सर्वात प्रीमियम फीचर्स आणि नव्याकोऱ्या डिजाईनसह Apple iPhone 14 Pro आणि iPhone Pro Max ची एंट्री, किंमत मात्र जुनीच

Apple iPhone 14 Pro and Pro Max launched: Apple नं अखेरीस लेटेस्ट iPhone 14 सीरीज लाँच केली आहे. कंपनीनं चार नवीन मॉडेल iPhone 14, iPhone 14 Plus, iPhone 14 Pro, आणि iPhone 14 Pro Max लाँच केले आहेत. हे सर्व मॉडेल गेल्यावर्षी लाँच करण्यात आलेल्या iPhone 13 लाइनअपची जागा घेतील. या लेखात आपण सीरिजमधील सर्वात प्रीमियम आणि नव्या डिजाईनसह आलेल्या iPhone 14 Pro आणि iPhone 14 Pro Max ची माहिती घेणार आहोत. कंपनीनं या प्रो मॉडेल्स शानदार कॅमेरा इंप्रूवमेंट्स आणि अनेक मोठे बदल केले आहेत.

Apple iPhone 14 Pro आणि iPhone Pro Max: फीचर्स

डिस्प्ले

सर्वप्रथम आयफोन 14 सीरिजच्या प्रो मॉडेल्समधील जी बाब उठून दिसते ती म्हणजे यातील पंच होल कटआऊट. कंपनीनं नॉच डिजाईनला डच्चू देत नवीन पिल शेप पंच होल दिला आहे ज्याला डायनॅमिक आयलंड असं नाव देण्यात आलं आहे. अ‍ॅप्पलच्या सर्वात प्रीमिमय मॉडेल्सचे डिस्प्ले पाहता Apple iPhone 14 Pro मध्ये 6.1 इंच आणि iPhone Pro Max मध्ये 6.7 इंचाचा डिस्प्ले देण्यात आला आहे. हे डिस्प्ले 1600 निट्स ते 2000 निट्स ब्राइटनेस ऑफरकरतात . अ‍ॅप्पलचा दावा आहे की दुसरा कोणताही स्मार्टफोन इतकी ब्राइटनेस देत नाही. कंपनीनं आपल्या प्रो मॉडेल्समध्ये पहिल्यांदाच ऑलवेज ऑन डिस्प्ले दिला आहे.

नवीन प्रोसेसर

दोन्ही iPhones 14 Pro आणि iPhones 14 Pro Max मध्ये कंपनीनं लेटेस्ट A16 Bionic प्रोसेसर देण्यात आला आहे. या प्रोसेसरमुळे या फोन्सची परफॉर्मन्स, कॅमेरा आणि बॅटरी लाइफ देखील सुधारते, असं दावा कंपनीनं केला आहे. अ‍ॅप्पलचा हा नवीन प्रोसेसर 4-नॅनोमीटर आर्कटेक्चरवर बनवण्यात आला आहे. Apple चा दावा आहे की लेटेस्ट A16 Bionic प्रोसेसर अँड्रॉइड स्मार्टफोनच्या सर्वात फास्ट प्रोसेसरपेक्षा अनेक पटीनं पुढे आहे. हे देखील वाचा: iPhone 14 झाला लाँच, स्टायलिश लुक आणि अ‍ॅडव्हान्स फीचर्ससह आला दमदार आयफोन

48MP चा कॅमेरा

Apple iPhone 14 Pro आणि iPhone Pro Max मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप आहे, यात 48MP चा प्रायमरी कॅमेरा देण्यात आला आहे. अ‍ॅप्पलने प्रो मॉडेलमध्ये क्वॉड पिक्सल सेन्सर टेक्नॉलॉजीचा वापर केला आहे. हे अँड्रॉइड स्मार्टफोनमधील पिक्सल बाइनिंग टेक्नॉलॉजीला देण्यात आलेले नवीन नाव आहे. परंतु ProRAW चा वापर करून युजर्स पिक्सल बाइनिंगविना देखील इमेज कॅप्चर करू शकतात.

प्रायमरी कॅमेऱ्यासह प्रो मॉडेल्स मध्ये 12MP चा टेलीफोटो सेन्सर, आणि 12MP चा अल्ट्रा वाइड सेन्सर देण्यात आला आहे. अल्ट्रा वाइड सेन्सरमधून मॅक्रो फोटोग्राफी देखील करता येईल. तसेच दोन्ही फोनमध्ये नवीन फोटोनिक इंजिन देखील आहे जो लो लाइटमध्ये शानदार इमेज क्लिक करतो. त्याचबरोबर या दोन्ही फोन्समध्ये अ‍ॅक्शन आणि सिनेमॅटिक मोड देखील देण्यात आले आहेत जे 4K रिजोल्यूशनमध्ये व्हिडीओ रेकॉर्डिंग करतात. फ्रंटला 12MP चा सेल्फी सेन्सर नव्या ऑटो फोकस फिचरसह मिळतो.

>किंमत

किंमत पाहता iPhone 14 Pro चा बेस मॉडेल भारतात 128GB स्टोरेजसह 1,29,900 रुपयांमध्ये सादर करण्यात आला आहे. 256GB स्टोरेज मॉडेल 1,39,900 रुपये, 512GB स्टोरेज मॉडेल 1,59,900 रुपये आणि 1TB स्टोरेज मॉडेल 1,79,900 रुपयांमध्ये विकत घेता येईल. तसेच iPhone 14 Pro Max चा 128GB स्टोरेज मॉडेल 1,39,900 रुपये, 256GB स्टोरेज मॉडेल 1,49,900 रुपये, 512GB स्टोरेज मॉडेल 1,69,900 रुपये आणि 1TB व्हेरिएंट 1,89,900 रुपयांमध्ये उपलब्ध होईल.

Apple च्या लेटेस्ट मॉडेलची प्री बुकिंग 9 सप्टेंबरपासून सुरु होईल, तर प्रो मॉडेलची विक्री 16 सप्टेंबरपासून सुरु होईल. iPhone 14 Pro आणि iPhone 14 Pro Max मॉडेल चार कलर ऑप्शन – डीप पर्पल, गोल्ड, सिल्व्हर आणि ब्लॅकमध्ये सादर करण्यात आले आहेत. हे देखील वाचा: अ‍ॅडव्हेंचर प्रेमी भटक्यांसाठी खास Apple Watch Ultra; म्युजिक प्रेमींसाठी शानदार Apple AirPods Pro 2 लाँच

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here