Xiaomi Mi Mix 3 - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Mon, 25 Feb 2019 14:23:02 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 शाओमीची नवी चाल, लॉन्च झाला मी मिक्स 3 5जी फोन ! सॅमसंग-वीवोला देईल का टक्कर ? https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-mi-mix-5g-smartphone-launched-in-mwc-2019-after-samsung-vivo-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-mi-mix-5g-smartphone-launched-in-mwc-2019-after-samsung-vivo-in-marathi/#respond Mon, 25 Feb 2019 14:23:02 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=3709 ग्लोबल मंचावर हा फोन मे महिन्यापासून सेल साठी उपलब्ध होईल

The post शाओमीची नवी चाल, लॉन्च झाला मी मिक्स 3 5जी फोन ! सॅमसंग-वीवोला देईल का टक्कर ? first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
मोबाईल वर्ल्ड कांग्रेस 2019 सुरु झाला आहे. अनेक टेक कंपन्यांनी आपल्या टेक्नॉलॉजीचे प्रदर्शन करण्यासाठी कंबर कसली आहे. टेक दिग्गज सॅमसंग आणि वीवो ने जागतिक मंचावर आपले 5जी स्मार्टफोन सादर केले आहेत, ज्यांच्या पहिल्या झलकीने टेक प्रेमी दिवाने झाले आहेत. आता चीन मधील ऍप्पल म्हणून ओळखील जाणारी टेक कंपनी शाओमी ने पण जगासोमर आपला 5जी फोन सादर केला आहे. कंपनीने पहिला 5जी फोन सादर करत शाओमी ने मी मिक्स 3 अंर्तराष्ट्रीय मंचावर लॉन्च केला आहे.

शाओमी ने एमडब्ल्यूसी 2019 च्या मंचावरून आपला पहिला 5जी फोन सादर केला आहे. शाओमी ने या फोनला मी मिक्स 3 असे नाव दिले आहे. सर्वात आधी फोनच्या 5जी कनेक्टिविटी बद्दल बोलायचे झाले तर हा फोन क्वालकॉमच्या स्नॅपड्रॅगॉन 855 चिपसेट वर सादर केला गेला आहे. क्वालकॉमचा हा चिपसेट 5जी नेटवर्क सपोर्ट सह येतो. तसेच या फोन मध्ये एक्स50 मॉडेम पण देण्यात आला आहे जो मी मिक्स 3 च्या या वेरिएंटला 5जी सपोर्ट देतो. हैराणीची बाब म्हणजे शाओमी मी मिक्स 3 5जी फोन 2जीबीपीएस चा डाउनलोड स्पीड देऊ शकतो.

शाओमी ने आपल्या 5जी फोन बद्दल म्हटले आहे कि त्यांचा फोन 3 क्षेत्रांत सर्वात पुढे असेल. शाओमीचा 5जी फोन इंटरनेटचा वापर फास्ट करेल. कंटेंट अपलोड असो वा डाउनलोड, दोन्ही परिस्थितीत 5जी इंटरनेट वेगाने चालेल. दुसरा फायदा म्हणजे फोनला सर्वरशी कनेक्ट होण्यास खूपच कमी वेळ लागेल. म्हणेज कोणत्याही वेबसाइट वर वेबपेज वर क्लिक करताच वेगाने शाओमी फोनचा नेटवर्क त्या वेबपेजच्या सर्वरशी कनेक्ट होईल आणि त्या क्लिकचा रिजल्ट समोर आणेल. शाओमी 5जी फोन मध्ये प्रत्येक ऍप आणि त्याचा डेटा क्लाउड मेमरी वर सेव करता येईल.

किंमत
किंमत पाहता शाओमी ने मी मिक्स 3 5जी फोन 599 यूरो मध्ये लॉन्च केला आहे. हि किंमत भारतीय करंसीनुसार जवळपास 48,000 रुपये आहे. ग्लोबल मंचावर हा फोन मे महिन्यापासून सेल साठी उपलब्ध होईल. पण भारतात यायला या फोनला थोडा जास्त वेळ लागू शकतो. अशा आहे कि भारतात हा फोन वोडाफोन नेटवर्क सह उपलब्ध होईल. तसेच रिलायंस जियो पण शाओमी मी मिक्स 3 5जी ला येत्या काळात आपल्या नेटवर्क वर उपलब्ध करू शकते.

मी मिक्स 3 5जी
शाओमीचा हा फोन सेरॉमिक बॉडी वर बनला आहे. फोनच्या चारही बाजूंना बारीक बॉडी पार्ट देण्यात आले आहेत. मी मिक्स 3 5जी फोनच्या फ्रंट पॅनल वर कोणतेही फिजिकल बटण देण्यात आलेले नाही. तसेच फोनच्या डिस्प्ले वर बेजल्स किंवा नॉच पण नाही. नॉच नसल्यमुळे फोनच्या फ्रंट पॅनल वर सेल्फी कॅमेरा पण दिसणार नाही. सेल्फी कॅमेऱ्यासाठी मी मिक्स 3 5जी मॉडेल मध्ये स्लाईडर पॅनल देण्यात आला आहे.

फोनचा सेल्फी कॅमेरा वापरण्यासाठी फोनचा बॅक पॅनल वर ढकलावा लागतो ज्यामुळे फोनच्या बॉडी मधील सेल्फी कॅमेरा फोनच्या टॉप पॅनल वरून वर येतो आणि यूजर सेल्फी क्लिक करतो. मी मिक्स 3 मध्ये 19.5:9 आस्पेक्ट रेशियो असलेला डिस्प्ले आहे. या फोन मध्ये 2340 X 1080 पिक्सल रेज्ल्यूशन असलेला 6.39-इंचाचा फुलएचडी+ एमोलेड डिस्प्ले देण्यात आला आहे.

फोटोग्राफी सेग्मेंट पाहता मी मिक्स 3 ​डुअल रियर आणि डुअल सेल्फी कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनल वर एफ/1.8 आणि एफ/2.4 अपर्चर वाले 12-मेगापिक्सलचे दोन कॅमेरा सेंसर देण्यात आले आहेत जे एआई क्षमतेसह येतात. फोनचा कारियर कॅमेरा वर्टिकल शेप मध्ये देण्यात आला आहे जो एलईडी फ्लॅश सह येतो. तसेच सेल्फी साठी या फोनचा एक कॅमेरा सेंसर 24-मेगापिक्सलचा आहे तर दुसरा कॅमेरा सेंसर 2-मेगापिक्सलचा आहे. तसेच पावर बॅकअप साठी हा फोन 3,800एमएएच च्या बॅटरीला सपोर्ट करतो.

The post शाओमीची नवी चाल, लॉन्च झाला मी मिक्स 3 5जी फोन ! सॅमसंग-वीवोला देईल का टक्कर ? first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-mi-mix-5g-smartphone-launched-in-mwc-2019-after-samsung-vivo-in-marathi/feed/ 0
शाओमीचा पहिला 5जी फोन 24 फेब्रुवारीला होईल लॉन्च, 10जीबी रॅम सह चालेल जगातील वेगवान चिपसेटवर https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-mi-mix-3-5g-phone-launch-date-24-february-leak-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-mi-mix-3-5g-phone-launch-date-24-february-leak-in-marathi/#respond Wed, 16 Jan 2019 08:20:00 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=3387 मी मिक्स 3 5जी मध्ये इन-डिसप्ले​ फिंगरप्रिंट सेंसर पण मिळू शकतो

The post शाओमीचा पहिला 5जी फोन 24 फेब्रुवारीला होईल लॉन्च, 10जीबी रॅम सह चालेल जगातील वेगवान चिपसेटवर first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
चीनची ऍप्पल म्हणून ओळखली जाणारी टेक कंपनी शाओमी आता कदाचित ऍप्पलपेक्षा पण पुढे जाणार आहे. आहि टेक्नॉलॉजी जी आतापर्यंत ऍप्पल आईफोन मध्ये पण आलेली नाही ती आता शाओमीच्या फोन मध्ये येणार आहे. आम्ही बोलत आहोत सर्व स्मार्टफोन यूजर्स प्रतीक्षा करत असलेल्या 5जी टेक्नॉलॉजी बद्दल. शाओमी 5जी फोन वर काम करत आहे आणि कंपनीने या फोनचे प्रदर्शन पण क्वालकॉमच्या ईवेंट मध्ये केले आहे. आता बातमी आली आहे कि 24 फेब्रुवारीला शाओमीचा हा 5जी फोन शाओमी मी मिक्स 3 5जी नावाने टेक मंचावर येईल.

शाओमी मी मिक्स 3 च्या या 5जी मॉडेलच्या ]लॉन्च डेटचा खुलासा ट्वीट वरून झाला आहे. हे ट्वीट प्रसिद्ध टिपस्टर बेन गेस्क्नि याने केले आहे. बेन ने आपल्या ट्वीट मध्ये शाओमी मी मिक्स 3 5जी चे लॉन्च इन्वाईट शेयर केले आहे ज्यात सांगण्यात आले आहे कि शाओमीचा पहिला 5जी फोन येत्या 24 फेब्रुवारीला अंर्तराष्ट्रीय मोबाईल बाजारात येईल. विशेष म्हणजे बेन ने लॉन्च इन्वाईटचा टीजर शेयर केल्यानंतर थोड्याच वेळाने आपले ट्वीट डिलीट पण केले. पण याचकाळात इंटरनेशनल मीडिया मध्ये शाओमी मी मिक्स 3 5जी चा हा लॉन्च टीजर वायरल झाला आहे.

मी मिक्स 3 5जी चा लॉन्च टीजर स्लॅशगियर ने प्रसिद्ध केला आहे. या ईमेज पर ‘वी मेक इट हॅपन’ लिहिण्यात आले आहे. या शीर्षकाच्या खाली फोनची लॉन्च डेट लिहिण्यात आली आहे जी टिप्सटर ने खोडली आहे. दुसरीकडे शाओमीने आतापर्यंत मी मिक्स 3 5जी च्या लॉन्च संबंधित कोणतीही अधिकृत माहिती दिली नाही. पण नवीन लीक नंतर असे बोलले जात आहे कि शाओमी 24 फेब्रुवारीला आपला पहिला 5जी फोन टेक मंचावर सादर करेल.

शाओमी मी मिक्स 3 5जी पाहता हा फोन क्वालकॉमच्या स्नॅपड्रॅगॉन 855 चिपसेट वर चालेले. या फोन मध्ये एक्स50 मॉडेम पण देण्यात येईल जो मी मिक्स 3 च्या या वेरिएंटला 5जी ला सपोर्ट करण्यास मदत करेल. प्राप्त माहितीनुसार शाओमी मी मिक्स 3 5जी मॉडेल 2जीबीपीएस पर्यंतचा डाउनलोड स्पीड देउ शकेल. लीक झालेल्या मी मिक्स 3 5जी च्या फोटो मध्ये फोन बेजल लेस डिजाईन सह दिसत आहे. फोन मध्ये 2के रेज्ल्यूशन असलेला एमोलेड डिस्प्ले मिळू शकतो. फोनच्या चारही बाजूला थोडे बॉडी पार्ट दिसत आहेत.

मी मिक्स 3 5जी फोनच्या फ्रंट पॅनल वर कोणतेही फिजिकल बटण देण्यात आलेले नाही. तसेच फोनच्या डिस्प्ले वर कोणतीही नॉच पण नाही. त्यामुळे शाओमी आपला हा फोन स्लाईडर पॅनल वर सादर करू शकते. तसेच मी मिक्स 3 5जी मध्ये इन-डिसप्ले​ फिंगरप्रिंट सेंसर पण मिळू शकतो. शाओमी मी मिक्स 3 10जीबी रॅम सोबत 8जीबी रॅम आणि 6जीबी रॅम सह सादर केला जाऊ शकतो जे 256जीबी आणि 64जीबी इंटरनल स्टोरेज सह येऊ शकतात. सध्या शाओमीच्या पहिल्या 5जी फोनच्या ठोस माहितीसाठी कंपनीच्या घोषणेची वाट बघितली जात आहे.

The post शाओमीचा पहिला 5जी फोन 24 फेब्रुवारीला होईल लॉन्च, 10जीबी रॅम सह चालेल जगातील वेगवान चिपसेटवर first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-mi-mix-3-5g-phone-launch-date-24-february-leak-in-marathi/feed/ 0
10जीबी रॅम आणि स्लाइड आउट कॅमेरा असलेला शाओमी मी मिक्स 3 लॉन्च https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-mi-mix-3-official-launched-feature-specifications-design-price-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-mi-mix-3-official-launched-feature-specifications-design-price-in-marathi/#respond Thu, 25 Oct 2018 08:24:55 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=2634 मी मिक्स 3 चा सर्वात ताकदवान वेरिएंट 10जीबी रॅम आणि 256जीबी इंटरनल स्टोरेज वर लॉन्च करण्यात आला आहे.

The post 10जीबी रॅम आणि स्लाइड आउट कॅमेरा असलेला शाओमी मी मिक्स 3 लॉन्च first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
शाओमीचा बहुप्रतीक्षित तसेच बहुच​र्चित स्मार्टफोन मी मिक्स 3 आज समोर आला आहे. कंपनीने आपला हाईएंड फ्लॅगशिप डिवाईस मी मिक्स 3 टेक मंचावर सादर केला आहे. शानदार लुक व डिजाईन तसेच दमदार स्पेसिफिकेशन्स असलेला मी मिक्स 3 आज चीन मध्ये लॉन्च करण्यात आला आहे. मी मिक्स 3 आपल्या सीरीजच्या आधीच्या स्मार्टफोन्स प्रमाणे डिजाईन मध्ये अनोखा आहे तसेच शाओमी ने फोन मध्ये ताकदवान रॅम व प्रोसेसर दिला आहे.

शाओमी मी मिक्स 3 फुलव्यू डिस्प्ले सह सादर करण्यात आला आहे ज्यात बेजल जवळपास नाहीतच. फोनच्या डिस्प्ले वर फिजिकल बटन नाही किंवा नॉच तसेच कॅमेरा सेंसर नाही. फोनच्या संपूर्ण फ्रंट पॅनल ​वर डिस्प्ले देण्यात आला आहे. तसेच फोनच्या बॅक पॅनल वर ​वर्टिकल शेप मध्ये डुअल रियर कॅमेरा देण्यात आला आहे.

मी मिक्स 3 19.5:9 आस्पेक्ट रेशियो वाल्या डिस्प्ले सह सादर करण्यात आला आहे. या फोन मध्ये 2340 X 1080 पिक्सल रेज्ल्यूशन वाला 6.39-इंचाचा फुलएचडी+ एमोलेड डिस्प्ले देण्यात आला आहे. शाओमी मी मिक्स 3 ट्रू बेजल लेस फोन आहे. शाओमीचा हा फोन स्लाइडर पॅनल सह येतो ज्यात सेल्फी कॅमेरा, ईयरपीस आणि अन्य सेंसर देनाय्त आले आहेत. हा स्लाइडर सेल्फी कमांड दिल्यावर फोन बॉडीच्या बाहेर येईल.

फोटोग्राफी सेग्मेंट पाहता मी मिक्स 3 ​डुअल रियर आणि डुअल सेल्फी कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनल वर एफ/1.8 आणि एफ/2.4 अपर्चर वाले 12-मेगापिक्सलचे दोन कॅमेरा सेंसर देनाय्त आले आहेत ज्यात एआई क्षमता आहे. फोनचा रियर कॅमेरा वर्टिकल शेप मध्ये देण्यात आला आहे जो एलईडी फ्लॅश सह येतो. तसेच फोन मध्ये सेल्फी साठी एक कॅमेरा सेंसर 24-मेगापिक्सलचा आहे तर दुसरा कॅमेरा सेंसर 2-मेगापिक्सलचा आहे.

शाओमी मी मिक्स 3 कंपनीने एंडरॉयडच्या लेटेस्ट वर्जन वर सादर केला आहे जो मीयूआई च्या सर्वात फास्ट आॅपरेटिंग सिस्टम वर चालतो. तसेच प्रोसेसिंग साठी शाओमी ने मी मिक्स 3 मध्ये क्वालकॉमचा सर्वात नवीन चिपसेट स्नॅपड्रॅगॉन 845 दिला आहे. मी मिक्स 3 तीन रॅम वेरिएंट मध्ये लॉन्च करण्यात आला आहे ज्यात 10जीबी पावरफुल रॅम सोबत 8जीबी तसेच 6जीबी रॅम वेरिएंटचा समावेश आहे.

किंमत पाहता मी मिक्स 3 चा 6जीबी रॅम व 128जीबी स्टोरेज वेरिएंट 3299 युआन मध्ये लॉन्च झाला आहे. फोनचा 8जीबी रॅम व 128जीबी मेमरी वेरिएंट 3599 युआन तर फोनचा 8जीबी रॅम व 256जीबी स्टोरेज वेरिएंट 3999 युआन मध्ये लॉन्च करण्यात आला आहे. या किंमती भारतीय करंसी नुसार क्रमश: 34,800 रुपये, 37,900 रुपये तसेच 42,100 रुपयांच्या आसपास आहेत.

या तिन्ही वेरिएंट व्यतिरिक्त शाओमी मी मिक्स 3 चा सर्वात ताकदवान वेरिएंट 10जीबी रॅम आणि 256जीबी इंटरनल स्टोरेज वर लॉन्च करण्यात आला आहे. या वेरिएंटची किंमत 4999 युआन ठेवण्यात आली आहे जी इंडियन करंसी नुसार जवळपास 52,700 रुपये आहे.

The post 10जीबी रॅम आणि स्लाइड आउट कॅमेरा असलेला शाओमी मी मिक्स 3 लॉन्च first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-mi-mix-3-official-launched-feature-specifications-design-price-in-marathi/feed/ 0
10जीबी रॅम आणि 5जी सपोर्ट सह येत आहे शाओमी मी मिक्स 3! 25 ऑक्टोबरला होईल लॉन्च https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-mi-mix-3-with-10gb-ram-and-5g-support-to-launch-on-25-october-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-mi-mix-3-with-10gb-ram-and-5g-support-to-launch-on-25-october-in-marathi/#respond Thu, 18 Oct 2018 07:32:24 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=2560 शाओमी मी मिक्स 3 च्या बॅक पॅनल वर कोणताही फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला नाही. त्यामुळे अंदाज लावला जात आहे की या फोन मध्ये अंडर डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर असेल.

The post 10जीबी रॅम आणि 5जी सपोर्ट सह येत आहे शाओमी मी मिक्स 3! 25 ऑक्टोबरला होईल लॉन्च first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
शाओमी ने दीर्घ प्रतीक्षेनंतर सांगितले आहे की कंपनीचा आगामी फ्लॅगशिप स्मार्टफोन मी मिक्स 3 येत्या 25 ऑक्टोबरला सादर होईल. मी मिक्स 3 च्या लॉन्च बद्दल कंपनी ने अनेक टीजर ईमेज पण शेयर केल्या आहेत ज्यातून फोनच्या डिजाईन व लुकचा अंदाज लावला जात आहे. जरी शाओमी ने अजून मी मिक्स 3 चे स्पेसिफिकेशन्स सांगितले नसले तरी एका ताज्या लीक मधून अशी धक्कादायक बातमी समोर आली आहे ज्यामुळे इतर स्मार्टफोन कंपन्यांना धक्का बसेल तर दुसरीकडे शाओमी फॅन्सना मोठे सरप्राइज मिळेल. बातमी अशी आहे की शाओमी मी ​मिक्स 3 10जीबी रॅम सह लॉन्च होईल.

शाओमी ने चीनी माइक्रोब्लागिंग साइट वेईबो वर फोटो ईमेज शेयर केली आहे ज्यात दोन कार्ड आहेत, एकावर ‘5’ लिहिण्यात आले आहे तर दुसर्‍या वर ’10’ लिहिलेल आहे. आपल्या पोस्ट वर शाओमी चाइना ने सांगितले आहे की शाओमीचा हा आगामी डिवाईस मी मिक्स 3 5जी नेटवर्क सपोर्ट सह लॉन्च केला जाईल. विशेष म्हणजे शाओमी मी मिक्स 3 जगातील पहिला फोन असेल जो 5जी सपोर्ट सह येईल आणि लोकांच्या वापरासाठी उपलब्ध होईल.

शाओमी मी मिक्स 3 बद्दल समजले आहे की कंपनी हा फोन 10जीबी रॅम सह बाजारात आणेल. काही दिवसांपूर्वी शाओमी मी मिक्स 3 चा वीडियो पण शेयर करण्यात आला होता की ज्यावरून समजले होते की हा स्मार्टफोन स्लाइड आउट कॅमेर्‍या सह लॉन्च होईल. आता पर्यंत मिळालेल्या माहितीनुसार मी मिक्स 3 च्या बॅक पॅनल वर वर्टिकल शेप मध्ये डुअल रियर कॅमेरा सेटअप देण्यात येईल ज्या सोबत फ्लॅश लाईट असेल.

शाओमी मी मिक्स 3 च्या बॅक पॅनल वर कोणताही फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला नाही. त्यामुळे अंदाज लावला जात आहे की या फोन मध्ये अंडर डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर असेल. या आधी कंपनी शाओमी मी 8 चे एक वर्जन सादर केले आहे ज्यात इन डिस्प्ले फिंगरप्रिंट स्कॅनर आहे. मी मिक्स 3 डुअल सेल्फी कॅमेऱ्याला सपोर्ट करेल. तसेच स्लाईडर वर ईयरपीस आणि सेल्फी फ्लॅश आहे.

शाओमी मी मिक्स 3 10जीबी रॅम सोबत 8जीबी रॅम आणि 6जीबी रॅम सह सादर केला जाईल ज्यात 256जीबी आणि 64जीबी इंटरनल स्टोरेज असू शकते. तसेच प्रोसेसिंग साठी यात क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 845 चिपसेट असेल. लीक नुसार मी मिक्स 3 मध्ये 2के रेज्ल्यूशन वाला एमोलेड डिस्प्ले मिळेल. येत्या 25 ऑक्टोबरला शाओमी बीजिंग मध्ये एका ईवेंटचे आयोजन करणार आहे आणि या ईवेंट च्या मंचावरून शाओमी मी मिक्स 3 आॅफिशियली लॉन्च केला जाईल.

The post 10जीबी रॅम आणि 5जी सपोर्ट सह येत आहे शाओमी मी मिक्स 3! 25 ऑक्टोबरला होईल लॉन्च first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-mi-mix-3-with-10gb-ram-and-5g-support-to-launch-on-25-october-in-marathi/feed/ 0
शाओमी मी ​मिक्स 3 चा बॅक पॅनल होईल स्लाईड, पहिला आॅफिशियल फोटो कपंनी ने केला शेयर https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-mi-mix-3-teaser-image-slider-backpanel-launch-date-features-specifications-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-mi-mix-3-teaser-image-slider-backpanel-launch-date-features-specifications-in-marathi/#respond Fri, 31 Aug 2018 09:46:02 +0000 https://hub.91mobiles.com/marathi/?p=1895 शाओमी मी मिक्स 3 अशा प्रकारे बनवण्यात आला आहे की फोन चा संपूर्ण बॅक पॅनल स्लाईड होईल. फोनचा फ्रंट कॅमेरा आणि ईयरपीस स्लाईडर वर असतील आणि फोन बॉडी च्या आत राहतील.

The post शाओमी मी ​मिक्स 3 चा बॅक पॅनल होईल स्लाईड, पहिला आॅफिशियल फोटो कपंनी ने केला शेयर first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
शाओमी इंडिया ने कालच आॅफि​शिल ट्वीटर हँडल वरून माहिती दिली आहे की कंपनी 5 सप्टेंबरला भारतात नवीन स्मार्टफोन लॉन्च करेल जे रेडमी 6 व रेडमी 6ए असू शकतात. तसेच तिकडे ग्लोबल मंचावर पण शाओमी प्रेसिडेंट लीन​ बिन ने एक मोठी घोषणा केली आहे. एकीकडे आईएफए 2018 मध्ये टेक कंपन्या आपल्या नवीन प्रोजेक्ट आणि डिवाईसचे प्रदर्शन करत आहेत तर दुसरीकडे लीन बिन ने शाओमीच्या आगामी फ्लॅगशिप डिवाईस मी मिक्स 3 चा अधिकृत फोटो पण शेयर केला आहे. या फोटो सोबतच बिन यांनी मी मिक्स 3 च्या लॉन्च ची माहिती पण दिली आहे.

आईएफए 2018 मध्ये सामील न होता पण शाओमी ने संपूर्ण टेक विश्वाचे लक्ष वेधले आहे. शाओमी प्रेसिडेंट लीन बिन यांनी चीनी माइक्रोब्लागिंग साइट वेईबो वरून मी मिक्स 3 चा फोटो शेयर केला आहे. या फोन च्या माध्यमातून शाओमी स्लाईड पॅनल वाली टेक्नोलॉजी समोर घेऊन येणार आहे. शाओमी मी मिक्स 3 अशा प्रकारे बनवण्यात आला आहे की फोन चा संपूर्ण बॅक पॅनल स्लाईड होईल. फोनचा फ्रंट कॅमेरा आणि ईयरपीस स्लाईडर वर असतील आणि फोन बॉडी च्या आत राहतील.

शाओमी मी मिक्स 3 चा फोटो शेयर करण्यासोबत लीन बिन यांनी सांगितले की कंपनी आपला हा शानदार स्मार्टफोन मी मिक्स 3 ऑक्टोबर मध्ये लॉन्च करेल. फोनचा लुक पाहता हा फोन ट्रू बेजल लेस फोन असेल. फ्रंट पॅनल पूर्णपणे डिस्प्ले ने कवर होईल. डिस्प्ले वर कोणतीही नॉच ​किंवा बेजल नसतील. फ्रंट कॅमेरा आणि कॉल वर बोलण्यासाठी ईयरपीस फोन च्या बॉडी च्या आत असतील जे बाहेरून दिसणार नाहीत. फक्त सेल्फी क्लिक करताना तसेच फोन वर बोलताना फोनचा बॅक पॅनल स्लाईड होऊन वर येईल.

तसेच मी मिक्स 3 च्या बॅक पॅनल वर वर्टिकल शेप मध्ये ​डुअल रियर कॅमेरा सेटअप देण्यात येईल ज्या सोबत फ्लॅश लाईट असेल. शाओमी मी मिक्स 3 च्या बॅक पॅनल वर कोणतेही फिंगरप्रिंट सेंसर नाही. त्यामुळे फोन मध्ये अंडर डिसप्ले फिंगरप्रिंट सेंसर असण्याची शक्यता आहे. समोर आलेल्या फोटो मध्ये स्लाईडर वरील दोन सेंसर दिसत आहेत म्हणजे मी मिक्स 3 डुअल सेल्फी कॅमेराला सपोर्ट करेल. तसेच स्लाईडर वर ईयरपीस आणि सेल्फी फ्लॅश आहे.

शाओमी मी मिक्स 3 चे स्पेसिफिकेशन्स पाहता समोर आलेल्या लीक्स नुसार हा फोन 8जीबी रॅम आणि 6जीबी रॅम मेमरी सह सादर केला जाईल जो 256जीबी आणि 64जीबी इंटरनल स्टोरेज ला सपोर्ट करेल. तसेच प्रोसेसिंग साठी यात क्वालकॉम चा स्नॅपड्रॅगन 845 चिपसेट मिळू शकतो. लीक नुसार मी मिक्स 3 मध्ये 2के रेज्ल्यूशन असलेला एमोलेड डिस्प्ले मिळू शकतो. शाओमी ऑक्टोबर मध्ये मी मिक्स 3 आॅफिशियली लॉन्च करेल जो लगेचच भारतीय बाजारात पण येऊ शकतो.

The post शाओमी मी ​मिक्स 3 चा बॅक पॅनल होईल स्लाईड, पहिला आॅफिशियल फोटो कपंनी ने केला शेयर first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-mi-mix-3-teaser-image-slider-backpanel-launch-date-features-specifications-in-marathi/feed/ 0
शाओमी मी मिक्स 3 च्या लॉन्च डेट चा खुलासा, 15 सप्टेंबर ला होईल लॉन्च, असेल जबरदस्त लुक https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-mi-mix-3-might-launch-on-15-september-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-mi-mix-3-might-launch-on-15-september-in-marathi/#respond Thu, 02 Aug 2018 14:02:48 +0000 https://hub.91mobiles.com/marathi/?p=1538 विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वी चीनी माइक्रोब्लागिंग साइट वेईबो वर स्लॅशलीक ने पण शाओमी मी मिक्स 3 चे फोटोज शेयर केले होते. त्या फोटोज मध्ये पण मी मिक्स 3 पूर्णपणे बेजल लेस दाखवण्यात आला होते.

The post शाओमी मी मिक्स 3 च्या लॉन्च डेट चा खुलासा, 15 सप्टेंबर ला होईल लॉन्च, असेल जबरदस्त लुक first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
शाओमी च्या आगामी स्मार्टफोन मी मिक्स 3 बद्दल कित्येक दिवसांपासून लीक्स येत आहेत. वेगवेगळ्या लीक्स मधून मी मिक्स 3 चे वेगवेगळे स्पेसिफिकेशन्स, डिजाईन आणि फीचर्स ची माहिती मिळाली आहे. शाओमी च्या या स्मार्टफोन च्या या इतक्या चर्चे नंतर बोलले जात होते की कंपनी हा स्मार्टफोन लवकरच लॉन्च करेल. या चर्चेला पूर्णविराम देत शाओमी मी मिक्स 3 ची लॉन्च डेट समोर आली आहे. शाओमी मी मिक्स 3 स्मार्टफोन येत्या 15 सप्टेंबर ला लॉन्च होणार आहे अशी माहिती मिळाली आहे.

शाओमी मी मिक्स 3 च्या लॉन्च ची माहिती कंपनी ने दिली नाही तर विदेशी वेबसाइट एंडरॉयड प्योर ने आपल्या रिपोर्ट मध्ये लॉन्च च्या तारखेचा खुलासा केला आहे. वेबसाइट नुसार शाओमी येत्या 15 सप्टेंबर ला आपला नवीन हाईएंड फ्लॅगशिप मी मिक्स 3 लॉन्च करेल. या रिपोर्ट मध्ये स्मार्टफोन टीजर शेयर करण्यात आला टीजर मधील फोन मी मिक्स 3 असल्याचे बोलले जात आहे.

वेबसाइट वर शेयर केलेल्या टीजर मध्ये स्मार्टफोनचा खालचा अर्धा फ्रंट पॅनल दाखवण्यात आला आहे. टीजर मधील फोन फोन पूर्णपणे बेजल लेस आहे तसेच याच्या दोन्ही बाजूला व खालच्या बाजूला कोणताही बॉडी पार्ट देण्यात आला नाही. हा एक ट्रू बेजल लेस स्मार्टफोन आहे म्हणजे यात पूर्ण स्क्रीन वर फक्त डिस्प्ले आहे.

मी मिक्स 3 म्हणून शेयर करण्यात आलेल्या या टीजर मध्ये शाओमी चा लोगो मात्र दिसत नाही आणि यावरील टेक्स्ट पण चीनी भाषेत आहे. त्यामुळे हा शाओमी चा मी मिक्स 3 स्मार्टफोनच असेल हे अजून स्पष्ट झाले नाही. पण वेबसाइट रिपोर्ट वर विश्वास ठेवल्यास हा फोन मी मिक्स 3 आहे जो येत्या 15 सप्टेंबर ला चीनी बाजारात लॉन्च केला जाईल.

विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वी चीनी माइक्रोब्लागिंग साइट वेईबो वर स्लॅशलीक ने पण शाओमी मी मिक्स 3 चे फोटोज शेयर केले होते. त्या फोटोज मध्ये पण मी मिक्स 3 पूर्णपणे बेजल लेस दाखवण्यात आला होते. लीक्स मध्ये सांगण्यात आले आहे की या फोन चा स्क्रीन टू बॉडी रेशियो 90 टक्क्यांपेक्षा जास्त असेल तसेच यात पण वीवो नेक्स सारखाच पॉप सेल्फी कॅमेरा मिळेल.

The post शाओमी मी मिक्स 3 च्या लॉन्च डेट चा खुलासा, 15 सप्टेंबर ला होईल लॉन्च, असेल जबरदस्त लुक first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-mi-mix-3-might-launch-on-15-september-in-marathi/feed/ 0