Xiaomi Redmi 6a - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Fri, 17 May 2019 13:42:42 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 टेना वर लिस्ट झाला Xiaomi Redmi 7A, लवकरच होऊ शकतो लॉन्च https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-redmi-7a-isted-on-teena-can-be-launched-soon/ https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-redmi-7a-isted-on-teena-can-be-launched-soon/#respond Fri, 17 May 2019 13:42:42 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=4335 फोनच्या डिजाइन वरून अंदाज लावला जात आहे कि फोन बजेट कॅटगरी मध्ये सादर केला जाईल

The post टेना वर लिस्ट झाला Xiaomi Redmi 7A, लवकरच होऊ शकतो लॉन्च first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Xiaomi ने भारतात रेडमी नोट 7 आणि रेडमी नोट 7 प्रो स्मार्टफोन नंतर आपला नवीन स्मार्टफोन लॉन्च करण्याची तयारी केली आहे. भारतात लॉन्च होणारा फोन Redmi Note 7S असेल. आता टेना वर काही फोटो समोर आले आहेत, जे बघून वाटत आहे कि कंपनी आपला नवीन बजेट डिवाइस पण सादर करण्याची योजना बनवत आहे.

चीनी सर्टिफिकेशन्स साइट टेना वर शाओमीचे तीन डिवाइस लिस्ट झाले आहेत. लिस्टिंग मध्ये तीन मॉडेल नंबर M1903C3EC, M1903C3EE आणि M1903F11C स्पॉट करण्यात आले आहेत. या तिन्हीपैकी M1903C3EC, आणि M1903C3EE मॉडेल नंबर बघून असे वाटत आहे कि हा फोन Redmi 7a असेल. तर M1903F11C बद्दल सध्या काहीच सांगता येत नाही.

समोर आलेल्या फोटोज नुसार M1903C3EC आणि M1903C3EE मॉडेल मध्ये सिंगल रियर कॅमेरा एलईडी फ्लॅश सह दिला जाईल. तसेच फोन मध्ये कोणतीही नॉच नसेल. तसेच रियर कॅमेरा एआई पॉवर्ड असेल. फोनच्या डिजाइन वरून अंदाज लावला जात आहे कि फोन बजेट कॅटगरी मध्ये सादर केला जाईल. टेना लिस्टिंग मध्ये फोनच्या स्पेसिफिकेशन्सची माहिती समोर आली नाही. पण अशा आहे कि येत्या काळात या फोनची अजून माहिती समोर येईल. सध्या कंपनीने डिवाइस बद्दल कोणतीही अधिकृत माहिती दिली नाही.

Redmi 6a बद्दल बोलायचे तर हा फोन दोन मेमरी वेरियंट सह लॉन्च केला गेला होता त्यांची किंमत क्रमश: 5,999 रुपये आणि 6,999 रुपये होती. रेडमी 6ए के फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स पाहता हा फोन 18:9 आस्पेक्ट रेशियो वाल्या बेजल ​लेस डिस्प्ले सह 720 x 1440 पिक्सल रेजल्यूशन वाल्या 5.45-इंचाच्या एचडी+ स्क्रीनला सपोर्ट करतो. हा फोन मीयूआई 9 आधारित एंडरॉयड 8.1 ओरियो सादर झाला आहे सोबत 2.0गीगाहर्ट्ज मीडियाटेक हेलियो ए22 चिपसेट वर चालतो.

फोटोग्राफी साठी शाओमी रेडमी 6ए मध्ये 13-मेगापिक्सलचा रियर कॅमेरा देण्यात आला आहे जो एफ/2.2 अपर्चर सह येतो. तसेच फास्ट फोकस साठी यात पीडीएएफ सपोर्ट आहे. फोनचा सेल्फी कॅमेरा 5मेगापिक्सलचा आहे आणि यात पण तुम्हाला एफ/2.2 अपर्चर मिळेल. डेटा व कनेक्टिविटी बद्दल बोलायचे तर शाओमी रेडमी 6ए मध्ये डुअल सिम सह 4जी वोएलटीई सपोर्ट आहे. सोबत वाईफाई आणि ब्लूटूथ पण मिळेल. पावर बॅकअप साठी यात 3,000 एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे.

सोर्स

The post टेना वर लिस्ट झाला Xiaomi Redmi 7A, लवकरच होऊ शकतो लॉन्च first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-redmi-7a-isted-on-teena-can-be-launched-soon/feed/ 0
शाओमी फॅन्ससाठी खुशखबरी: कमी झाली रेडमी 6ए ची किंमत, बघा नवीन किंमत https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-redmi-6a-price-slashed-to-be-sold-on-rs-5999-and-6999-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-redmi-6a-price-slashed-to-be-sold-on-rs-5999-and-6999-in-marathi/#respond Thu, 13 Dec 2018 09:36:50 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=3158 कंपनी ने वाढवलेल्या किंमती कमी केल्या आहेत आणि हे फोन्स आता जुन्या किंमतीती विकत घेता येतील.

The post शाओमी फॅन्ससाठी खुशखबरी: कमी झाली रेडमी 6ए ची किंमत, बघा नवीन किंमत first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
यावर्षी शाओमी ने रेडमी 6ए भारतीय बाजारात सादर केला होता. हा फोन दोन मेमरी वेरियंट सह लॉन्च केला गेला होता, त्यांची किंमत क्रमश: 5,999 रुपये आणि 6,999 रुपये होती. लॉन्च वेळी कंपनी ने माहिती दिली होती की हि किंमत फक्त ​तीन महिन्यांसाठी आहे नंतर हि बदलली जाऊ शकते आणि काही महिन्यांनी शाओमीच्या या फोन्सची किंमत 500 रुपये आणि 600 रुपयांनी वाढवण्यात आली होती. तर आज कंपनी ने पुन्हा एकदा नवीन घोषणा केली आहे जी शाओमी फॅन्सना खुश करेल. कंपनी ने वाढवलेल्या किंमती कमी केल्या आहेत आणि हे फोन्स आता जुन्या किंमतीती विकत घेता येतील.

शाओमी रेडमी 6ए च्या 16जीबी मेमरी वेरियंटची किंमत आधी 6,499 रुपये होती पण आता हा 5,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल. तर 32जीबी वेरियंटची किंमत 7,599 रुपये होती जो आता 6,999 मध्ये उपलब्ध होईल.

शाओमी रेडमी 6ए चे के स्पेसिफिकेशन
शाओमी रेडमी 6ए चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स पाहता हा फोन 18:9 आस्पेक्ट रेशियो वाल्या बेजल ​लेस डिस्प्ले सह 720 x 1440 पिक्सल रेजल्यूशन वाली 5.45-इंचाच्या एचडी+ स्क्रीनला सपोर्ट करतो. हा फोन मीयूआई 9 आधारित एंडरॉयड 8.1 ओरियो वर सादर झाला आहे सोबत हा 2.0गीगाहर्ट्ज मीडियाटेक हेलियो ए22 चिपसेट वर चालतो.

फोटोग्राफी साठी शाओमी रेडमी 6ए मध्ये 13-मेगापिक्सलचा रियर कॅमेरा देण्यात आला आहे जो एफ/2.2 अपर्चर सह येतो. तसेच फास्ट फोकस साठी यात पीडीएएफ सपोर्ट आहे. फोनचा सेल्फी कॅमेरा 5मेगापिक्सलचा आहे आणि यात पण तुम्हाला एफ/2.2 अपर्चर मिळेल. डेटा व कनेक्टिविटी बद्दल बोलायचे तर शाओमी रेडमी 6ए मध्ये डुअल सिम सोबत 4जी वोएलटीई सपोर्ट आहे. तसेच वाईफाई आणि ब्लूटूथ पण मिळेल. पावर बॅकअप साठी कंपनी ने यात 3,000 एमएएच ची बॅटरी दिली आहे.

The post शाओमी फॅन्ससाठी खुशखबरी: कमी झाली रेडमी 6ए ची किंमत, बघा नवीन किंमत first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-redmi-6a-price-slashed-to-be-sold-on-rs-5999-and-6999-in-marathi/feed/ 0
शाओमी फॅन्स लक्ष द्या : उद्या पासून सुरु होत आहे ‘आई लव मी’ सेल, या शाओमी फोन वर मिळेल भरभक्कम डिस्काउंट, 3,500 रुपयांची सूट https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-i-love-mi-sale-offer-redmi-6s-redmi-y2-mi-a2-price-cut-discount-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-i-love-mi-sale-offer-redmi-6s-redmi-y2-mi-a2-price-cut-discount-in-marathi/#respond Wed, 05 Dec 2018 14:03:25 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=3064 आपल्या फॅन्सना न्यू ईयरची भेट देत शाओमी ने ‘आई लव मी’ सेल चे आयोजन केले आहे ज्यात शाओमी स्मार्टफोन्स वर 3,500 रुपयांपर्यंतची सूट देण्यात येत आहे.

The post शाओमी फॅन्स लक्ष द्या : उद्या पासून सुरु होत आहे ‘आई लव मी’ सेल, या शाओमी फोन वर मिळेल भरभक्कम डिस्काउंट, 3,500 रुपयांची सूट first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
भारतीय बाजारात साल 2018 च्या सर्वात हिट स्मार्टफोन ब्रांड्सची जेव्हा लिस्ट बनेल तेव्हा त्यात शाओमीचे नाव सर्वात वर असण्याची शक्यता नाकारता येत नाही. वेगवेगळ्या बजेट मध्ये आपले स्मार्टफोन सादर करणाऱ्या शाओमी ने यावर्षी पण इंडियन बाजारात आपली घोडदौड चालू ठेवेल. शाओमीची फॅन फॉलोइंग पण भारतात खूप जास्त आहे आणि सतत वाढत आहे. आपल्या फॅन्सना न्यू ईयरची भेट देत शाओमी ने ‘आई लव मी’ सेल चे आयोजन केले आहे ज्यात शाओमी स्मार्टफोन्स वर 3,500 रुपयांपर्यंतची सूट देण्यात येत आहे.

शाओमी ने ‘आई लव मी’ सेलची सुरवात उद्या म्हणजे 6 डिसेंबर पासून होईल. हा सेल तीन दिवसांचा असेल जो 8 डिसेंबर पर्यंत चालेल. या सेल अंतर्गत शाओमीच्या वेगवेगळे स्मार्टफोन प्राइस कट तसेच भरभक्कम डिस्काउंट सह सेल साठी उपलब्ध होतील. शाओमी ने या सेल साठी शॉपिंग साइट अमेझॉन इंडिया सोबत हात मिळवणी केली आहे. आई लव मी सेल अंतर्गत शाओमीच्या आॅफिशियल वेबसाइट सोबत अमेझॉन इंडिया वर पण शाओमी स्मार्टफोन्स मोठ्या डिस्काउंट सह विकत घेता येतील.

शाओमी आई लव मी सेल अंतर्गत कंपनीच्या हिट स्मार्टफोन मी ए2 वर 3,500 रुपयांची सूट दिली जात आहे. शाओमी मी ए2 देशात दोन वेरिएंट मध्ये उपलब्ध आहे. फोनच्या 6जीबी रॅम व 128जीबी स्टोरेज वेरिएंटची किंमत 18,999 रुपये आहे तर 4जीबी रॅम व 64जीबी मेमरी वेरिएंटची किंमत 15,999 रुपये आहे. पण आई लव मी सेल अंतर्गत शाओमी आपल्या या स्मार्टफोन वर 3,500 रुपयांपर्यंतचा डिस्काउंट देत आहे. म्हणजे मी ए2 चा मोठा वेरिएंट या सेल मध्ये 15,499 रुपयांमध्ये विकत घेता येईल.

रेडमी वाय2 स्मार्टफोन वर शाओमी 2,000 रुपयांची सूट देत आहे. आई लव मी सेल अंतर्गत 11,999 रुपयांचा रेडमी वाय2 चा 4जीबी रॅम व 64जीबी मेमरी वेरिएंट 9,999 रुपये तसेच 9,999 रुपयांचा रेडमी वाय2 चा 3जीबी रॅम व 32जीबी मेमरी वेरिएंट फक्त 7,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल. तसेच 2जीबी रॅम असलेला रेडमी 6ए स्मार्टफोन वर शाओमी थेट 1,000 रुपयांची सूट देत आहे.

आई लव मी सेल मध्ये 7,499 रुपयांचा रेडमी 6ए चा 32जीबी स्टोरेज वेरिएंट 1,000 रुपयांच्या डिस्काउंट नंतर 6,499 रुपयांमध्ये विकत घेता येईल. तसेच फोनचा 16जीबी मेमरी वेरिएंट पण कंपनी स्वस्तात विकत आहे. शाओमी ने आपल्या एका ट्वीट मध्ये रेडमी 6ए ची आॅफर प्राइज 5,999 सांगितली आहे. या ट्वीट वरून समजते की कंपनी रेडमी 6ए च्या 16जीबी स्टोरेज वेरीएंट वर 500 रुपयांचा डिस्काउंट देईल.

The post शाओमी फॅन्स लक्ष द्या : उद्या पासून सुरु होत आहे ‘आई लव मी’ सेल, या शाओमी फोन वर मिळेल भरभक्कम डिस्काउंट, 3,500 रुपयांची सूट first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-i-love-mi-sale-offer-redmi-6s-redmi-y2-mi-a2-price-cut-discount-in-marathi/feed/ 0
शाओमी फॅन्सना झटका : रेडमी स्मार्टफोन्स सोबतच अनेक मी प्रोडक्ट्सच्या किंमती वाढल्या, 2,000 रुपयांपर्यंतची आहे वाढ https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-india-price-hike-redmi-6-redmi-6a-mi-smart-tv-increased-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-india-price-hike-redmi-6-redmi-6a-mi-smart-tv-increased-in-marathi/#respond Mon, 12 Nov 2018 11:07:33 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=2823 शाओमी ने 32इंच स्क्रीन वाल्या मी एलईडी टीवी 4सी प्रो ची किंमत पण 1,000 रुपयांनी वाढवली आहे त्यामुळे हि स्मार्टटीवी आता 15,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल.

The post शाओमी फॅन्सना झटका : रेडमी स्मार्टफोन्स सोबतच अनेक मी प्रोडक्ट्सच्या किंमती वाढल्या, 2,000 रुपयांपर्यंतची आहे वाढ first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
शाओमी ब्रँड भारतातील सर्वात मोठा स्मार्टफोन ब्रॅण्ड बनला आहे. अनेक वर्षे भारतीय बाजारावर राज्य करणाऱ्या सॅमसंगला मागे टाकत शाओमी ने आॅनलाईन व आॅफलाईन दोन्ही प्लॅटफॉर्म वर सेलचे नवीन रेकॉर्ड बनवले आहेत. शानदार स्पेसिफिकेशन्स कमी किंमतीती दिल्यामुळे शाओमीची फॅन फॉलोइंग खूप वाढली आहे. [ना देशातील नंबर वन ब्रँड शाओमीच्या फॅन्सना कंपनी ने मोठा झटका दिला आहे. दिवाळी संपताच शाओमी इंडिया ने आपल्या स्मार्टफोन्स सोबतच इतर अनेक प्रोडक्टसच्या किंमती वाढवल्या आहते.

शाओमी इंडिया ने रेडमी सीरीजच्या लेटेस्ट स्मार्टफोन्स रेडमी 6 आणि रेडमी 6ए च्या किंमती वाढवल्या आहेत. या दोन हिट स्मार्टफोन्स सोबतच कंपनी ने आपल्या दोन स्मार्ट टीवी आणि मी पावर बँक च्या किंमती पण वाढवल्या आहेत. शाओमी ने आपल्या प्रोडक्ट्सच्या किंमतीती 2,000 रुपयांची वाढ केली आहे. शाओमी ने वाढवलेल्या किंमतींचा परिणाम स्मार्टफोन वेरिएंट्स, दोन स्मार्ट टीवी आणि एका पावर बँकेवर झाला आहे.

शाओमी रेडमी 6ए कंपनी ने दोन स्टोरेज वेरिएंट्स मध्ये देशात लॉन्च केला होता. हा फोन 2जीबी रॅमला सपोर्ट करतो. फोनचा 32जीबी स्टोरेज वेरिएंट 6,999 रुपयांमध्ये लॉन्च झाला होता तसेच 16जीबी मेमरी वेरिएंट 5,999 रुपयांमध्ये लॉन्च करण्यात आला होता. पण कंपनी ने आता फोनच्या 32जीबी स्टोरेज वेरिएंटच्या किंमतीती रुपये तसेच 16जीबी स्टोरेज वेरिएंटच्या किंमतीती 600 रुपयांची वाढ केली आहे. ज्यामुळे रेडमी 6ए चा 32जीबी स्टोरेज वेरिएंट 7,499 रुपयांमध्ये मिळेल तर 16जीबी स्टोरेज वेरिएंट 6,599 रुपयांमध्ये मिळेल.

त्याचप्रमाणे शाओमी ने 3जीबी रॅम व 32जीबी मेमरी वाल्या रेडमी 6 स्मार्टफोनच्या किंमतीती पण 500 रुपयांची वाढ केली आहे. हा फोन 7,999 रुपयांमध्ये लॉन्च झाला होता पण आता किंमत वाढल्याने हा 8,499 रुपयांमध्ये विकत घ्यावा लागेल. विशेष म्हणजे आॅफलाईन रिटेल स्टोर वरून रेडमी 6ए चा 32जीबी वेरिएंट विकत घेताना 7,799 रुपये तर 16जीबी वे​रिएंट विकत घेताना 6,599 रुपये द्यावे लागतील. तसेच रेडमी 6 चा 3जीबी रॅम वेरिएंट आॅफलाईन रिटेल स्टोर वरून 8,799 रुपयांमध्ये विकत घेता येईल.

शाओमी ने 32इंच स्क्रीन वाल्या मी एलईडी टीवी 4सी प्रो ची किंमत पण 1,000 रुपयांनी वाढवली आहे त्यामुळे हि स्मार्टटीवी आता 15,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल. मी एलईडी टीवी 4ए प्रो ची किंमत कंपनी ने 2,000 रुपयांनी वाढवली आहे. हा टीव्ही विकत घेण्यासाठी आता 31,999 रुपये द्यावे लागतील. तसेच शाओमी इंडिया ने 10000एमएएच बॅटरी असलेल्या मी पावरबँक 2आई ब्लॅक ची किंमत पण 100 रुपयांनी वाढवली आहे. हि पावरबँक आता 899 रुपयांमध्ये विकत घेता येईल.

The post शाओमी फॅन्सना झटका : रेडमी स्मार्टफोन्स सोबतच अनेक मी प्रोडक्ट्सच्या किंमती वाढल्या, 2,000 रुपयांपर्यंतची आहे वाढ first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-india-price-hike-redmi-6-redmi-6a-mi-smart-tv-increased-in-marathi/feed/ 0
5,999 रुपयांमध्ये लॉन्च झाला शाओमी चा सर्वात स्वस्त फोन रेडमी 6ए, जाणून घ्या फीचर्स आणि स्पेसिफिकेशन https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-redmi-6a-launched-in-india-price-specifications-and-features-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-redmi-6a-launched-in-india-price-specifications-and-features-in-marathi/#respond Thu, 06 Sep 2018 09:20:03 +0000 https://hub.91mobiles.com/marathi/?p=1971 खुप कमी वेळा असे झाले आहे जेव्हा शाओमी ने एकाच वेळी एका पेक्षा जास्त फोन मॉडेल लॉन्च केले आहेत. कधी कधी कंपनी ने दोन मॉडेल सादर केले आहेत पण आज कंपनी ने आपल्या रेडमी 6 सीरीज मध्ये एक साथ 3 मॉडेल सादर केले आहेत. शाओमी ने रेडमी 6ए, रेडमी 6 आणि रेडमी 6 प्रो सादर […]

The post 5,999 रुपयांमध्ये लॉन्च झाला शाओमी चा सर्वात स्वस्त फोन रेडमी 6ए, जाणून घ्या फीचर्स आणि स्पेसिफिकेशन first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
खुप कमी वेळा असे झाले आहे जेव्हा शाओमी ने एकाच वेळी एका पेक्षा जास्त फोन मॉडेल लॉन्च केले आहेत. कधी कधी कंपनी ने दोन मॉडेल सादर केले आहेत पण आज कंपनी ने आपल्या रेडमी 6 सीरीज मध्ये एक साथ 3 मॉडेल सादर केले आहेत. शाओमी ने रेडमी 6ए, रेडमी 6 आणि रेडमी 6 प्रो सादर केले आहेत. सर्वात खास बाब म्हणजे यातील दोन, शाओमी रेडमी 6ए आणि रेडमी 6 मीडियाटेक चिपसेट सह उपलब्ध आहेत. पहिल्यांदाच कंपनी चे मीडियाटेक चिपसेट वाले फोन भारतात सेल साठी उपलब्ध होतील तर रेडमी 6 प्रो क्वालकॉम चिपसेट वर आधारित आहे. रेडमी 6 प्रो बद्दल संपूर्ण माहिती मिळवण्यासाठी इथे क्लिक करा.

याआधी शाओमी ने भारतात रेडमी नोट 3जी मॉडेल मीडियाटेक चिपसेट वर सादर केला होता पण तो फोन विक्रीच्या आधीच वादग्रस्त ठरला होता आणि कधीच सेल साठी आला नाही. परंतु आता पुन्हा एकदा शाओमी ने मीडियाटेक आणला आहे आणि दोन मॉडेल सादर केले आहेत. शाओमी रेडमी 6ए पाहता या फोन मध्ये 5.45—इंचाची एचडी+ (720 x 1440 पिक्सल रेजल्यूशन) वाली स्क्रीन देण्यात आली आहे. हा फोन 18:9 आसपेक्ट रेशियो वाल्या फुल व्यू डिसप्ले सह उपलब्ध आहे. पण कंपनी ने प्रोटेक्शन ची माहिती दिली नाही. शाओमी रेडमी 6 च्या माहितीसाठी इथे क्लिक करा.

शाओमी रेडमी 6ए मीयूआई 9 वर चालतो जो एंडरॉयड आॅपरेटिंग सिस्टम 8.1 ओरियो आधारित आहे. कंपनी ने याला मीडियाटेक हेलिया ए22 चिपसेटची ताकद दिली आहे. फोन मध्ये 2.0गीगाहट्र्जचा प्रोसेसर आहे जो या बजेट मध्ये खुप खास आहे.

भारतीय बाजारात हा फोन 2जीबी आणि 3जीबी रॅम मेमरी सह उपलब्ध आहे. त्याचबरोबर तुम्हाला 16जीबी आणि 32जीबी मेमरी मिळेल. फोन मध्ये मेमरी कार्ड सपोर्ट आहे आणि तुम्ही 216जीबीचे कार्ड वापरू शकता.

कॅमेरा पाहता शाओमी रेडमी 6ए मध्ये 13-मेगापिक्सलचा रियर कॅमेरा देण्यात आला आहे जो एफ/2.2 अपर्चर सह येतो. तसेच फास्ट फोकस साठी यात पीडीएएफ सपोर्ट आहे. फोनचा सेल्फी कॅमेरा 5मेगापिक्सल चा आहे आणि यात पण तुम्हाला एफ/2.2 अपर्चर मिळेल.

डाटा व कनेक्टिविटी पाहता शाओमी रेडमी 6ए मध्ये डुअल सिम सह 4जी वोएलटीई सपोर्ट आहे. त्याचबरोबर वाईफाई आणि ब्लूटूथ पण मिळेल. पण यात फिंगरप्रिंट स्कॅनर मिळणार नाही. पावर बॅकअप साठी कंपनी ने यात 3,000 एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे.

भारतीय बाजारात शाओमी रेडमी 6ए च्या 2जीबी रैम + 16जीबी मेमरी वेरियंट ची किंमत 5,999 रुपये आहे. तर 3जीबी रॅम + 32जीबी मेमरी वाला वेरियंट 6,999 रुपयांमध्ये विकत घेतला जाऊ शकतो. हा फोन 19 सप्टेंबर पासून सेल साठी आॅनलाइन स्टोर अमेजॉन आणि मी इंडिया स्टोर वर उपलब्ध होईल.

The post 5,999 रुपयांमध्ये लॉन्च झाला शाओमी चा सर्वात स्वस्त फोन रेडमी 6ए, जाणून घ्या फीचर्स आणि स्पेसिफिकेशन first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-redmi-6a-launched-in-india-price-specifications-and-features-in-marathi/feed/ 0
शाओमी रेडमी 6 आणि रेडमी 6ए मीडियाटेक चिपसेट सह भारतात पण होतील लॉन्च https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-redmi-6-redmi-6a-could-be-arriving-in-india-with-mediatek-chipset-price-feature-specification-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-redmi-6-redmi-6a-could-be-arriving-in-india-with-mediatek-chipset-price-feature-specification-in-marathi/#respond Wed, 13 Jun 2018 12:04:51 +0000 https://hub.91mobiles.com/marathi/?p=888 लक्षात असू दे की वर्ष 2014 मध्ये लॉन्च झालेला रेडमी नोट शाओमी चा शेवटचा मीडियाटेक चिपसेट वाला फोन होता जो भारतात लॉन्च झाला.

The post शाओमी रेडमी 6 आणि रेडमी 6ए मीडियाटेक चिपसेट सह भारतात पण होतील लॉन्च first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
शाओमी ने कालच आपल्या होम मार्केट मध्ये दोन नवीन स्मार्टफोन रेडमी 6 आणि रेडमी 6ए लॉन्च केले आहेत. हे दोन्ही स्मार्टफोन लो बजट सेग्मेंट मध्ये सादर करण्यात आला आहे जो मीडियाटेक च्या चिपसेट सह येतो. तसेच आता बातमी मिळाली आहे की कंपनी लवकरच आपले हे स्मार्टफोन भारतीय बाजारात पण आणू शकते. बातमी नुसार भारतात पण हे दोन्ही स्मार्टफोन मीडियाटेक चिपसेट वर लॉन्च होतील.

​मीडिया रिपोर्ट नुसार शाओमी आपल्या लेटेस्ट स्मार्टफोन रेडमी 6 आणि रेडमी 6ए भारतीय बाजारात पण लॉन्च करेल. मीडियाटेक चे चीफ फाइनेंशियल आॅफिसर डेविड कू ने दिलेल्या एका विधाना नंतर ही बातमी अजून निश्चित होताना दिसत आहे. विशेष म्हणजे वर्ष 2014 मध्ये एरिक्सन कंपनी ने शाओमी वर काही आरोपां सह केस केली होती, त्यानंतर शाओमी भारतात मीडियाटेक चिपसेट सह फोन लॉन्च करू शकत नव्हती आणि याच कारणामुळे शाओमी खुप काळापासून फक्त क्वालकॉम चिपसेट सह फोन घेऊन येत आहे.

पण आता ताजा अपडेट नुसार शाओमी आणि एरिक्सन मधील हा वाद आता सुटणार आहे आणि ही केस संपताच शााओमी भारतीय बाजारात मीडियाटेक चिपसेट वर चालणारे फोन लॉन्च करू शकेल. बोलले जात आहे की शाओमी कंपनी रेडमी 6 आणि रेडमी 6ए स्मार्टफोन सह इंडियन मार्केट मध्ये मीडियाटेक चिपसेट सह वापसी करेल. डेविड कू ने पण आपल्या वक्तव्यात स्पष्ट सांगितले आहे की शाओमी भारतात मीडियाटेक चिपसेट वाला फोन लॉन्च करेल.

लक्षात असू दे की वर्ष 2014 मध्ये लॉन्च झालेला रेडमी नोट शाओमी चा शेवटचा मीडियाटेक चिपसेट वाला फोन होता जो भारतात लॉन्च झाला. हा फोन एमटी6592 मीडियाटेक चिपसेट वर चालत होता. तसेच रेडमी सीरीज च्या नवीन स्मार्टफोन बद्दल बोलायचे झाले तर रेडमी 6 हेलीयो पी22 चिपसेट वर चालतो तर रेडमी 6ए ए22 चिपसेट वर लॉन्च करण्यात आला आहे. पण हे दोन्ही स्मार्टफोन भारतीय बाजारात येण्यासाठी थोडी वाट बघावी लागेल.

शाओमी रेडमी 6 आणि रेडमी 6ए चे फुल फीचर्स, स्पेसिफिकेशन्स आणि किंमत जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा

The post शाओमी रेडमी 6 आणि रेडमी 6ए मीडियाटेक चिपसेट सह भारतात पण होतील लॉन्च first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-redmi-6-redmi-6a-could-be-arriving-in-india-with-mediatek-chipset-price-feature-specification-in-marathi/feed/ 0
शाओमी रेडमी 6 आणि रेडमी 6ए लॉन्च, हे आहेत शानदार स्पेसिफिकेशन्स वाले स्वस्त स्मार्टफोन https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-redmi-6-and-6a-launched-in-china-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-redmi-6-and-6a-launched-in-china-in-marathi/#respond Tue, 12 Jun 2018 09:52:56 +0000 https://hub.91mobiles.com/marathi/?p=872 रेडमी 6 दोन वेरिएंट मध्ये लॉन्च करण्यात आला आहे तर रेडमी 6ए शाओमी ने एकाच वेरिएंट मध्ये आणला आहे.

The post शाओमी रेडमी 6 आणि रेडमी 6ए लॉन्च, हे आहेत शानदार स्पेसिफिकेशन्स वाले स्वस्त स्मार्टफोन first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
शाओमी वर्षाच्या सुरवाती पासूनच टेक बाजारात आक्रमक नजर दिसत आहे. कंपनी इंटरनेशनल मार्केट सहित भारता सारख्या मोठ्या बाजारात पण एका नंतर एक नवीन डिवाईस लॉन्च करत आहे. काही दिवसांपूर्वी शाओमी ने आपल्या 8व्या वर्धापनदिनानिमित्त तिन नवीन स्मार्टफोन मॉडेल मी 8, मी 8 इक्स्प्लॉरर एडिशन आणि मी 8 एसई लॉन्च केले आहेत. फ्लॅगशिप डिवाईस नंतर काही दिवसांनी के आज पुन्हा शाओमी ने आपले नवीन स्मार्टफोन समोर आणले आहेत. शाओमी ने रेडमी सीरीज मध्ये नेक्स्ट जेनरेशन स्मार्टफोन 6 लॉन्च केला आहे. या स्मार्टफोन सोबत कंपनी ने रेडमी 6ए पण चीनी बाजारात आणला आहे. रेडमी 6 दोन वेरिएंट मध्ये लॉन्च करण्यात आला आहे तर रेडमी 6ए शाओमी ने एकाच वेरिएंट मध्ये आणला आहे.

शाओमी रेडमी 6

डिजाईन : 18:9 आस्पेक्ट रेशियो, बेजल लेस

डिस्प्ले : 5.45-इंच एचडी+ (1440 x 720 पिक्सल)

रॅम : 3जीबी / 4जीबी

स्टोरेज : 32जीबी / 64जीबी

रियर कॅमेरा : 12-मेगापिक्सल + 5-मेगापिक्सल

फ्रंट कॅमेरा : 5-मेगापिक्सल

प्रोसेसर : 2.0 गीगाहर्ट्ज आॅक्टा-कोर, मीडियाटेक हेलीयो पी22 चिपसेट

एंडरॉयड : एंडरॉयड 8.1 ओरियो + मीयूआई 10

सिक्योरिटी : रियर फिंगरप्रिंट सेंसर + फेस अनलॉक

बॅटरी : 3,000एमएएच

किंमत : 3जीबी/32जीबी 799 युआन (8,500 रुपये)
4जीबी/64जीबी 999 युआन (10,500 रुपये)

शाओमी रेडमी 6ए

डिजाईन : 18:9 आस्पेक्ट रेशियो, बेजल लेस

डिस्प्ले : 5.45-इंच एचडी+ (1440 x 720 पिक्सल)

रॅम : 2जीबी

स्टोरेज : 16जीबी

रियर कॅमेरा : 13-मेगापिक्सल

फ्रंट कॅमेरा : 5-मेगापिक्सल

प्रोसेसर : 2.0 गीगाहर्ट्ज क्वॉड-कोर, मीडियाटेक हेलीयो ए22 चिपसेट

एंडरॉयड : एंडरॉयड 8.1 ओरियो + मीयूआई 10

सिक्योरिटी : रियर फिंगरप्रिंट सेंसर + फेस अनलॉक

बॅटरी : 3,000एमएएच

किंमत : 599 युआन (6,300 रुपये)

The post शाओमी रेडमी 6 आणि रेडमी 6ए लॉन्च, हे आहेत शानदार स्पेसिफिकेशन्स वाले स्वस्त स्मार्टफोन first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-redmi-6-and-6a-launched-in-china-in-marathi/feed/ 0