भारताआधी कंपनीने हा ग्लोबल मार्केट मध्ये उपलब्ध केला आहे. चीनी मार्केट मध्ये लॉन्च केल्यानंतर जवळपास चार महिन्यानंतर कंपनीने वीवो एस1 इंडोनेशिया मध्ये लॉन्च केला आहे.
आधी सांगितल्याप्रमाणे वीवो एस1 च्या चीनी वेरिएंट आणि ग्लोबल वेरिएंट मध्ये काही फरक आहे जसे कि बॅटरी, प्रोसेसर, डिस्प्ले साइज आणि डिजाइन. चीनी वेरिएंट मध्ये पॉप-अप सेल्फी कॅमेरा होता, तर ग्लोबल वेरिेएंट वाटरड्रॉप नॉच वाला आहे. ग्लोबल वेरिएंट कंपनी लवकरच भारतात लॉन्च करेल. चला त्याआधी इंडोनेशिया मध्ये आलेल्या या फोनच्या स्पेसिफिकेशन्सची माहिती घेऊ.

इंडोनेशियाई मार्केट मध्ये वीवो एस1 कंपनीने जवळपास 17,700 रुपयांमध्ये लॉन्च केला आहे. फोन कॉस्मिक ग्रीन आणि स्काइलाइन ब्लू कलर ऑप्शन मध्ये सादर केला गेला आहे. आशा आहे कि याच किंमतीच्या आसपास फोन भारतात लॉन्च केला जाईल.
हे देखील वाचा: Xiaomi चा मास्टर स्ट्रोक, भारतात लॉन्च झाले फ्लॅगशिप किलर Redmi K20 आणि K20 Pro
स्पेसिफिकेशन्स
वीवो एस1 च्या ग्लोबल वेरिएंट मध्ये 6.38-इंचाचा फुल-एचडी+ (1080×2340 पिक्सल) सुपर एमोलेड डिस्प्ले देण्यात आला आहे. तसेच फोन मीडियाटेक हीलियो पी65 प्रोसेसर आणि 4 जीबी रॅम सह येतो. फोन मध्ये 128जीबी ची इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे.
फोटोग्राफी साठी फोनच्या मागे तीन कॅमेरा आहेत. मागे एफ/ 1.78 अपर्चर वाला 16-मेगापिक्सलचा प्राइमरी सेंसर आहे. सोबतच एफ/ 2.2 अपर्चर वाला वाइड-एंगल 8-मेगापिक्सलचा सेकेंडरी कॅमेरा आणि एफ/ 2.4 अपर्चर वाला 2-मेगापिक्सलचा तीसरा सेंसर आहे. तसेच वीडियो कॉलिंग आणि सेल्फी साठी फोन मध्ये एफ/ 2.0 अपर्चर वाला 32-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे.
हे देखील वाचा: 8जीबी रॅम आणि पॉप-अप कॅमेऱ्यासह 19 जुलैला लॉन्च होईल Oppo K3, कंपनीने दिली माहिती
कनेक्टिविटी फीचर मध्ये वाई-फाई, ब्लूटूथ 5, यूएसबी ओटीजी, माइक्रो-यूएसबी आणि जीपीएस आहे. पावर बॅकअप साठी कंपनीने यात 4,500 एमएएच ची बॅटरी दिली आहे. सोबतच हा फोन एंडरॉयड 9 पाई वर आधारित फनटच ओएस 9 वर चालतो.















