Categories: बातम्या

अमेरिकन आयफोनला मिळणार स्वदेशी ‘टच’; लवकरच TATA कंपनी बनवू शकते iPhone

iPhone 14 series जगभरात लाँच झाल्यानंतर आता बातमी समोर आली आहे की भारतात लवकरच Tata नं बनवलेले iPhone विक्रीसाठी येऊ शकतात. TATA Group आणि Taiwanese सप्लायर Wistron Corp दरम्यान जॉईंट वेंचरची चर्चा सुरु आहे, ज्यात भारतात Apple iPhone ची निर्मिती केली जाईल. अशी माहिती Bloomberg च्या रिपोर्टमधून समोर आली आहे. कंपनीकडून याबाबत अजूनतरी कोणतीही अधिकृत माहिती समोर आली नाही. परंतु डील फायनल झाल्यास TATA भारतात पहिली कंपनी बनेल जी iPhones ची निर्मिती करेल.

TATA बनवू शकते iPhone?

रिपोर्टनुसार मॅन्युफॅक्चरिंगच्या जॉईंट वेंचरसाठी कंपन्यांमध्ये चर्चा सुरु आहे. अशाप्रकारे टाटा ग्रुप (Tata Group) भारतात आयफोन असेंबल करणारी पहिली कंपनी बनू पाहत आहे. टाटा ग्रुप आणि विस्ट्रॉन कॉर्प (Wistron Corp.) यांच्यातील ही चर्चा आता सुरु झाली आहे, परंतु सर्व गोष्टी फायनल होण्यास वेळ लागू शकतो. हे देखील वाचा: iPhone 14 Series India Price: जुन्याच किंमतीत आला नवीन आयफोन 14, जाणून घ्या आयफोन 14 प्रो मॅक्स पर्यंतच्या सर्व मॉडेल्सची किंमत

सध्या आयफोन प्रामुख्याने तैवान मधील मॅन्युफॅक्चरिंग कंपनी विस्ट्रॉन आणि फॉक्सकॉन टेक्नॉलॉजीद्वारे असेंबल केला जातो. या कंपन्या चीन आणि भारतात आयफोन असेंबल करतात. अ‍ॅप्पलला या चर्चेविषयी माहिती आहे की नाही हे अजूनतरी समजले नाही. दिग्गज अमेरिकन टेक कंपनी अ‍ॅप्पलला चीनच्या बाहेर आपली मॅन्युफॅक्चरिंग आणायची आहे. तसेच अ‍ॅप्पलला भारतात आपल्या सप्लाई चेनचा देखील विस्तार करायचा आहे.

बातम्यांनुसार, Apple चीनच्या बाहेर आपल्या iPhones च्या निर्मितीसाठी पर्याय शोधत आहे आणि जगभरात आपले iPhone मॉडेल बनवणे आणि शिप करण्यासाठी चीनवर अवलंबून राहणं हळूहळू कमी करायचं आहे. यामागे चीनी आणि अमेरिकन सरकारमधील मतभेद कारणीभूत आहेत. हे देखील वाचा: सर्वात प्रीमियम फीचर्स आणि नव्याकोऱ्या डिजाईनसह Apple iPhone 14 Pro आणि iPhone Pro Max ची एंट्री, किंमत मात्र जुनीच

जर बोलणी यशस्वी झाली तर टाटा आयफोनची निर्मिती करणारी भारतातील पहिली कंपनी बनेल, जे काम आतापर्यंत प्रामुख्याने चीन आणि भारतात तैवानमधील विस्ट्रॉन आणि फॉक्सकॉन टेक्नॉलॉजी ग्रुप करत होते. Apple चा मेक इन इंडियाचा कल पाहता याचा Apple आणि भारतीय iPhone ग्राहकांना दोघांनाही फायदा होईल.

iPhone 14 सीरिज लाँच

एका मोठ्या इव्हेंटमधून टेक दिग्गज अ‍ॅप्पलनं आपली बहुप्रतीक्षित आयफोन 14 सीरिज अनेक नव्या फीचर्ससह सादर केली आहे. विशेष म्हणजे आयफोन 14 सीरीज भारतात देखील लाँच झाली आहे. तसेच Apple नं चार नवीन आयफोन iPhone 14, iPhone 14 Plus, iPhone 14 Pro आणि iPhone 14 Pro Max भारतात लाँच केले आहेत. यातील बेस मॉडेलची किंमत 79,900 रुपयांपासून सुरु होते तर iPhone 14 Pro Max चा 1TB स्टोरेज असलेला मॉडेल 1,89,900 रुपयांमध्ये भारतात विकला जाईल. आयफोन 14 प्लस वगळता अन्य मॉडेल्सची विक्री 16 सप्टेंबरपासून सुरु होईल.

Published by
Siddhesh Jadhav