शाओमीचा पहिला 5जी फोन 24 फेब्रुवारीला होईल लॉन्च, 10जीबी रॅम सह चालेल जगातील वेगवान चिपसेटवर

चीनची ऍप्पल म्हणून ओळखली जाणारी टेक कंपनी शाओमी आता कदाचित ऍप्पलपेक्षा पण पुढे जाणार आहे. आहि टेक्नॉलॉजी जी आतापर्यंत ऍप्पल आईफोन मध्ये पण आलेली नाही ती आता शाओमीच्या फोन मध्ये येणार आहे. आम्ही बोलत आहोत सर्व स्मार्टफोन यूजर्स प्रतीक्षा करत असलेल्या 5जी टेक्नॉलॉजी बद्दल. शाओमी 5जी फोन वर काम करत आहे आणि कंपनीने या फोनचे प्रदर्शन पण क्वालकॉमच्या ईवेंट मध्ये केले आहे. आता बातमी आली आहे कि 24 फेब्रुवारीला शाओमीचा हा 5जी फोन शाओमी मी मिक्स 3 5जी नावाने टेक मंचावर येईल.

शाओमी मी मिक्स 3 च्या या 5जी मॉडेलच्या ]लॉन्च डेटचा खुलासा ट्वीट वरून झाला आहे. हे ट्वीट प्रसिद्ध टिपस्टर बेन गेस्क्नि याने केले आहे. बेन ने आपल्या ट्वीट मध्ये शाओमी मी मिक्स 3 5जी चे लॉन्च इन्वाईट शेयर केले आहे ज्यात सांगण्यात आले आहे कि शाओमीचा पहिला 5जी फोन येत्या 24 फेब्रुवारीला अंर्तराष्ट्रीय मोबाईल बाजारात येईल. विशेष म्हणजे बेन ने लॉन्च इन्वाईटचा टीजर शेयर केल्यानंतर थोड्याच वेळाने आपले ट्वीट डिलीट पण केले. पण याचकाळात इंटरनेशनल मीडिया मध्ये शाओमी मी मिक्स 3 5जी चा हा लॉन्च टीजर वायरल झाला आहे.

मी मिक्स 3 5जी चा लॉन्च टीजर स्लॅशगियर ने प्रसिद्ध केला आहे. या ईमेज पर ‘वी मेक इट हॅपन’ लिहिण्यात आले आहे. या शीर्षकाच्या खाली फोनची लॉन्च डेट लिहिण्यात आली आहे जी टिप्सटर ने खोडली आहे. दुसरीकडे शाओमीने आतापर्यंत मी मिक्स 3 5जी च्या लॉन्च संबंधित कोणतीही अधिकृत माहिती दिली नाही. पण नवीन लीक नंतर असे बोलले जात आहे कि शाओमी 24 फेब्रुवारीला आपला पहिला 5जी फोन टेक मंचावर सादर करेल.

शाओमी मी मिक्स 3 5जी पाहता हा फोन क्वालकॉमच्या स्नॅपड्रॅगॉन 855 चिपसेट वर चालेले. या फोन मध्ये एक्स50 मॉडेम पण देण्यात येईल जो मी मिक्स 3 च्या या वेरिएंटला 5जी ला सपोर्ट करण्यास मदत करेल. प्राप्त माहितीनुसार शाओमी मी मिक्स 3 5जी मॉडेल 2जीबीपीएस पर्यंतचा डाउनलोड स्पीड देउ शकेल. लीक झालेल्या मी मिक्स 3 5जी च्या फोटो मध्ये फोन बेजल लेस डिजाईन सह दिसत आहे. फोन मध्ये 2के रेज्ल्यूशन असलेला एमोलेड डिस्प्ले मिळू शकतो. फोनच्या चारही बाजूला थोडे बॉडी पार्ट दिसत आहेत.

मी मिक्स 3 5जी फोनच्या फ्रंट पॅनल वर कोणतेही फिजिकल बटण देण्यात आलेले नाही. तसेच फोनच्या डिस्प्ले वर कोणतीही नॉच पण नाही. त्यामुळे शाओमी आपला हा फोन स्लाईडर पॅनल वर सादर करू शकते. तसेच मी मिक्स 3 5जी मध्ये इन-डिसप्ले​ फिंगरप्रिंट सेंसर पण मिळू शकतो. शाओमी मी मिक्स 3 10जीबी रॅम सोबत 8जीबी रॅम आणि 6जीबी रॅम सह सादर केला जाऊ शकतो जे 256जीबी आणि 64जीबी इंटरनल स्टोरेज सह येऊ शकतात. सध्या शाओमीच्या पहिल्या 5जी फोनच्या ठोस माहितीसाठी कंपनीच्या घोषणेची वाट बघितली जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here