Home बातम्या 6,000एमएएच बॅटरी आणि 7 इंचाचा मोठा डिस्प्ले असलेला हा फोन, फक्त 8499 रुपयांमध्ये झाला लॉन्च

6,000एमएएच बॅटरी आणि 7 इंचाचा मोठा डिस्प्ले असलेला हा फोन, फक्त 8499 रुपयांमध्ये झाला लॉन्च

Tecno मोबाईलने आज भारतीय बाजारात आपला प्रोडक्ट पोर्टफोलियो वाढवत अजून एक नवीन स्मार्टफोन सादर केला आहे. हा फोन Tecno Spark Power 2 Air नावाने लॉन्च झाला आहे ज्याने लो बजेट मध्ये एंट्री घेतली आहे. स्पार्क पावर 2 एयर कंपनीने फक्त 8,499 रुपयांमध्ये लॉन्च केला आहे जो 6,000एमएएच च्या पावरफुल बॅटरी आणि 7 इंचाच्या मोठ्या डिस्प्ले सह येतो. टेक्नोचा हा नवीन फोन शॉपिंग साइट फ्लिपकार्ट वरून विकत घेता येईल.

Tecno Spark Power 2 Air

टेक्नोच्या या नवीन स्मार्टफोनच्या फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स बद्दल बोलायचे तर स्पार्क पावर 2 एयर 20.5:9 आस्पेक्ट रेशियो वर सादर केला गेला आहे जो 1640 x 720 पिक्सल रेज्ल्यूशन असलेल्या 7 इंचाच्या मोठ्या एचडी+ आईपीएस एलसीडी डिस्प्लेला सपोर्ट करतो. या फोन स्क्रीन-टू-बॉडी रेशियो 90.6 टक्के आहे तसेच डिस्प्ले 480निट्स ब्राइटनेसला सपोर्ट करतो.

हे देखील वाचा: Tecno ने लॉन्च केले दोन स्वस्त फोन Camon 15 आणि 15 Pro, यात आहे 5000mAh बॅटरी, 48MP क्वॉड आणि 32MP सेल्फी कॅमेरा

Tecno Spark Power 2 Air कंपनीने एंडरॉयड 10 वर सादर केला आहे जो हाईओएस 6.1 सह चालतो. तसेच प्रोसेसिंगसाठी या फोन मध्ये 2गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड असलेल्या क्वॉडकोर प्रोसेसर सह मीडियाटेकचा हीलियो ए22 चिपसेट देण्यात आला आहे. भारतीय बाजारात स्पार्क पावर 2 एयर 3 जीबी रॅम वर लॉन्च केला गेला आहे जो 32 जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो. फोन मेमरी माइक्रोएसडी कार्डने 256 जीबी पर्यंत वाढवता येते.

फोटोग्राफी सेग्मेंट पाहता Tecno Spark Power 2 Air क्वॉड रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो जो बॅक पॅनल वर उजवीकडे वर्टिकल शेप मध्ये आहे. या सेटअप मध्ये क्वॉड एलईडी लाईट सह एफ/1.8 अपर्चर असलेला 13 मेगापिक्सलचा प्राइमरी सेंसर देण्यात आला आहे आणि तसेच दोन 2 मेगापिक्सलचे सेंसर आणि एक एआई लेंस पण आहे. तसेच सेल्फी आणि वीडियो कॉलिंगसाठी हा फोन 8 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो.

हे देखील वाचा: Tecno ने लॉन्च केला स्वस्त Spark Go Plus, कमी किंमतीत देईल Realme टक्कर

Tecno Spark Power 2 Air डुअल सिम फोन आहे जो 4जी वोएलटीई सपोर्ट करतो. 3.5एमएम जॅक आणि इतर बेसिक कनेक्टिविटी फीचर्स सोबतच सिक्योरिटीसाठी फोनच्या बॅक पॅनल वर रियर फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे त्याचबरोबर हा फोन फेस अनलॉक फीचरला पण सपोर्ट करतो. तसेच पावर बॅकअपसाठी टेक्नो स्पार्क पावर 2 एयर स्मार्टफोन मध्ये 6,000एमएएच ची मोठी बॅटरी देण्यात आली आहे. पुन्हा सांगू इच्छितो कि हा फोन फक्त 8,499 रुपयांमध्ये विकत घेता येईल.