TECNO ने गेल्या महिन्यात आंतरराष्ट्रीय बाजारात आपल्या ‘स्पार्क सीरीज’ अंतगर्त Tecno Spark 7 Pro स्मार्टफोन सादर केला होता जो MediaTek Helio G80 चिपसेट, 90Hz डिस्प्ले आणि 5,000mAh बॅटरीसारख्या शानदार फीचर्ससह आला आहे. ग्लोबल मार्केटमध्ये प्रवेश केल्यानंतर आता हा मोबाईल फोन भारतीय बाजारात पण येणार आहे. टेक्नो इंडियाने घोषणा केली आहे कि कंपनी Tecno Spark 7 Pro भारतात लॉन्च करणार आहे आणि हा स्मार्टफोन येत्या 25 मेला भारतीय बाजारात लाँच केला जाईल. (Tecno Spark 7 Pro India Launch date 25 may Price Sale offer)
Tecno Spark 7 Pro च्या भारतीय लॉन्चची माहिती कंपनीने आपल्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पण शेयर केली आहे. हा मोबाईल फोन 25 मेला भारतात लॉन्च होईल. फोनच्या लॉन्च डेट सोबतच टेक्नो इंडियाने सांगितले आहे कि टेक्नो स्पार्क 7 प्रो देशात शॉपिंग साइट अमेझॉन इंडियावर पण विक्रीसाठी उपलब्ध होईल. परंतु फोनची किंमत किती असेल आणि हा कोणत्या तारखेपासून विक्रीसाठी उपलब्ध होईल, या माहितीसाठी 25 मेची वाट बघावी लागेल. लॉन्चपूर्वी अमेझॉन इंडियावर फोनचा प्रोडक्ट पेज पण लाईव होईल.
Set your clocks and make way for the powerful addition to our trendsetting Spark Series. The SWAG upgrade is launching on 25th May only on Amazon ??
Let's Stop at Nothing. Get Set PRO!
Stay tuned!?#TECNO #TECNOMOBILEINDIA #SPARK7Pro #SWAGUP pic.twitter.com/vBDSEqvHgQ
— TecnoMobileInd (@TecnoMobileInd) May 21, 2021
Tecno Spark 7 Pro चे स्पेसिफिकेशन्स
ग्लोबल मार्केटमध्ये आधीपासून उपलब्ध असल्यामुळे टेक्नो स्पार्क 7 प्रो स्मार्टफोनचा लुक व स्पेसिफिकेशन्स आधीच सार्वजनिक झाले आहेत. हा फोन पंच होल डिस्प्ले डिजाईनवर बनला आहे जो 6.6 इंचाच्या फुलएचडी+ एलसीडी डिस्प्लेला सपोर्ट करतो. या फोनची स्क्रीन 90हर्ट्ज रिफ्रेश रेटवर काम करते. हा डिस्प्ले बेजल लेस आहे तसेच सेल्फी कॅमेरा असलेला होल स्क्रीनच्या डावीकडे देण्यात आला आहे.
हे देखील वाचा : OPPO Reno6 सीरीजच्या लॉन्च डेट कंपनीने आणली जगासमोर, जाणून घ्या कधी लॉन्च होतील ओप्पोचे धमाकेदार स्मार्टफोन
Tecno Spark 7 Pro अँड्रॉइड 11 वर सादर केला गेला आहे जो हाईओएस 7.5 सह चालतो. तसेच प्रोसेसिंगसाठी या फोनमध्ये आक्टाकोर प्रोसेसरसह मीडियाटेकचा हीलियो जी80 चिपसेट देण्यात आला आहे. आशा आहे भारतात पण हा फोन या चिपसेटवर लॉन्च होईल. तसेच ग्लोबल मार्केटमध्ये टेक्नो स्पार्क 7 प्रो 4 जीबी रॅम + 64 जीबी स्टोरेज तसेच 6 जीबी रॅम + 128 जीबी स्टोरेज वेरिएंटमध्ये सादर केला गेला होता.
फोटोग्राफीसाठी टेक्नो स्पार्क 7 प्रो मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा देण्यात आला आहे. या सेटअपमध्ये एलईडी फ्लॅशसह 48 मेगापिक्सलचा प्राइमरी कॅमेरा आहे त्याचबरोबर एक डेप्थ सेंसर आणि एक AI लेंस देण्यात आली आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी हा फोन 8 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. आशा आहे कि फोनचा इंडियन मॉडेल पण याच कॅमेरा सेग्मेंटला सपोर्ट करेल.
हे देखील वाचा : OnePlus लवकरच Dimensity 1200 चिपसेटसह लॉन्च करू शकते स्मार्टफोन, संपेल OnePlus Nord 2 ची प्रतीक्षा
Tecno Spark 7 Pro डुअल सिम फोन आहे जो 4जी एलटीईला सपोर्ट करतो. 3.5एमएम जॅक आणि बेसिक कनेक्टिविटी फीचर्ससह सिक्योरिटीसाठी फोनच्या बॅक पॅनलवर रियर फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे तर पावर बॅकअपसाठी हा फोन 10वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी असलेल्या 5,000एमएएचच्या बॅटरीला सपोर्ट करतो. फोनच्या इंडियन मॉडेलच्या ठोस स्पेसिफिकेशन्स आणि किंमतीसाठी 25 मेची वाट बघावी लागेल.
