कमी किंमतीत शानदार स्पेसिफिकेशन्स असलेले स्मार्टफोन घेऊन येणारी टेक कंपनी Tecno ने आज भारतीय बाजारात आपली ‘केमॉन सीरीज’ वाढवत एक साथ दोन नवीन स्मार्टफोन लॉन्च केले आहेत. कंपनीने हे फोन Tecno Camon 15 आणि Tecno Camon 15 Pro नावाने बाजारात आणले आहेत. Tecno Camon 15 पंच-होल डिस्प्ले सह बनला आहे तर Tecno Camon 15 Pro पॉप-अप सेल्फी कॅमेऱ्यासह सादर केला गेला आहे. हे दोन्ही डिवाईस ऑनलाईन शॉपिंग साइट्स सोबतच ऑफलाईन रिटेल स्टोर्स वर पण विक्रीसाठी उपलब्ध होतील.
नवीन टेक्नो फोन्सच्या किंमतीबद्दल बोलायचे तर कंपनीने हे दोन्ही डिवाईस एकाच वेरिएंट मध्ये लॉन्च केले गेले आहेत जे लो बजेट सेग्मेंट मध्ये विक्रीसाठी उपलब्ध होतील. Tecno Camon 15 मध्ये 4 जीबी रॅम सह 64 जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे. तसेच Tecno Camon 15 Pro कंंपनीने 6 जीबी रॅम आणि 128 जीबी इंटरनल स्टोरेज वर लॉन्च केला आहे. Tecno Camon 15 ने 9,999 रुपयांमध्ये बाजारात एंट्री घेतली आहे तर Tecno Camon 15 Pro इंडियन मार्केट मध्ये 14,999 रुपयांमध्ये लॉन्च केला गेला आहे.
डिजाईन व डिस्प्ले
Tecno Camon 15 कंपनीने पंच-होल डिस्प्ले वर लॉन्च केला गेला आहे तर Tecno Camon 15 Pro पॉप-अप सेल्फी कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. हे दोन्ही स्मार्टफोन बेजल लेस डिस्प्ले सह येतात. टेक्नो केमॉन 15 मध्ये 6.55 इंचाचा मोठा डिस्प्ले देण्यात आला आहे ज्याला कंपनीने डॉट-इन डिस्प्लेचे नाव दिले आहे. या डिस्प्ले वर डावीकडे पंच-होल आहे ज्यात सेल्फी कॅमेरा आहे. तसेच टेक्नो केमॉन 15 प्रो बद्दल बोलायचे तर हा फोन 2340 x 1080 पिक्सल रेज्लयूशन असलेल्या फुलएचडी+ रियल फुलव्यू डिस्प्लेला सपोर्ट करतो. Tecno Camon 15 चा स्क्रीन-टू-बॉडी रेशियो 90 टक्के आहे तर Tecno Camon 15 Pro को 91.2 टक्के स्क्रीन-टू-बॉडी रेशियो वर सादर केला गेला आहे.
क्वॉड रियर कॅमेरा
टेक्नोचे हे दोन्ही स्मार्टफोन क्वॉड रियर कॅमेऱ्यासह लॉन्च झाले आहेत. Tecno Camon 15 आणि 15 Pro च्या बॅक पॅनल वर 48 मेगापिक्सलचा प्राइमरी कॅमेरा सेंसर देण्यात आला आहे. सोबतच हा फोन 2 मेगापिक्सलच्या सेकेंडरी सेंसर, 5 मेगापिक्सलच्या अल्ट्रा वाइड अँगल लेंस आणि एक क्यूवीजीए कॅमेरा सेंसरला सपोर्ट करतो. टेक्नो ने आपले नवीन केमॉन फोन्स Ultra Night Lens ससह बाजारात आणले आहेत जे कमी प्रकाशात आणि अंधारात पण शानदार फोटोग्राफ कॅप्चर करू शकतात.
सेल्फी कॅमेरा
फोनच्या सेल्फी कॅमेऱ्या बद्दल बोलायचे तर Tecno Camon 15 मध्ये 16 मेगापिक्सलचा डॉट-इन सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे. तसेच Tecno Camon 15 Pro को 32 मेगापिक्सलच्या एआई पॉप-अप सेल्फी कॅमेऱ्यासह बाजारात आला आहे. हे दोन्ही स्मार्टफोन शानदार ब्यूटी मोड आणि फिल्टर्स सह येतात.
इतर स्पेसिफिकेशन्स
Tecno Camon 15 आणि 15 Pro कंपनीने एंडरॉयडच्या लेटेस्ट ओएस एंडरॉयड 10 वर सादर केले आहेत जे हाईओएस 6 वर्जन वर चालतात. तसेच प्रोसेसिंगसाठी फोन मध्ये 2.35गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड असलेल्या आक्टाकोर प्रोसेसर सह मीडियाटेक हीलियो पी35 चिपसेट देण्यात आला आहे. सिक्योरिटीसाठी फोनच्या बॅक पॅनल वर रियर फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे तसेच पावर बॅकअपसाठी Tecno Camon 15 Pro मध्ये 4,000एमएएच ची बॅटरी तसेच Tecno Camon 15 मध्ये 5,000एमएएमच ची पावरफुल बॅटरी देण्यात आली आहे.
















