Xiaomi Redmi Y2 - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Wed, 05 Dec 2018 14:03:25 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 शाओमी फॅन्स लक्ष द्या : उद्या पासून सुरु होत आहे ‘आई लव मी’ सेल, या शाओमी फोन वर मिळेल भरभक्कम डिस्काउंट, 3,500 रुपयांची सूट https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-i-love-mi-sale-offer-redmi-6s-redmi-y2-mi-a2-price-cut-discount-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-i-love-mi-sale-offer-redmi-6s-redmi-y2-mi-a2-price-cut-discount-in-marathi/#respond Wed, 05 Dec 2018 14:03:25 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=3064 आपल्या फॅन्सना न्यू ईयरची भेट देत शाओमी ने ‘आई लव मी’ सेल चे आयोजन केले आहे ज्यात शाओमी स्मार्टफोन्स वर 3,500 रुपयांपर्यंतची सूट देण्यात येत आहे.

The post शाओमी फॅन्स लक्ष द्या : उद्या पासून सुरु होत आहे ‘आई लव मी’ सेल, या शाओमी फोन वर मिळेल भरभक्कम डिस्काउंट, 3,500 रुपयांची सूट first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
भारतीय बाजारात साल 2018 च्या सर्वात हिट स्मार्टफोन ब्रांड्सची जेव्हा लिस्ट बनेल तेव्हा त्यात शाओमीचे नाव सर्वात वर असण्याची शक्यता नाकारता येत नाही. वेगवेगळ्या बजेट मध्ये आपले स्मार्टफोन सादर करणाऱ्या शाओमी ने यावर्षी पण इंडियन बाजारात आपली घोडदौड चालू ठेवेल. शाओमीची फॅन फॉलोइंग पण भारतात खूप जास्त आहे आणि सतत वाढत आहे. आपल्या फॅन्सना न्यू ईयरची भेट देत शाओमी ने ‘आई लव मी’ सेल चे आयोजन केले आहे ज्यात शाओमी स्मार्टफोन्स वर 3,500 रुपयांपर्यंतची सूट देण्यात येत आहे.

शाओमी ने ‘आई लव मी’ सेलची सुरवात उद्या म्हणजे 6 डिसेंबर पासून होईल. हा सेल तीन दिवसांचा असेल जो 8 डिसेंबर पर्यंत चालेल. या सेल अंतर्गत शाओमीच्या वेगवेगळे स्मार्टफोन प्राइस कट तसेच भरभक्कम डिस्काउंट सह सेल साठी उपलब्ध होतील. शाओमी ने या सेल साठी शॉपिंग साइट अमेझॉन इंडिया सोबत हात मिळवणी केली आहे. आई लव मी सेल अंतर्गत शाओमीच्या आॅफिशियल वेबसाइट सोबत अमेझॉन इंडिया वर पण शाओमी स्मार्टफोन्स मोठ्या डिस्काउंट सह विकत घेता येतील.

शाओमी आई लव मी सेल अंतर्गत कंपनीच्या हिट स्मार्टफोन मी ए2 वर 3,500 रुपयांची सूट दिली जात आहे. शाओमी मी ए2 देशात दोन वेरिएंट मध्ये उपलब्ध आहे. फोनच्या 6जीबी रॅम व 128जीबी स्टोरेज वेरिएंटची किंमत 18,999 रुपये आहे तर 4जीबी रॅम व 64जीबी मेमरी वेरिएंटची किंमत 15,999 रुपये आहे. पण आई लव मी सेल अंतर्गत शाओमी आपल्या या स्मार्टफोन वर 3,500 रुपयांपर्यंतचा डिस्काउंट देत आहे. म्हणजे मी ए2 चा मोठा वेरिएंट या सेल मध्ये 15,499 रुपयांमध्ये विकत घेता येईल.

रेडमी वाय2 स्मार्टफोन वर शाओमी 2,000 रुपयांची सूट देत आहे. आई लव मी सेल अंतर्गत 11,999 रुपयांचा रेडमी वाय2 चा 4जीबी रॅम व 64जीबी मेमरी वेरिएंट 9,999 रुपये तसेच 9,999 रुपयांचा रेडमी वाय2 चा 3जीबी रॅम व 32जीबी मेमरी वेरिएंट फक्त 7,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल. तसेच 2जीबी रॅम असलेला रेडमी 6ए स्मार्टफोन वर शाओमी थेट 1,000 रुपयांची सूट देत आहे.

आई लव मी सेल मध्ये 7,499 रुपयांचा रेडमी 6ए चा 32जीबी स्टोरेज वेरिएंट 1,000 रुपयांच्या डिस्काउंट नंतर 6,499 रुपयांमध्ये विकत घेता येईल. तसेच फोनचा 16जीबी मेमरी वेरिएंट पण कंपनी स्वस्तात विकत आहे. शाओमी ने आपल्या एका ट्वीट मध्ये रेडमी 6ए ची आॅफर प्राइज 5,999 सांगितली आहे. या ट्वीट वरून समजते की कंपनी रेडमी 6ए च्या 16जीबी स्टोरेज वेरीएंट वर 500 रुपयांचा डिस्काउंट देईल.

The post शाओमी फॅन्स लक्ष द्या : उद्या पासून सुरु होत आहे ‘आई लव मी’ सेल, या शाओमी फोन वर मिळेल भरभक्कम डिस्काउंट, 3,500 रुपयांची सूट first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-i-love-mi-sale-offer-redmi-6s-redmi-y2-mi-a2-price-cut-discount-in-marathi/feed/ 0
शाओमी फॅन्सना भेट, आता रिटेल स्टोर्स वर पण मिळेल रेडमी वाय2 स्मार्टफोन https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-redmi-y2-available-offline-retail-stores-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-redmi-y2-available-offline-retail-stores-in-marathi/#respond Mon, 09 Jul 2018 09:18:05 +0000 https://hub.91mobiles.com/marathi/?p=1189 आॅनलाईन चॅनल्स वर फोन चा 3जीबी रॅम/32जीबी मेमरी वेरिएंट 9,999 रुपयांमध्ये मिळत होता तर आॅफलाईन स्टोर्स वर हा फोन 10,499 रुपयांमध्ये विकत घेता येईल.

The post शाओमी फॅन्सना भेट, आता रिटेल स्टोर्स वर पण मिळेल रेडमी वाय2 स्मार्टफोन first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
इंडियन स्मार्टफोन मार्केट मधील सर्वात जास्त विश्वासू कंपनी शाओमी ने मागच्या महिन्यात भारतात आपल्या रेडमी वाय स्मार्टफोन सीरीज ला पुढे नेत रेडमी वाय2 स्मार्टफोन लॉन्च केला होता. हा फोन अजून पर्यंत मी डॉट कॉम आणि अमेजॉन इंडिया वर एक्सक्लूसिव विकला जात होता. पण आता आपल्या फॅन्सना भेट देत शाओमी इंडिया ने रेडमी वाय2 आॅफलाईन स्टोर्स वर पण सेल साठी उपलब्ध केला आहे. रेडमी वाय2 तुमच्या नजीकच्या रिटेल स्टोर वरून विकत घेता येईल.

शाओमी रेडमी वाय2 भारतात दोन वेरिएंट मध्ये लॉन्च झाला होता. आॅनलाईन चॅनल्स वर फोन चा 3जीबी रॅम/32जीबी मेमरी वेरिएंट 9,999 रुपयांमध्ये मिळत होता तर आॅफलाईन स्टोर्स वर हा फोन 10,499 रुपयांमध्ये विकत घेता येईल. त्याचप्रमाणे रेडमी वाय2 चा 4जीबी रॅम/64जीबी मेमरी वेरिएंट आॅनलाईन वेबसाइट वर 12,999 रुपयांमध्ये मिळत होता तर आॅफलाईन दुकानांमधे हा 13,499 रुपयांमध्ये विकत घेता येईल. तुम्हाला तर दिसत आहे की आॅफलाईन स्टोर्स वर यूजर्सना 500 रुपये अधिक द्यावे लागतील.

शाओमी रेडमी वाय2 च्या फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स बद्दल बोलायचे तर हा फोन पण ट्रेंड मध्ये असलेल्या 18:9 आस्पेक्ट रेशियो वाल्या बेजल लेस डिसप्ले सह सादर करण्यात आला आहे. फोन मध्ये 1440 x 720 पिक्सल रेज्ल्यूशन वाली 5.99-इंचाची एचडी+ स्क्रीन देण्यात आली आहे. हा फोन मीयूआई 9 आधारित एंडरॉयड ओरियो वर सादर करण्यात आला आहे तसेच हा आॅक्टा-कोर प्रोसेसर सह क्वालकॉम च्या स्नॅपड्रॅगन 625 चिपसेट वर चालतो. तर ग्राफिक्स साठी यात एड्रेनो 506 जीपीयू आहे.

दोन्ही वेरिएंट ची इंटरनल स्टोरेज 256जीबी पर्यंत वाढवता येते. शाओमी रेडमी वाय2 कॅमेरा सेग्मेंट मध्ये एआई टेक्निक आहे फोन च्या बॅक पॅनल वर एलईडी फ्लॅश सह डुअल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे ज्यात 12-मेगापिक्सल आणि 5-मेगापिक्सल चे कॅमेरा सेंसर आहेत. तसेच सेल्फी साठी यात 16-मेगापिक्सल चा फ्रंट कॅमेरा आहे.

शाओमी रेडमी वाय2 च्या बॅक पॅनल वर फिंगरप्रिंट सेंसर आहे तसेच हा फोन फेस अनलॉक फीचर ला पण सपोर्ट करतो. 4जी एलटीई, डुअल सिम व बेसिक कनेक्टिविफी फीचर्स सह फोन मध्ये 3,080एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे. शाओमी रेडमी वाय2 डार्क ग्रे, रोज गोल्ड आणि गोल्ड ह्यू कलर वेरिएंट मध्ये विकत घेता येईल.

The post शाओमी फॅन्सना भेट, आता रिटेल स्टोर्स वर पण मिळेल रेडमी वाय2 स्मार्टफोन first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-redmi-y2-available-offline-retail-stores-in-marathi/feed/ 0
शाओमी रेडमी वाय2 झाला भारतात लॉन्च, 12 जून पासून होईल पहिला सेल https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-redmi-y2-launch-in-india-price-features-specifications-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-redmi-y2-launch-in-india-price-features-specifications-in-marathi/#respond Thu, 07 Jun 2018 11:41:29 +0000 https://hub.91mobiles.com/marathi/?p=817 शाओमी रेडमी वाय2 च्या बॅक पॅनल वर फिंगरप्रिंट सेंसर आहे तसेच हा फोन फेस अनलॉक फीचर ला पण सपोर्ट करतो.

The post शाओमी रेडमी वाय2 झाला भारतात लॉन्च, 12 जून पासून होईल पहिला सेल first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
इंडियन स्मार्टफोन मार्केट मध्ये सर्वात जास्त विश्वासू कंपनी शाओमी ने आपल्या भारतीय फॅन्स साठी अजून एक भेट आणली आहे. शाओमी ने भारतात आपला अजून एक नवीन स्मार्टफोन लॉन्च केला आहे. मागच्या वर्षी रेडमी वाय सीरीज ने आपल्या सेल्फी सेंट्रिक स्मार्टफोन ची सुरवात करणार्‍या शाओमी ने आपल्या या सीरीज चा विस्तार केला आहे. शाओमी ने भारतीय बाजारात रेडमी वाय2 स्मार्टफोन लॉन्च केला आहे, जो 12 जून पासून पाहिल्या सेल साठी उपलब्ध होईल.

शाओमी रेडमी वाय2 मध्ये शानदार लुक सह दमदार स्पेसिफिकेशन्स आहेत. विशेष म्हणजे हाच स्मार्टफोन काही दिवसांपूर्वी चीन मध्ये रेडमी एस2 नावाने लॉन्च करण्यात आला आहे. शाओमी रेडमी वाय2 च्या फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स बद्दल बोलायचे तर हा फोन पण ट्रेंड मध्ये असलेल्या 18:9 आस्पेक्ट रेशियो वाल्या बेजल लेस डिसप्ले सह सादर करण्यात आला आहे. फोन मध्ये 1440 x 720 पिक्सल रेज्ल्यूशन वाली 5.99-इंचाची एचडी+ स्क्रीन देण्यात आली आहे. हा फोन मीयूआई 9 आधारित एंडरॉयड ओरियो वर सादर करण्यात आला आहे तसेच हा आॅक्टा-कोर प्रोसेसर सह क्वालकॉम च्या स्नॅपड्रॅगन 625 चिपसेट वर चालतो. तर ग्राफिक्स साठी यात एड्रेनो 506 जीपीयू आहे.

शाओमी रेडमी वाय2 ला कंपनी ने दोन वेरिएंट मध्ये लॉन्च केले आहे. एक वेरिएंट मध्ये 3जीबी रॅम मेमरी आणि 32जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे तर दुसर्‍या वेरिएंट मध्ये 4जीबी रॅम आणि 64जीबी ची इंटरनल स्टोरेज आहे. दोन्ही वेरिएंट ची इंटरनल स्टोरेज 256जीबी पर्यंत वाढवता येते. शाओमी रेडमी वाय2 कॅमेरा सेग्मेंट मध्ये एआई टेक्निक आहे फोन च्या बॅक पॅनल वर एलईडी फ्लॅश सह डुअल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे ज्यात 12-मेगापिक्सल आणि 5-मेगापिक्सल चे कॅमेरा सेंसर आहेत. तसेच सेल्फी साठी यात 16-मेगापिक्सल चा फ्रंट कॅमेरा आहे.

शाओमी रेडमी वाय2 च्या बॅक पॅनल वर फिंगरप्रिंट सेंसर आहे तसेच हा फोन फेस अनलॉक फीचर ला पण सपोर्ट करतो. 4जी एलटीई, डुअल सिम व बेसिक कनेक्टिविफी फीचर्स सह फोन मध्ये 3,080एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे. शाओमी रेडमी वाय2 डार्क ग्रे, रोज गोल्ड आणि गोल्ड ह्यू कलर वेरिएंट मध्ये अमेजॉन इंडिया आणि मी डॉट कॉम वरून एक्सक्सूसिव विकत घेता येईल किंमत पाहता रेडमी वाय2 चा 3जीबी रॅम वेरिएंट 9,999 रुपयांमध्ये लॉन्च झाला आहे तर 4जीबी रॅम वेरिएंट ची किंमत 12,999 रुपये ठेवण्यात आली आहे.

The post शाओमी रेडमी वाय2 झाला भारतात लॉन्च, 12 जून पासून होईल पहिला सेल first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-redmi-y2-launch-in-india-price-features-specifications-in-marathi/feed/ 0
शाओमी घेऊन येत आहे अजून एक नवीन स्मार्टफोन, 7 जूनला होईल भारतात लॉन्च https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-redmi-y2-launch-date-in-india-7-june-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-redmi-y2-launch-date-in-india-7-june-in-marathi/#respond Thu, 24 May 2018 11:43:29 +0000 https://hub.91mobiles.com/marathi/?p=626 विशेष म्हणजे भारतात लॉन्च होणारा रेडमी वाई2 तोच स्मार्टफोन आहे जो शाओमी चीन मध्ये रेडमी एस2 नावाने लॉन्च केला गेला आहे.

The post शाओमी घेऊन येत आहे अजून एक नवीन स्मार्टफोन, 7 जूनला होईल भारतात लॉन्च first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
शाओमी ने रेडमी इंडिया च्या आॅफिशियल ट्वीटर हँडल वरून काही दिवसांपूर्वी टीजर शेयर करून ही ​हिंट दिली होती की कंपनी येणार्‍या 7 जूनला भारतात नवीन डिवाईस घेऊन येत आहे. शाओमी ने या नवीन डिवाईस चे नाव गुलदस्त्यात ठेवले होते, पण आता कंपनी ने अधिकृतपणे मीडिया इन्वाईट शेयर केले आहेत. शाओमी इंडिया ने 7 जूनला होणार्‍या ईवेंट साठी मीडिया इन्वाईट शेयर करून आगामी फोन ची माहिती दिली आहे.

शाओमी इंडिया ने मीडिया इन्वाईट शेयर करून सांगितले की कंपनी येणार्‍या 7 जूनला भारतात आपला नवीन स्मार्टफोन लॉन्च करणार आहे. शाओमी 7 जूनला राष्ट्रीय राजधानी दिल्ली मध्ये या लॉन्च ईवेंट चे अयोजन करत आहे आणि याच मंचावरून नवीन शाओमी फोन भारतीय टेक बाजारात येईल. शाओमी ने अजूनपर्यंत लॉन्च केल्या जाणार्‍या स्मार्टफोन चे नाव सांगितले नाही पण मिळालेल्या माहितीनुसार शाओमी चा नवीन स्मार्टफोन रेडमी वाई2 नावाने देशात लॉन्च होईल.

विशेष म्हणजे भारतात लॉन्च होणारा रेडमी वाई2 तोच स्मार्टफोन आहे जो शाओमी चीन मध्ये रेडमी एस2 नावाने लॉन्च केला गेला आहे. चीन मध्ये रेडमी एस2 3जीबी रॅम/32जीबी मेमरी आणि 4जीबी रॅम/64जीबी मेमरी च्या दोन वेरिएंट मध्ये लॉन्च करण्यात आला आहे. या फोन मध्ये 18:9 आस्पेक्ट रेशियो वाला 5.99-इंचाचा एचडी+ बेजल लेस डिसप्ले देण्यात आला आहे.हा फोन मीयूआई 9 आधारित एंडरॉयड ओरियो वर सादर करण्यात आला आहे तसेच हा आॅक्टा-कोर प्रोसेसर सह क्वालकॉम च्या स्नॅपड्रॅगन 625 चिपसेट वर चालतो. तर ग्राफिक्स साठी यात एड्रेनो 506 जीपीयू आहे.

फोटोग्राफी साठी शाओमी रेडमी एस2 च्या बॅक पॅनल वर डुअल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे जो 12-मेगापिक्सल आणि 5-मेगापिक्सलचा रियर कॅमेरा सेंसर आहे. तसेच सेल्फी साठी या फोन मध्ये 16-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. फोन च्या बॅक पॅनल वर फिंगरप्रिंट सेंसर आहे तसेच हा फोन फेस अनलॉक फीचर ला पण सपोर्ट करतो. 4जी एलटीई, डुअल सिम व बेसिक कनेक्टिविफी फीचर्स सह फोन मध्ये 3,080एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे. चीन मध्ये शाओमी रेडमी एस2 ग्रे, पिंक आणि गोल्ड ह्यू कलर वेरिएंट मध्ये लॉन्च करण्यात आला आहे.

शाओमी रेडमी वाई2 भारतात याच स्पेसिफिकेशन्स सह लॉन्च होईल किंवा नाही याची कंपनी ने कोणतीच माहिती दिली नाही. तसेच 7 जूनला लॉन्च झाल्यानंतर हा स्मार्टफोन कधी पासून देशात सेल साठी उपलब्ध होईल आणि याची किंमत काय असेल, यासाठी फोन लॉन्च ची वाट बघावी लागेल.

The post शाओमी घेऊन येत आहे अजून एक नवीन स्मार्टफोन, 7 जूनला होईल भारतात लॉन्च first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-redmi-y2-launch-date-in-india-7-june-in-marathi/feed/ 0
7 जूनला भारतात लॉन्च होत आहे नवीन शाओमी फोन, टीजर आला समोर https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-to-launch-new-smartphone-in-india-on-7-june-7-could-be-redmi-s2-by-redmi-y2-name-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-to-launch-new-smartphone-in-india-on-7-june-7-could-be-redmi-s2-by-redmi-y2-name-in-marathi/#respond Mon, 14 May 2018 13:34:21 +0000 https://hub.91mobiles.com/marathi/?p=434 शाओमी ने रेडमी इंडिया च्या ट्वीटर हँडल वरून याची माहिती दिली आहे.

The post 7 जूनला भारतात लॉन्च होत आहे नवीन शाओमी फोन, टीजर आला समोर first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
शाओमी ने मागच्या महिन्यात काही स्मार्टफोन लॉन्च केले आहेत. काही दिवसांपूर्वी शाओमी ने चीनी मध्ये रेडमी एस2 स्मार्टफोन लॉन्च केला होता. त्याचप्रमाणे शाओमी आता आपला एक नवीन स्मार्टफोन भारतात आणण्याची तयारी करत आहे. रेडमी इंडिया ने आपल्या आॅफिशियल ट्वीटर हँडल वरून एक टीजर पोस्ट करून नवीन स्मार्टफोन भारतात लॉन्च होईल याची माहिती दिली. शाओमी ने घोषणा केली आहे की येणार्‍या 7 जूनला कपंनी भारतात आपला नवीन स्मार्टफोन लॉन्च करणार आहे.

शाओमी ने रेडमी इंडिया च्या ट्वीटर हँडल वरून याची माहिती दिली आहे. पण कंपनी ने हे नाही सांगितले की 7 जूनला भारतात कोणता फोन लॉन्च होईल परंतु हे मात्र स्पष्ट केले आहे की हा स्मार्टफोन एक सेल्फी सेंट्रिक फोन असेल. ट्वीटर वर टीजर पोस्ट करताना कंपनी ने हॅशटॅग सह ‘RealYou’ लिहले आहे. या हॅशटॅग मध्ये ‘वाय’ रेड कलर ने हाईलाईट करण्यात आला आहे. आम्हाला वाटते की शाओमी 7 जूनला आपल्या रेडमी वाय सीरीज मध्ये नवीन स्मार्टफोन लॉन्च करेल जो ‘रेडमी वाय2’ नावाने बाजारात येईल.

शाओमी चीन मध्ये लॉन्च झालेल्या स्मार्टफोन रेडमी एस2 लाच भारतात रेडमी वाय2 नावाने लॉन्च करेल याची दाट शक्यता आहे. शाओमी रेडमी एस2 ला कंपनी ने दोन वेरिएंट मध्ये लॉन्च केले आहे. एक वेरिएंट मध्ये 3जीबी ची रॅम मेमरी आणि 32जीबी ची इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे तर दुसर्‍या वेरिएंट मध्ये 4जीबी रॅम आणि 64जीबी इंटरनल स्टोरेज आहे. दोन्ही वेरिएंट ची इंटरनल स्टोरेज 256जीबी पर्यंत वाढवता येते. शाओमी ने 3जीबी रॅम वेरिंएट 999 चीनी युआन aani 4जीबी रॅम वेरिएंट 1,299 युआन मध्ये लॉन्च केला आहे. भारतीय करंसी अनुसार ही किंमत क्रमश: 10,500 रुपये आणि 13,700 रुपयांच्या आसपास आहे.

शाओमी रेडमी एस2 च्या फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स बद्दल बोलायचे तर हा फोन पण ट्रेंड मध्ये असलेल्या 18:9 आस्पेक्ट रेशियो वाल्या बेजल लेस डिसप्ले सह सादर करण्यात आला आहे. फोन मध्ये 1440 x 720 पिक्सल रेज्ल्यूशन वाली 5.99-इंचाची एचडी+ स्क्रीन देण्यात आली आहे. हा फोन मीयूआई 9 आधारित एंडरॉयड ओरियो वर सादर करण्यात आला आहे तसेच हा आॅक्टा-कोर प्रोसेसर सह क्वालकॉम च्या स्नॅपड्रॅगन 625 चिपसेट वर चालतो. तर ग्राफिक्स साठी यात एड्रेनो 506 जीपीयू आहे.

फोटोग्राफी साठी शाओमी रेडमी एस2 च्या बॅक पॅनल वर डुअल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे जो 12-मेगापिक्सल आणि 5-मेगापिक्सलचा रियर कॅमेरा सेंसर आहे. तसेच सेल्फी साठी या फोन मध्ये 16-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. फोन च्या बॅक पॅनल वर फिंगरप्रिंट सेंसर आहे तसेच हा फोन फेस अनलॉक फीचर ला पण सपोर्ट करतो. 4जी एलटीई, डुअल सिम व बेसिक कनेक्टिविफी फीचर्स सह फोन मध्ये 3,080एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे. चीन मध्ये शाओमी रेडमी एस2 ग्रे, पिंक आणि गोल्ड ह्यू कलर वेरिएंट मध्ये लॉन्च करण्यात आला आहे.

The post 7 जूनला भारतात लॉन्च होत आहे नवीन शाओमी फोन, टीजर आला समोर first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-to-launch-new-smartphone-in-india-on-7-june-7-could-be-redmi-s2-by-redmi-y2-name-in-marathi/feed/ 0