OPPO Reno6 सीरीजच्या लॉन्च डेट कंपनीने आणली जगासमोर, जाणून घ्या कधी लॉन्च होतील ओप्पोचे धमाकेदार स्मार्टफोन

गेल्या अनेक दिवसांपासून ओप्पोच्या अपकमिंग स्मार्टफोन OPPO Reno6, Reno6 Pro, आणि Reno6 Pro+ स्मार्टफोनबाबत सविस्तर माहिती समोर येत आहे. ओप्पोचा हा स्मार्टफोन लवकरच ग्लोबल मार्केटमध्ये सादर केले जातील. ओप्पोने नवीन टीजर प्रकाशित करून OPPO Reno6 सीरीजची लॉन्च डेट समोर ठेवली आहे. ओप्पोची फ्लॅगशिप स्मार्टफोन सीरीज 27 मेला लॉन्च केली जाईल. OPPO ने हि माहिती ऑफिशियल Weibo अकाउंटच्या माध्यमातून शेयर केली आहे. त्याचबरोबर या सीरीजचे तीन स्मार्टफोन OPPO Reno6, Reno6 Pro, आणि Reno6 Pro+ चीनच्या ई-कॉमर्स वेबसाइट JD.com वर पण लिस्ट केले गेले आहेत. ई-कॉमर्स कंपनीच्या लिस्टिंगमध्ये ओप्पोच्या या स्मार्टफोनची डिजाइन आणि काही मुख्य स्पेसिफिकेशन्स समोर आले आहेत. (Oppo Reno6 Reno6 Pro Reno6 Pro will launch on 27 May)

Reno 6 series launch May 27th

OPPO Reno6, Reno6 Pro, Reno6 Pro+ स्पेसिफिकेशन्स आणि डिजाइन

ओप्पोच्या या स्मार्टफोन सीरीजच्या स्टॅंडर्ड वेरिएंट OPPO Reno6 बाबत बोलले जात आहे कि हा MediaTek च्या नवीन Dimensity 900 चिपसेटसह येणारा पहिला स्मार्टफोन असेल. Oppo Reno 6 स्मार्टफोनच्या डिजाइनबद्दल मजेशीर माहिती समोर येत आहे. टिपस्टर मुकुल शर्माने JD.com वर लिस्ट OPPO Reno6 ची इमेज शेयर केली आहे ज्यात iPhone 12 सारखी फ्लॅट मेटल फ्रेम डिजाइन देण्यात आली आहे. त्याचबरोबर या फोनमध्ये सेल्फी कॅमेऱ्यासाठी पंच होल कटआउट, 65W फास्ट चार्जिंग सपोर्ट, 90Hz AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे. ओप्पोचा हा स्मार्टफोन 8GB+128GB आणि 12GB+256GB वेरिएंट्ससह लॉन्च केला जाईल.

हे देखील वाचा : Battlegrounds Mobile India ची लॉन्च डेट आली समोर, बघा कधी करता येईल तुमच्या फोनमध्ये Download

OPPO Reno6 Pro स्मार्टफोन पाहता हा फोन कर्व्ड डिस्प्ले, स्लिम फ्रेमसह सादर केला जाईल. या स्मार्टफोनची डिजाइन पाहता हा फोन Oppo Reno5 Pro सारखाच असेल. ओप्पोचा हा स्मार्टफोन MediaTek Dimensity 1200 चिपसेटसह सादर केला जाईल. त्याचबरोबर ओप्पोचा हा स्मार्टफोन 8GB+128GB आणि 12GB+256GB वेरिएंटसह सादर केला जाईल. ओप्पोच्या या फोनमध्ये 64MP क्वाड कॅमेरा सेटअप, 90Hz AMOLED डिस्प्ले आणि 65W फास्ट चार्जिंगला सपोर्ट दिला जाऊ शकतो.

हे देखील वाचा : Realme X7 Max स्मार्टफोनची डिजाइन कंपनीने केली टीज, लॉन्चच्या आधी जाणून घ्या याची वैशिष्ट्ये

तसेच OPPO Reno6 Pro+ स्मार्टफोनची डिजाइन Reno6 Pro सारखी असेल. हा स्मार्टफोन हाई-एन्ड स्पेसिफिकेशन्ससह सादर केला जाईल. ओप्पोचा हा स्मार्टफोन 50MP क्वाड रियर कॅमेरा सेटअपला सपोर्ट करेल. त्याचबरोबर हा स्मार्टफोन 65W फास्ट चार्जिंग सपोर्ट, 90Hz AMOLED डिस्प्ले दिला जाऊ शकतो. ओप्पोच्या या स्मार्टफोनबाबत बोलले जात आहे कि हा फोन Snapdragon 870 चिपसेटसह 12GB RAM आणि 256GB इंटरनल स्टोरेज दिला जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here