Vivo Y31 - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Wed, 20 Jan 2021 11:29:20 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 10 दिवसांत चौथा फोन घेऊन आली वीवो, आज लाॅन्च केला 6 जीबी रॅम आणि 5,000एमएएच बॅटरी असलेला Vivo Y31 स्मार्टफोन https://www.91mobiles.com/marathi/vivo-y31-india-launch-price-at-rs-16490-specs-sale-offer/ https://www.91mobiles.com/marathi/vivo-y31-india-launch-price-at-rs-16490-specs-sale-offer/#respond Wed, 20 Jan 2021 11:29:20 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=9707 Vivo Y31 अँड्रॉइडच्या लेटेस्ट ओएस अँड्रॉइड 11 वर लाॅन्च केला गेला आहे जो फनटच ओएस 11 सह चालतो. प्रोसेसिंगसाठी या फोन मध्ये आक्टा-कोर प्रोसेसर सह क्वाॅलकाॅमचा स्नॅपड्रॅगॉन 662 चिपसेट आहे.

The post 10 दिवसांत चौथा फोन घेऊन आली वीवो, आज लाॅन्च केला 6 जीबी रॅम आणि 5,000एमएएच बॅटरी असलेला Vivo Y31 स्मार्टफोन first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
VIVO कंपनी नवीन वर्षाच्या सुरवातीला आक्रमक दिसत आहे. अजून 2021 चा पहिला महीना पण संपला नाही आणि वीवोने तीन नवीन स्मार्टफोन Vivo Y12s, Vivo Y20G आणि Vivo Y51a भारतीय बाजारात लाॅन्च केले आहेत. आपला हा वेग कायम ठेवत वीवोने आज पुन्हा एक नवीन मोबाईल फोन Vivo Y31 भारतीय बाजारात लाॅन्च केला आहे. ‘वाय सीरीज’ मध्ये जोडलेला हा स्मार्टफोन 16,490 रुपयांमध्ये लाॅन्च झाला आहे जो ऑनलाइन शाॅपिंग साइट सोबतच ऑफलाइन रिटेल स्टोर वर पण विक्रीसाठी उपलब्ध होईल.

Vivo Y31

वीवो वाय31 चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स पाहता हा स्मार्टफोन 20:9 आस्पेक्ट रेशियो वर सादर केला गेला आहे जो 2408 × 1080 पिक्सल रेज्ल्यूशन असलेल्या 6.58 इंचाच्या फुलएचडी+ आयपीएस एलसीडी डिस्प्लेला सपोर्ट करतो. हि वाॅटरड्राॅप नाॅच स्क्रीन आहे जिच्या तीन कडा पूर्णपणे बेजल लेस आहेत तर खालच्या बाजूला बारीक चिन पार्ट देण्यात आला आहे. डिस्प्लेच्या वरच्या बाजूला मध्यभागी सेल्फी कॅमेरा असलेली ‘यू’ शेप नाॅच देण्यात आली आहे.

हे देखील वाचा : 5000mAh बॅटरी आणि 6GB सह लॉन्च झाला Vivo Y20G, जाणून घ्या किंमत

Vivo Y31 अँड्रॉइडच्या लेटेस्ट ओएस अँड्रॉइड 11 वर लाॅन्च केला गेला आहे जो फनटच ओएस 11 सह चालतो. प्रोसेसिंगसाठी या फोन मध्ये आक्टा-कोर प्रोसेसर सह क्वाॅलकाॅमचा स्नॅपड्रॅगॉन 662 चिपसेट आहे. वीवो वाय31 भारतीय बाजारात एकच वेरिएंट मध्ये लाॅन्च केला गेला आहे जो 6 जीबी की रॅम सह 128 जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो.

Vivo Y31

फोटोग्राफी सेग्मेंट पाहता वीवो वाय31 ट्रिपल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनल वर एलईडी फ्लॅश सह 48 मेगापिक्सलचा प्राइमरी सेंसर देण्यात आला आहे जो एफ/1.79 अपर्चरला सपोर्ट करतो. तसेच फोन मध्ये एफ/2.4 अपर्चर असलेला 2 मेगापिक्सलचा सेकेंडरी सेंसर आणि तेवढाच अपर्चर असलेली 2 मेगापिक्सलची थर्ड लेंस देण्यात आली आहे. सेल्फी आणि व्हिडीओ काॅलिंगसाठी हा फोन एफ/2.0 अपर्चर असलेल्या 16 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो.

हे देखील वाचा : फक्त 9,990 रुपयांमध्ये लॉन्च झाला 5,000एमएएच बॅटरी आणि 3जीबी रॅम असलेला स्वस्त स्मार्टफोन VIVO Y12s

Vivo Y31 एक डुअल सिम फोन आहे जो 4जी वोएलटीईला सपोर्ट करतो. बेसिक कनेक्टिविटी फीचर्स सह सिक्योरिटीसाठी फोनच्या साईड पॅनल वर फिंगरप्रिंट सेंसर इम्बेडेड पावर बटन देण्यात आला आहे तसेच हा फोन फेस अनलाॅक फीचरला पण सपोर्ट करतो. पावर बॅकअपसाठी वीवो वाय31 मध्ये 18वाॅट फास्ट चार्जिंग सपोर्ट असलेली 5,000एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे. Vivo Y31 Racing Black आणि Ocean Blueकलर मध्ये 16,490 रुपयांमध्ये विकत घेता येईल.

The post 10 दिवसांत चौथा फोन घेऊन आली वीवो, आज लाॅन्च केला 6 जीबी रॅम आणि 5,000एमएएच बॅटरी असलेला Vivo Y31 स्मार्टफोन first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/vivo-y31-india-launch-price-at-rs-16490-specs-sale-offer/feed/ 0
Vivo Y31 होणार आहे भारतात लॉन्च, 6 जीबी रॅम आणि 48एमपी कॅमेर्‍यासह असेल 5,000एमएएच बॅटरी https://www.91mobiles.com/marathi/vivo-y31-to-launch-in-india-soon-with-6gb-ram-48mp-camera-5000mah-battery-price-sale/ https://www.91mobiles.com/marathi/vivo-y31-to-launch-in-india-soon-with-6gb-ram-48mp-camera-5000mah-battery-price-sale/#respond Tue, 12 Jan 2021 12:31:43 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=9628 Vivo Y31 मध्ये पावर बॅकअपसाठी 18वॉट फास्ट चार्जिंग सपोर्ट असलेली 5,000एमएएच ची बॅटरी असल्याचे पण सांगण्यात आले आहे.

The post Vivo Y31 होणार आहे भारतात लॉन्च, 6 जीबी रॅम आणि 48एमपी कॅमेर्‍यासह असेल 5,000एमएएच बॅटरी first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Vivo चा एक स्मार्टफोन गेल्या महिन्यात वेगवेगळ्या सर्टिफिकेशन्स साइट वर दिसला होता ज्याचे नाव Vivo Y31 असल्याचे सांगण्यात आले होते. वीवो वाय31 थायलंड आणि सिंगापुरच्या सर्टिफिकेशन साइट सोबतच गूगल प्ले कंसोल वर पण लिस्ट करण्यात आला होता जिथे फोनच्या स्पेसिफिकेशन्सची माहिती मिळाली होती. तसेच आता बातमी येत आहे की Vivo Y31 लवकरच भारतात पण लॉन्च होणार आहे. या फोनचे प्रोमोशनल पोस्टर इंटरनेट लीक झाले आहेत ज्यात फोटो व स्पेसिफिकेशन्स सोबतच सेल ऑफर्स पण दिसत आहेत.

Vivo Y31 चे ऑफिशियल पोस्टर्स टेक वेबसाइट एमएसपीने शेयर केले आहेत. या पोस्टर्स मध्ये फोनचा फोटो आणि त्याचे फीचर्स लिहिण्यात आले आहेत तसेच वीवो वाय31 च्या स्पेसिफिकेशन्स सह बॅंक ऑफर, बजाज फिनसर्व ऑफर आणि जियो ऑफरची माहिती लिहिण्यात आली आहे. हे पोस्टर काही दिवसांत मोबाईल दुकानात व रिटेल स्टोर्स वर पण दिसतील. म्हणजे महिन्याच्या शेवटापर्यंत किंवा पुढल्या महिन्याच्या सुरवातीला वीवो वाय31 इंडियन मार्केट मध्ये सेलसाठी उपलब्ध होईल.

असे असतिल स्पेसिफिकेशन

वीवो वाय31 चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स पाहता समोर आलेल्या पोस्टर वरून समजले आहे की हा स्मार्टफोन वॉटरड्रॉप नॉच डिस्प्ले वर लॉन्च होईल जो 1080 पिक्सल्स असलेल्या फुलएचडी+ रेज्ल्यूशनला सपोर्ट करेल. फोनच्या बॅक पॅनल वर ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे ज्यात प्राइमरी सेंसर 48 मेगापिक्सलचा आहे. पोस्टर मध्ये फिंगरप्रिंट सेंसर फोनच्या साईड पॅनल वर दाखवण्यात आला आहे ज्याच्या वरच्या बाजूला वाल्यूम रॉकर आहे. या पोस्टर मध्ये फोन 6 जीबी रॅम आणि 128 जीबी इंटरनल स्टोरेज असल्याचे सांगण्यात आले आहे.

Vivo Y31 मध्ये पावर बॅकअपसाठी 18वॉट फास्ट चार्जिंग सपोर्ट असलेली 5,000एमएएच ची बॅटरी असल्याचे पण सांगण्यात आले आहे. पोस्टर्सनुसार वीवो वाय31 च्या खरेदीवर बजाज फिनर्सव 101 रुपयांचा ईएमआय देईल आणि यूजर्सना रिलायंस जियोचे 7,000 रुपयांचे बेनिफिट पण मिळतील. Vivo Y31 सोबत एचडीएफसी बॅंकेचा नो-कॉस्ट ईएमआय पण मिळेल. आशा आहे की वीवो लवकरच फोन लॉन्चची घोषणा करेल.

Vivo Y51A

भारतात कालच लॉन्च झालेल्या वीवो वाय51ए बद्दल बोलायचे झाले तर हा फोन 6.58 इंचाच्या फुलएचडी+ डिस्प्लेला सपोर्ट करतो. जो एंडरॉयड 11 आणि क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 662 चिपसेटसह 8 जीबी रॅम + 128 जीबी स्टोरेज वर चालतो. डुअल सिम आणि 4जी वोएलटीई सोबत Vivo Y51A मध्ये रियर फिंगरप्रिंट सेंसर आणि 18वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी असलेली 5,000एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे.

Vivo Y51A ट्रिपल रियर कॅमेर्‍यासह लॉन्च केला गेला आहे ज्यात एलईडी फ्लॅश सह एफ/1.79 अपर्चर असलेला 48 मेगापिक्सलचा प्राइमरी सेंसर, एफ/2.2 अपर्चर असलेली 8 मेगापिक्सलची वाइड एंगल लेंस आणि एफ/2.4 अपर्चर असलेली 2 मेगापिक्सलची मॅक्रो लेंस आहे. सेल्फी आणि वीडियो कॉलिंगसाठी हा फोन एफ/2.0 अपर्चर असलेल्या 16 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेर्‍याला सपोर्ट करतो. वीवो वाय51एस 17,990 रुपयांमध्ये विकत घेता येईल.

The post Vivo Y31 होणार आहे भारतात लॉन्च, 6 जीबी रॅम आणि 48एमपी कॅमेर्‍यासह असेल 5,000एमएएच बॅटरी first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/vivo-y31-to-launch-in-india-soon-with-6gb-ram-48mp-camera-5000mah-battery-price-sale/feed/ 0
Vivo Y31 गुगल वर झाला लिस्ट, 4GB रॅम, स्नॅपड्रॅगॉन 662 आणि अँड्रॉइड 11 सह होईल लॉन्च https://www.91mobiles.com/marathi/vivo-y31-appears-on-google-play-console-listing-launch-soon/ https://www.91mobiles.com/marathi/vivo-y31-appears-on-google-play-console-listing-launch-soon/#respond Mon, 21 Dec 2020 13:39:55 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=9390 Google Play कंसोल लिस्टिंग मध्ये समोर आलेल्या फोटो मध्ये Vivo Y31 स्मार्टफोनचा लुक पण समोर आला आहे.

The post Vivo Y31 गुगल वर झाला लिस्ट, 4GB रॅम, स्नॅपड्रॅगॉन 662 आणि अँड्रॉइड 11 सह होईल लॉन्च first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Vivo बद्दल अनेक दिवसांपासून माहिती समोर येत आहे कि कंपनी आपल्या Y-सीरीजचा विस्तार करण्याची योजना बनवत आहे. आता पर्यंत समोर आलेल्या लीक बातम्यांनुसार कंपनी वाय-सीरीज मध्ये एक नवीन फोन Y31 लवकरच सादर करू शकते. काही दिवसांपूर्वीच हा फोन कथितरित्या NBTC, BIS सह कथितरित्या सिंगापूर मध्ये IMDA आणि रशियात EEC सर्टिफिकेशन वर स्पॉट केला गेला होता. तर, आज फोन गुगल प्ले कंसोल लिस्टिंग मध्ये दिसला आहे, जिथे फोनचे काही स्पेसफिकेशन्स पण समोर आले आहेत.

Google Play कंसोल लिस्टिंग मध्ये समोर आलेल्या फोटो मध्ये Vivo Y31 स्मार्टफोनचा लुक पण समोर आला आहे. फोटोनुसार डिवाइस वॉटरड्रॉप नॉच डिस्प्ले सह सादर केला जाईल. तसेच, हँडसेट मध्ये वॉल्यूम अप, डाउन बटन व पावर बटन उजवीकडे असेल. तसेच डिवाइसच्या डावीकडे एक बटन असेल जे डेडिकेट असिस्टंट बटनचे काम करेल. सोबतच फोनच्या वरच्या बाजूला 3.5एमएम हेडफोन जॅक दिला जाईल.

तसेच Vivo Y31 अक्टा-कोर क्वालकॉम स्नॅपड्रॅगॉन 662 प्रोसेसर सह सादर केला जाईल. फोन मध्ये 4GB रॅम पण असेल. वीवो वाय31 लेटेस्ट अँड्रॉइड ओएस वर काम करेल. वीवोचा हा फोन रशियात EEC आणि सिंगापूर मध्ये IMDA सर्टिफिकेशन्स वर V2036 मॉडेल नंबर सह लिस्ट केला गेला होता. आतापर्यंत कंपनीने फोनच्या अस्तित्वाबाबत कोणतीही माहिती दिली नाही.

अलीकडेच बातमी समोर आली होती, ज्यात सांगण्यात आले होते कि वीवो आपली लेटेस्ट V20 सीरीज अपग्रेड करण्याची योजना बनवत आहे. अलीकडेची त्याचा पब्लिकेशनने Vivo V20 (2021) इंडोनेशिया टेलीकॉम आणि भारतीय मानक ब्यूरोच्या वेबसाइट वर बघितला होता.

The post Vivo Y31 गुगल वर झाला लिस्ट, 4GB रॅम, स्नॅपड्रॅगॉन 662 आणि अँड्रॉइड 11 सह होईल लॉन्च first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/vivo-y31-appears-on-google-play-console-listing-launch-soon/feed/ 0
Vivo Y31 सर्टिफिकेशन्स साइट वर झाला लिस्ट, भारतात करू शकतो एंट्री https://www.91mobiles.com/marathi/vivo-y31-spotted-on-many-certification-launch-soon/ https://www.91mobiles.com/marathi/vivo-y31-spotted-on-many-certification-launch-soon/#respond Thu, 17 Dec 2020 07:17:58 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=9337 टेक वेबसाइट MySmartPrice ने कथितरित्या Vivo Y31 एकसाथ अनेक सर्टिफिकेशन साईट वर स्पॉट केला आहे.

The post Vivo Y31 सर्टिफिकेशन्स साइट वर झाला लिस्ट, भारतात करू शकतो एंट्री first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
चिनी स्मार्टफोन निर्माता कंपनी Vivo लवकरच आपल्या Y-सीरीजचा विस्तार करण्याची योजना बनवत आहे. समोर आलेल्या माहितीनुसार कंपनी या सीरीज मध्ये एक नवीन फोन Y31 सादर करू शकते. या नवीन स्मार्टफोन कथितरित्या अनेक सर्टिफिकेशन एकसाथ मिळाले आहेत, त्यामुळे असे बोलले जात आहे कि फोन लवकरच लॉन्च होऊ शकतो. फोन NBTC सह कथितरित्या सिंगापूर मध्ये IMDA आणि रशियात EEC सर्टिफिकेशन पण मिळाली आहे. नवीन वीवो फोन भारतीय सर्टिफिकेशन साइट BIS वर पण लिस्ट केला गेला आहे, जो याच्या भारतातील लॉन्च कडे इशारा करतो. कंपनीने आता याबाबत कोणतीही ऑफिशियल माहिती समोर आली नाही.

टेक वेबसाइट MySmartPrice ने कथितरित्या Vivo Y31 एकसाथ अनेक सर्टिफिकेशन साईट वर स्पॉट केला आहे. रिपोर्टनुसार, Vivo च्या एका फोनचा मॉडेल नंबर V2036 आहे, जो NBTC सर्टिफिकेशन मिळाले आहे. बोलले जात आहे कि हा फोन Vivo Y31 असेल. सर्टिफिकेशन मध्ये कोणत्याही स्पेसिफिकेशनचा उल्लेख नाही. पण एक स्पष्ट झाले आहे कि डिवाइस 4G कनेक्टिविटीला सपोर्ट करेल.

हे देखील वाचा : 5,999 रुपयांमध्ये लॉन्च झाला 5,000एमएएच बॅटरी आणि 6.2 इंच डिस्प्ले असलेला हा स्वस्त स्मार्टफोन

तसेच रिपोर्ट मध्ये पुढे माहिती देण्यात आली आहे कि वीवो वाय31 भारतीय सर्टिफिकेशन साइट BIS वर पण दिसला आहे. असे बोलले जात आहे कि फोन भारतात पण सादर केला जाईल. भारतीय मानक ब्यूरो (बीआईएस) च्या लिस्टिंग मध्ये फोनचा मॉडेल नंबर V2031 आणि V2036 सह दिसला आहे.

वीवोचा हा फोन रशियात EEC आणि सिंगापूर मध्ये IMDA सर्टिफिकेशन्स वर V2036 मॉडेल नंबर सह लिस्ट केला होता. आतापर्यंत कंपनीने फोनच्या अस्तित्वाबद्दल कोणतीही माहिती दिली नाही.

हे देखील वाचा : 4 जीबी रॅम असलेल्या स्वस्त OPPO A15s ने घेतली एंट्री, मिळेल का Xiaomi-Realme आव्हान?

अलीकडेच बातमी समोर आली होती, ज्यात सांगण्यात आले होते कि वीवो आपल्या लेटेस्ट V20 सीरीजला अपग्रेड करण्याची योजना बनवत आहे. अलीकडेच त्याच पब्लिकेशनने Vivo V20 (2021) इंडोनेशिया टेलीकॉम आणि भारतीय मानक ब्यूरोच्या वेबसाइट वर दिसला होता.

The post Vivo Y31 सर्टिफिकेशन्स साइट वर झाला लिस्ट, भारतात करू शकतो एंट्री first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/vivo-y31-spotted-on-many-certification-launch-soon/feed/ 0