लो बजेट मध्ये सतत नवनवीन प्रोडक्ट्स घेऊन येणाऱ्या टेक ब्रँड Infinix ने आज पुन्हा भारतीय बाजारात आपला नवीन स्मार्टफोन लॉन्च केला आहे. कंपनीने यावेळी एंट्री लेवल स्मार्टफोन सादर करत आपल्या पोर्टफोलियोचा विस्तार केला आहे जो Infinix Smart HD 2021 नावाने बाजारात आला आहे. इनफिनिक्सने हा नवीन स्मार्टफोन फक्त 5,999 रुपयांमध्ये लॉन्च केला आहे जो येत्या 24 डिसेंबर पासून शॉपिंग साइट फ्लिपकार्ट वर विक्रीसाठी उपलब्ध होईल.
लुक व डिजाईन
Infinix Smart HD 2021 कंपनीने वॉटरड्रॉप नॉच डिजाईन वर सादर केला आहे ज्यात ‘यू’ शेप छोटीशी नॉच देण्यात आली आहे. स्क्रीनच्या तीन कडा नॅरो बेजल्स आहेत तसेच खालच्या बाजूला थोडा रुंद चिन पार्ट आहे. फोनच्या बॅक पॅनल वर डुअल रियर कॅमेरा सेटपअ देण्यात आला आहे जो वर डावीकडे चौकोनी आकारात आहे. बॅक पॅनल वर मध्यभागी फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे ज्याच्या खाली Infinix ची ब्रँडिंग आहे. रियर पॅनल वरच खाली स्पीकर आहे तसेच उजव्या पॅनल वर वाल्यूॅम रॉकर व पावर बटन देण्यात आला आहे.
फीचर्स व स्पेसिफिकेशन्स
Infinix Smart HD 2021 कंपनीने 19.5:9 आस्पेक्ट रेशियो वर सादर केला गेला आहे जो 1560 X 720 पिक्सल रेज्ल्यूशन असलेल्या 6.1 इंचाच्या एचडी+ वॉटरड्रॉप नॉच डिस्प्लेला सपोर्ट करतो. फोनची स्क्रीन 500निट्स ब्राइटनेसला सपोर्ट करते. भारतीय बाजारात हा फोन Topaz Blue, Quartz Green आणि Obsidian Black कलर मध्ये विक्रीसाठी उपलब्ध होईल.
हा फोन अँड्रॉइड 10 वर लॉन्च झाला आहे जो एक्सओएस 6.2 सह चालतो. प्रोसेसिंगसाठी फोन मध्ये 1.8गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड असलेल्या क्वॉड-कोर प्रोसेसर सह 12एनएम टेक्नॉलॉजी वर बनलेला मीडियाटेकचा हीलियो ए20 चिपसेट देण्यात आला आहे. कंपनीने फोन 2 जीबी रॅम वर लॉन्च केला गेला आहे जो 32 जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करती आहे. फोन मेमरी कार्डच्या माध्यमातून 256 जीबी पर्यंत वाढवता येते.
हे देखील वाचा : 4 जीबी रॅम असलेल्या स्वस्त OPPO A15s ने घेतली एंट्री, मिळेल का Xiaomi-Realme आव्हान?
फोटोग्राफी सेग्मेंट पाहता इनफिनिक्स स्मार्ट एचडी 2021 स्मार्टफोन एलईडी फ्लॅश सह एफ/2.0 अपर्चर असलेला 8 मेगापिक्सलच्या रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. तसेच सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी फोनच्या फ्रंट पॅनल वर वाइड सेल्फी मोड असलेला एफ/2.0 अपर्चर असलेला 5 मेगापिक्सलचा कॅमेरा सेंसर आहे. चांगली बाब अशी आहे सेल्फी कॅमेऱ्यासह फ्रंट पॅनल वर पण एलईडी फ्लॅश लाईट देण्यात आली आहे.
Infinix Smart HD 2021 रियल डुअल सिम फोन आहे जो 4जी वोएलटीईला सपोर्ट करतो. बेसिक कनेक्टिविटी फीचर्स सोबतच सिक्योरिटीसाठी फोन मध्ये रियर फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे तसेच स्मार्ट एचडी 2021 फेस अनलॉक फीचरला पण सपोर्ट करता. पावर बॅकअपसाठी इनफिनिक्स स्मार्ट एचडी 2021 स्मार्टफोन मध्ये 5,000एमएएचची मोठी बॅटरी देण्यात आली आहे जो कंपनीच्या दाव्यानुसार 34 दिवसांचा स्टँडबाय टाईम देऊ शकतो.
















