Categories: बातम्या

TECNO POVA 6 Pro 5G ची डिजाइन आणि स्पेसिफिकेशन्सची माहिती एफसीसीवर आली समोर, लवकर होणार लाँचिंग

Highlights
  • POVA 6 Pro 5G मोबाइल वर्ल्ड कांग्रेस 2024 इव्हेंट सादर होणार आहे.
  • यात मीडियाटेक डाइमेंसिटी 6080 चिपसेट मिळू शकते.
  • हा ड्युअल रिअर कॅमेरा सेटअपसह ठेवला जाऊ शकतो.


टेक्नो स्वस्त स्मार्टफोन युजर्सना आतापर्यंत खूप चांगला वाटला आहे. यानुसार कंपनी पोवा 6 सीरीज लाँच करणार आहे यात TECNO POVA 6 Pro 5G फोन आणला जाईल. ब्रँड नं घोषणा केली आहे की हा मोबाइल वर्ल्ड कांग्रेस 2024 इव्हेंट दरम्यान सादर होणार आहे. तसेच, याआधी डिवाइसला एफसीसी सर्टिफिकेशन वेबसाइटवर प्रमुख स्पेसिफिकेशन आणि डिजाइनसह स्पॉट करण्यात आला आहे. चला, पुढे लिस्टिंग सविस्तर जाणून घेऊया.

TECNO POVA 6 Pro 5G डिजाइन एफसीसी लिस्टिंग

  • POVA 6 Pro 5G फोन TECNO-LI9 मॉडेल नंबरसह FCC लिस्टिंगमध्ये दिसला आहे.
  • तुम्ही खाली फोटो स्लाइडमध्ये डिवाइसच्या बॅक पॅनलवर मोठा कॅमेरा मॉड्यूल पाहू शकता. यात नवीन स्मार्टफोन ड्युअल रिअर कॅमेरा आणि एलईडी फ्लॅश दिसत आहे.
  • डिवाइसच्या उजव्या बाजूला पावर बटन आणि वॉल्यूम बटन आहेत.
  • या प्लॅटफॉर्मवर जो फोटो समोर आला आहे त्यामध्ये ऐवढीच माहिती मिळाली आहे.

TECNO POVA 6 Pro 5G स्पेसिफिकेशन्स एफसीसी लिस्टिंग

  • एफसीसी लिस्टिंगमध्ये माहिती मिळाली आहे की TECNO POVA 6 Pro 5G फोन 12जीबी रॅम आणि 256 जीबी इंटरनल स्टोरेजच्या पावरसोबत बाजारात येऊ शकतो.
  • फोनला चालवण्यासाठी पावरफुल बॅटरीची माहिती समोर आली नाही, परतुं फोनला चार्ज करण्यासाठी 70 वॉट फास्ट चार्जिंगचा सपोर्ट मिळणार असल्याचे एफसीसी प्लॅटफॉर्मवर पाहायला मिळू शकते.

TECNO POVA 6 Pro 5G स्पेसिफिकेशन्स (संभाव्य)

  • डिस्प्ले: TECNO POVA 6 Pro 5G फोनला याआधी गुगलवर कंसल लिस्टिंगमध्ये स्पॉट केला गेले होते यानुसार डिवाइस कर्व डिस्प्ले असलेला असू शकतो ह्यावर 2436 x1080 पिक्सल रिजॉल्यूशन आणि 480PPI पिक्सल डेंसिटीला सपोर्ट मिळू शकतो.
  • प्रोसेसर: फोनचा प्रोसेसर पाहता यात कंपनी मीडियाटेक डाइमेंसिटी 6080 चिपसेटच्या पावरचा वापर करू शकते. त्याचबरोबर ग्राफिक्ससाठी माली जी57 जीपीयू लावला जाऊ शकतो.
  • कॅमेरा: फोन लिस्टिंगमध्ये ड्युअल रिअर कॅमेऱ्यासह दिसला आहे. ज्यात पहिला पोवा 5 सीरीज प्रमाणे 50 मेगापिक्सल प्रायमरी कॅमेरा लावला जाऊ शकतो.
Published by
Kamal Kant