शाओमी घेऊन येत आहे अजून एक नवीन स्मार्टफोन, 7 जूनला होईल भारतात लॉन्च

शाओमी ने रेडमी इंडिया च्या आॅफिशियल ट्वीटर हँडल वरून काही दिवसांपूर्वी टीजर शेयर करून ही ​हिंट दिली होती की कंपनी येणार्‍या 7 जूनला भारतात नवीन डिवाईस घेऊन येत आहे. शाओमी ने या नवीन डिवाईस चे नाव गुलदस्त्यात ठेवले होते, पण आता कंपनी ने अधिकृतपणे मीडिया इन्वाईट शेयर केले आहेत. शाओमी इंडिया ने 7 जूनला होणार्‍या ईवेंट साठी मीडिया इन्वाईट शेयर करून आगामी फोन ची माहिती दिली आहे.

शाओमी इंडिया ने मीडिया इन्वाईट शेयर करून सांगितले की कंपनी येणार्‍या 7 जूनला भारतात आपला नवीन स्मार्टफोन लॉन्च करणार आहे. शाओमी 7 जूनला राष्ट्रीय राजधानी दिल्ली मध्ये या लॉन्च ईवेंट चे अयोजन करत आहे आणि याच मंचावरून नवीन शाओमी फोन भारतीय टेक बाजारात येईल. शाओमी ने अजूनपर्यंत लॉन्च केल्या जाणार्‍या स्मार्टफोन चे नाव सांगितले नाही पण मिळालेल्या माहितीनुसार शाओमी चा नवीन स्मार्टफोन रेडमी वाई2 नावाने देशात लॉन्च होईल.

विशेष म्हणजे भारतात लॉन्च होणारा रेडमी वाई2 तोच स्मार्टफोन आहे जो शाओमी चीन मध्ये रेडमी एस2 नावाने लॉन्च केला गेला आहे. चीन मध्ये रेडमी एस2 3जीबी रॅम/32जीबी मेमरी आणि 4जीबी रॅम/64जीबी मेमरी च्या दोन वेरिएंट मध्ये लॉन्च करण्यात आला आहे. या फोन मध्ये 18:9 आस्पेक्ट रेशियो वाला 5.99-इंचाचा एचडी+ बेजल लेस डिसप्ले देण्यात आला आहे.हा फोन मीयूआई 9 आधारित एंडरॉयड ओरियो वर सादर करण्यात आला आहे तसेच हा आॅक्टा-कोर प्रोसेसर सह क्वालकॉम च्या स्नॅपड्रॅगन 625 चिपसेट वर चालतो. तर ग्राफिक्स साठी यात एड्रेनो 506 जीपीयू आहे.

फोटोग्राफी साठी शाओमी रेडमी एस2 च्या बॅक पॅनल वर डुअल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे जो 12-मेगापिक्सल आणि 5-मेगापिक्सलचा रियर कॅमेरा सेंसर आहे. तसेच सेल्फी साठी या फोन मध्ये 16-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. फोन च्या बॅक पॅनल वर फिंगरप्रिंट सेंसर आहे तसेच हा फोन फेस अनलॉक फीचर ला पण सपोर्ट करतो. 4जी एलटीई, डुअल सिम व बेसिक कनेक्टिविफी फीचर्स सह फोन मध्ये 3,080एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे. चीन मध्ये शाओमी रेडमी एस2 ग्रे, पिंक आणि गोल्ड ह्यू कलर वेरिएंट मध्ये लॉन्च करण्यात आला आहे.

शाओमी रेडमी वाई2 भारतात याच स्पेसिफिकेशन्स सह लॉन्च होईल किंवा नाही याची कंपनी ने कोणतीच माहिती दिली नाही. तसेच 7 जूनला लॉन्च झाल्यानंतर हा स्मार्टफोन कधी पासून देशात सेल साठी उपलब्ध होईल आणि याची किंमत काय असेल, यासाठी फोन लॉन्च ची वाट बघावी लागेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here