शाओमी फॅन्ससाठी खुशखबरी: कमी झाली रेडमी 6ए ची किंमत, बघा नवीन किंमत

यावर्षी शाओमी ने रेडमी 6ए भारतीय बाजारात सादर केला होता. हा फोन दोन मेमरी वेरियंट सह लॉन्च केला गेला होता, त्यांची किंमत क्रमश: 5,999 रुपये आणि 6,999 रुपये होती. लॉन्च वेळी कंपनी ने माहिती दिली होती की हि किंमत फक्त ​तीन महिन्यांसाठी आहे नंतर हि बदलली जाऊ शकते आणि काही महिन्यांनी शाओमीच्या या फोन्सची किंमत 500 रुपये आणि 600 रुपयांनी वाढवण्यात आली होती. तर आज कंपनी ने पुन्हा एकदा नवीन घोषणा केली आहे जी शाओमी फॅन्सना खुश करेल. कंपनी ने वाढवलेल्या किंमती कमी केल्या आहेत आणि हे फोन्स आता जुन्या किंमतीती विकत घेता येतील.

शाओमी रेडमी 6ए च्या 16जीबी मेमरी वेरियंटची किंमत आधी 6,499 रुपये होती पण आता हा 5,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल. तर 32जीबी वेरियंटची किंमत 7,599 रुपये होती जो आता 6,999 मध्ये उपलब्ध होईल.

शाओमी रेडमी 6ए चे के स्पेसिफिकेशन
शाओमी रेडमी 6ए चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स पाहता हा फोन 18:9 आस्पेक्ट रेशियो वाल्या बेजल ​लेस डिस्प्ले सह 720 x 1440 पिक्सल रेजल्यूशन वाली 5.45-इंचाच्या एचडी+ स्क्रीनला सपोर्ट करतो. हा फोन मीयूआई 9 आधारित एंडरॉयड 8.1 ओरियो वर सादर झाला आहे सोबत हा 2.0गीगाहर्ट्ज मीडियाटेक हेलियो ए22 चिपसेट वर चालतो.

फोटोग्राफी साठी शाओमी रेडमी 6ए मध्ये 13-मेगापिक्सलचा रियर कॅमेरा देण्यात आला आहे जो एफ/2.2 अपर्चर सह येतो. तसेच फास्ट फोकस साठी यात पीडीएएफ सपोर्ट आहे. फोनचा सेल्फी कॅमेरा 5मेगापिक्सलचा आहे आणि यात पण तुम्हाला एफ/2.2 अपर्चर मिळेल. डेटा व कनेक्टिविटी बद्दल बोलायचे तर शाओमी रेडमी 6ए मध्ये डुअल सिम सोबत 4जी वोएलटीई सपोर्ट आहे. तसेच वाईफाई आणि ब्लूटूथ पण मिळेल. पावर बॅकअप साठी कंपनी ने यात 3,000 एमएएच ची बॅटरी दिली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here