VIVO कंपनी नवीन वर्षाच्या सुरवातीला आक्रमक दिसत आहे. अजून 2021 चा पहिला महीना पण संपला नाही आणि वीवोने तीन नवीन स्मार्टफोन Vivo Y12s, Vivo Y20G आणि Vivo Y51a भारतीय बाजारात लाॅन्च केले आहेत. आपला हा वेग कायम ठेवत वीवोने आज पुन्हा एक नवीन मोबाईल फोन Vivo Y31 भारतीय बाजारात लाॅन्च केला आहे. ‘वाय सीरीज’ मध्ये जोडलेला हा स्मार्टफोन 16,490 रुपयांमध्ये लाॅन्च झाला आहे जो ऑनलाइन शाॅपिंग साइट सोबतच ऑफलाइन रिटेल स्टोर वर पण विक्रीसाठी उपलब्ध होईल.
Vivo Y31
वीवो वाय31 चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स पाहता हा स्मार्टफोन 20:9 आस्पेक्ट रेशियो वर सादर केला गेला आहे जो 2408 × 1080 पिक्सल रेज्ल्यूशन असलेल्या 6.58 इंचाच्या फुलएचडी+ आयपीएस एलसीडी डिस्प्लेला सपोर्ट करतो. हि वाॅटरड्राॅप नाॅच स्क्रीन आहे जिच्या तीन कडा पूर्णपणे बेजल लेस आहेत तर खालच्या बाजूला बारीक चिन पार्ट देण्यात आला आहे. डिस्प्लेच्या वरच्या बाजूला मध्यभागी सेल्फी कॅमेरा असलेली ‘यू’ शेप नाॅच देण्यात आली आहे.
हे देखील वाचा : 5000mAh बॅटरी आणि 6GB सह लॉन्च झाला Vivo Y20G, जाणून घ्या किंमत
Vivo Y31 अँड्रॉइडच्या लेटेस्ट ओएस अँड्रॉइड 11 वर लाॅन्च केला गेला आहे जो फनटच ओएस 11 सह चालतो. प्रोसेसिंगसाठी या फोन मध्ये आक्टा-कोर प्रोसेसर सह क्वाॅलकाॅमचा स्नॅपड्रॅगॉन 662 चिपसेट आहे. वीवो वाय31 भारतीय बाजारात एकच वेरिएंट मध्ये लाॅन्च केला गेला आहे जो 6 जीबी की रॅम सह 128 जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो.

फोटोग्राफी सेग्मेंट पाहता वीवो वाय31 ट्रिपल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनल वर एलईडी फ्लॅश सह 48 मेगापिक्सलचा प्राइमरी सेंसर देण्यात आला आहे जो एफ/1.79 अपर्चरला सपोर्ट करतो. तसेच फोन मध्ये एफ/2.4 अपर्चर असलेला 2 मेगापिक्सलचा सेकेंडरी सेंसर आणि तेवढाच अपर्चर असलेली 2 मेगापिक्सलची थर्ड लेंस देण्यात आली आहे. सेल्फी आणि व्हिडीओ काॅलिंगसाठी हा फोन एफ/2.0 अपर्चर असलेल्या 16 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो.
हे देखील वाचा : फक्त 9,990 रुपयांमध्ये लॉन्च झाला 5,000एमएएच बॅटरी आणि 3जीबी रॅम असलेला स्वस्त स्मार्टफोन VIVO Y12s
Vivo Y31 एक डुअल सिम फोन आहे जो 4जी वोएलटीईला सपोर्ट करतो. बेसिक कनेक्टिविटी फीचर्स सह सिक्योरिटीसाठी फोनच्या साईड पॅनल वर फिंगरप्रिंट सेंसर इम्बेडेड पावर बटन देण्यात आला आहे तसेच हा फोन फेस अनलाॅक फीचरला पण सपोर्ट करतो. पावर बॅकअपसाठी वीवो वाय31 मध्ये 18वाॅट फास्ट चार्जिंग सपोर्ट असलेली 5,000एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे. Vivo Y31 Racing Black आणि Ocean Blueकलर मध्ये 16,490 रुपयांमध्ये विकत घेता येईल.














