iPhone 14 Series India Price: जुन्याच किंमतीत आला नवीन आयफोन 14, जाणून घ्या आयफोन 14 प्रो मॅक्स पर्यंतच्या सर्व मॉडेल्सची किंमत

Apple iPhone 14 Series Price in India: काल झालेल्या इव्हेंटमधून टेक दिग्गज अ‍ॅप्पलनं आपली बहुप्रतीक्षित आयफोन 14 सीरिज अनेक नव्या फीचर्ससह सादर केली आहे. विशेष म्हणजे आयफोन 14 सीरीज भारतात देखील लाँच झाली आहे. तसेच Apple नं चार नवीन आयफोन iPhone 14, iPhone 14 Plus, iPhone 14 Pro आणि iPhone 14 Pro Max भारतात लाँच केले आहेत.

स्टायलिश लुक, अ‍ॅडव्हान्स फीचर्स आणि पावरफुल स्पेसिफिकेशन्ससह येणारे हे new iPhones याच महिन्यात भारतात सेलसाठी उपलब्ध होतील. विशेष म्हणजे आयफोन 14 च्या बेस मॉडेलची किंमत जुन्या iPhone 13 इतकीच आहे. पुढे आम्ही Apple iPhone 14 series Price आणि iPhone Sale ची संपूर्ण माहिती दिली आहे. हे देखील वाचा: सर्वात प्रीमियम फीचर्स आणि नव्याकोऱ्या डिजाईनसह Apple iPhone 14 Pro आणि iPhone Pro Max ची एंट्री, किंमत मात्र जुनीच

iPhone 14 Price in India

iPhone 14 128GB = 79,900 रुपये
iPhone 14 256GB = 89,900 रुपये
iPhone 14 512GB = 1,09,900 रुपये

iPhone 14 Plus Price in India

iPhone 14 Plus 128GB = 89,900 रुपये
iPhone 14 Plus 256GB = 99,900 रुपये
iPhone 14 Plus 512GB = 1,19,900 रुपये

iPhone 14 Pro Price in India

iPhone 14 Pro 128GB = 1,29,900 रुपये
iPhone 14 Pro 256GB = 1,39,900 रुपये
iPhone 14 Pro 512GB = 1,59,900 रुपये
iPhone 14 Pro 1TB = 1,79,900 रुपये

iPhone 14 Pro Max Price in India

iPhone 14 Pro Max 128GB = 1,39,900 रुपये
iPhone 14 Pro Max 256GB = 1,49,900 रुपये
iPhone 14 Pro Max 512GB = 1,69,900 रुपये
iPhone 14 Pro Max 1TB = 1,89,900 रुपये

iPhone 14 Series Sale in India

नवीन अ‍ॅप्पल आयफोन्सची प्री-बुकिंग येत्या 9 सप्टेंबरला संध्याकाळी 5 वाजून 30 मिनिटांनी सुरु होईल. आयफोन 14, आयफोन 14 प्रो तसेच आयफोन 14 प्रो मॅक्स 16 सप्टेंबरपासून सेलसाठी उपलब्ध होतील. परंतु मोठ्या डिस्प्लेसह येणारा आयफोन 14 प्लस घेऊ इच्छिणाऱ्या ग्राहकांना 7 ऑक्टोबरपर्यंत वाट पाहावी लागेल. हे देखील वाचा: iPhone 14 झाला लाँच, स्टायलिश लुक आणि अ‍ॅडव्हान्स फीचर्ससह आला दमदार आयफोन

iPhone 14 तसेच iPhone 14 Plus मॉडेल Midnight, Purple, Starlight, Blue आणि (PRODUCT) RED कलरमध्ये विकत घेता येतील. तर iPhone 14 Pro आणि iPhone 14 Pro MAX मॉडेल Space Black, Silver, Gold आणि Deep Purple कलरमध्ये भारतात लाँच करण्यात आले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here