भारतीय बाजारात साल 2018 च्या सर्वात हिट स्मार्टफोन ब्रांड्सची जेव्हा लिस्ट बनेल तेव्हा त्यात शाओमीचे नाव सर्वात वर असण्याची शक्यता नाकारता येत नाही. वेगवेगळ्या बजेट मध्ये आपले स्मार्टफोन सादर करणाऱ्या शाओमी ने यावर्षी पण इंडियन बाजारात आपली घोडदौड चालू ठेवेल. शाओमीची फॅन फॉलोइंग पण भारतात खूप जास्त आहे आणि सतत वाढत आहे. आपल्या फॅन्सना न्यू ईयरची भेट देत शाओमी ने ‘आई लव मी’ सेल चे आयोजन केले आहे ज्यात शाओमी स्मार्टफोन्स वर 3,500 रुपयांपर्यंतची सूट देण्यात येत आहे.
शाओमी ने ‘आई लव मी’ सेलची सुरवात उद्या म्हणजे 6 डिसेंबर पासून होईल. हा सेल तीन दिवसांचा असेल जो 8 डिसेंबर पर्यंत चालेल. या सेल अंतर्गत शाओमीच्या वेगवेगळे स्मार्टफोन प्राइस कट तसेच भरभक्कम डिस्काउंट सह सेल साठी उपलब्ध होतील. शाओमी ने या सेल साठी शॉपिंग साइट अमेझॉन इंडिया सोबत हात मिळवणी केली आहे. आई लव मी सेल अंतर्गत शाओमीच्या आॅफिशियल वेबसाइट सोबत अमेझॉन इंडिया वर पण शाओमी स्मार्टफोन्स मोठ्या डिस्काउंट सह विकत घेता येतील.
I ❤️ Mi
Mi Fans! Special "I ❤️ Mi" sale only on @amazonIN from 6th to 8th December.
Three great offers:
* Upto ₹3,500 off on #MiA2
* Upto ₹2,000 off on #RedmiY2
* One more special surprise coming up tomorrow!RT if you also love #Xiaomi ? pic.twitter.com/xTBjpfpWEy
— Manu Kumar Jain (@manukumarjain) December 4, 2018
शाओमी आई लव मी सेल अंतर्गत कंपनीच्या हिट स्मार्टफोन मी ए2 वर 3,500 रुपयांची सूट दिली जात आहे. शाओमी मी ए2 देशात दोन वेरिएंट मध्ये उपलब्ध आहे. फोनच्या 6जीबी रॅम व 128जीबी स्टोरेज वेरिएंटची किंमत 18,999 रुपये आहे तर 4जीबी रॅम व 64जीबी मेमरी वेरिएंटची किंमत 15,999 रुपये आहे. पण आई लव मी सेल अंतर्गत शाओमी आपल्या या स्मार्टफोन वर 3,500 रुपयांपर्यंतचा डिस्काउंट देत आहे. म्हणजे मी ए2 चा मोठा वेरिएंट या सेल मध्ये 15,499 रुपयांमध्ये विकत घेता येईल.
रेडमी वाय2 स्मार्टफोन वर शाओमी 2,000 रुपयांची सूट देत आहे. आई लव मी सेल अंतर्गत 11,999 रुपयांचा रेडमी वाय2 चा 4जीबी रॅम व 64जीबी मेमरी वेरिएंट 9,999 रुपये तसेच 9,999 रुपयांचा रेडमी वाय2 चा 3जीबी रॅम व 32जीबी मेमरी वेरिएंट फक्त 7,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल. तसेच 2जीबी रॅम असलेला रेडमी 6ए स्मार्टफोन वर शाओमी थेट 1,000 रुपयांची सूट देत आहे.
The year-end celebrations have started a little early.
Get your #DeshKaNayaSmartphone #Redmi6A for just ₹5,999 on @AmazonIN and https://t.co/pMj1r73VxA.
Mark the dates: "I ❤️ Mi" sale from 6th to 8th December! pic.twitter.com/LSyjqZmTjn
— Manu Kumar Jain (@manukumarjain) December 5, 2018
आई लव मी सेल मध्ये 7,499 रुपयांचा रेडमी 6ए चा 32जीबी स्टोरेज वेरिएंट 1,000 रुपयांच्या डिस्काउंट नंतर 6,499 रुपयांमध्ये विकत घेता येईल. तसेच फोनचा 16जीबी मेमरी वेरिएंट पण कंपनी स्वस्तात विकत आहे. शाओमी ने आपल्या एका ट्वीट मध्ये रेडमी 6ए ची आॅफर प्राइज 5,999 सांगितली आहे. या ट्वीट वरून समजते की कंपनी रेडमी 6ए च्या 16जीबी स्टोरेज वेरीएंट वर 500 रुपयांचा डिस्काउंट देईल.














