शाओमी रेडमी वाय2 झाला भारतात लॉन्च, 12 जून पासून होईल पहिला सेल

इंडियन स्मार्टफोन मार्केट मध्ये सर्वात जास्त विश्वासू कंपनी शाओमी ने आपल्या भारतीय फॅन्स साठी अजून एक भेट आणली आहे. शाओमी ने भारतात आपला अजून एक नवीन स्मार्टफोन लॉन्च केला आहे. मागच्या वर्षी रेडमी वाय सीरीज ने आपल्या सेल्फी सेंट्रिक स्मार्टफोन ची सुरवात करणार्‍या शाओमी ने आपल्या या सीरीज चा विस्तार केला आहे. शाओमी ने भारतीय बाजारात रेडमी वाय2 स्मार्टफोन लॉन्च केला आहे, जो 12 जून पासून पाहिल्या सेल साठी उपलब्ध होईल.

शाओमी रेडमी वाय2 मध्ये शानदार लुक सह दमदार स्पेसिफिकेशन्स आहेत. विशेष म्हणजे हाच स्मार्टफोन काही दिवसांपूर्वी चीन मध्ये रेडमी एस2 नावाने लॉन्च करण्यात आला आहे. शाओमी रेडमी वाय2 च्या फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स बद्दल बोलायचे तर हा फोन पण ट्रेंड मध्ये असलेल्या 18:9 आस्पेक्ट रेशियो वाल्या बेजल लेस डिसप्ले सह सादर करण्यात आला आहे. फोन मध्ये 1440 x 720 पिक्सल रेज्ल्यूशन वाली 5.99-इंचाची एचडी+ स्क्रीन देण्यात आली आहे. हा फोन मीयूआई 9 आधारित एंडरॉयड ओरियो वर सादर करण्यात आला आहे तसेच हा आॅक्टा-कोर प्रोसेसर सह क्वालकॉम च्या स्नॅपड्रॅगन 625 चिपसेट वर चालतो. तर ग्राफिक्स साठी यात एड्रेनो 506 जीपीयू आहे.

शाओमी रेडमी वाय2 ला कंपनी ने दोन वेरिएंट मध्ये लॉन्च केले आहे. एक वेरिएंट मध्ये 3जीबी रॅम मेमरी आणि 32जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे तर दुसर्‍या वेरिएंट मध्ये 4जीबी रॅम आणि 64जीबी ची इंटरनल स्टोरेज आहे. दोन्ही वेरिएंट ची इंटरनल स्टोरेज 256जीबी पर्यंत वाढवता येते. शाओमी रेडमी वाय2 कॅमेरा सेग्मेंट मध्ये एआई टेक्निक आहे फोन च्या बॅक पॅनल वर एलईडी फ्लॅश सह डुअल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे ज्यात 12-मेगापिक्सल आणि 5-मेगापिक्सल चे कॅमेरा सेंसर आहेत. तसेच सेल्फी साठी यात 16-मेगापिक्सल चा फ्रंट कॅमेरा आहे.

शाओमी रेडमी वाय2 च्या बॅक पॅनल वर फिंगरप्रिंट सेंसर आहे तसेच हा फोन फेस अनलॉक फीचर ला पण सपोर्ट करतो. 4जी एलटीई, डुअल सिम व बेसिक कनेक्टिविफी फीचर्स सह फोन मध्ये 3,080एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे. शाओमी रेडमी वाय2 डार्क ग्रे, रोज गोल्ड आणि गोल्ड ह्यू कलर वेरिएंट मध्ये अमेजॉन इंडिया आणि मी डॉट कॉम वरून एक्सक्सूसिव विकत घेता येईल किंमत पाहता रेडमी वाय2 चा 3जीबी रॅम वेरिएंट 9,999 रुपयांमध्ये लॉन्च झाला आहे तर 4जीबी रॅम वेरिएंट ची किंमत 12,999 रुपये ठेवण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here