Home बातम्या Tecno देखील घेऊन येत आहे एलईडी लाइट्स असलेला मोबाइल फोन, कॉल आणि मेसेज आल्यावर चमकणार बॅक पॅनल

Tecno देखील घेऊन येत आहे एलईडी लाइट्स असलेला मोबाइल फोन, कॉल आणि मेसेज आल्यावर चमकणार बॅक पॅनल

Highlights
  • एलईडी लाइट नोटिफिकेशन्स टेक्नॉलॉजीलचे नाव Arc Interface आहे.
  • लाईट फोन कॉल, मेसेज तसेच अन्य नोटिफिकेशन्स आल्यावर चमकेल.
  • हा फोन टेक्नो पोवा सीरीज अंतगर्त लवकरच भारतात लाँच होईल.

टेक ब्रँड टेक्नो सतत असे प्रोडक्ट घेऊन येतो की मोठ्या मोबाइल कंपन्यांची झोप उडते. काही दिवसांपूर्वीच Phantom V Fold आणून कंपनीनं थेट Samsung आणि Motorola ला आव्हान दिलं होतं. आता कंपनी आणखी एक मोबाइल फोन घेऊन येत आहे ज्याच्या बॅक पॅनलवर एलईडी नोटिफिकेशन लाइट असेल. हा POVA series smartphone असेल जो Nothing Phone ला टक्कर देईल.

एलईडी लाइट असलेला टेक्नो फोन

एलईडी लाइट असलेल्या नवीन टेक्नो फोनची माहिती टिपस्टर ईशान अग्रवालच्या माध्यमातून समोर आली आहे. ईशाननं आपल्या ट्वीटर हँडलच्या माध्यमातून आगामी टेक्नो फोनचा शार्ट व्हिडीओ शेयर केला आहे ज्यात फोनच्या बॅक पॅनलवर आणि त्यावर लावलेल्या लाईट्स देखील स्पष्ट दिसत आहेत. टिपस्टरनं स्पष्ट केलं आहे की हा फोन टेक्नो पोवा सीरीज अंतगर्त येईल आणि लवकरच भारतात लाँच होईल.

Tecno POVA स्मार्टफोनमध्ये वापरली जाणाऱ्या एलईडी लाइट नोटिफिकेशन्स टेक्नॉलॉजीलचे नाव ईशाननं Arc Interface असं सांगितलं आहे. वरील जीफमध्ये तुम्ही पाहू शकता की फोनच्या बॅक पॅनलवर एका बाजूला काच आहे तर दुसरीकडे लेदर, आणि ह्या दोन्हीच्या मध्ये एलईडी स्ट्रीप लावण्यात आली आहे जी ब्लिंक करते. ही लाईट फोन कॉल, मेसेज तसेच अन्य नोटिफिकेशन्स आल्यावर चमकेल.

Tecno Pova 5

अलीकडेच टेक्नो पोवा 5 स्मार्टफोन इंटरनॅशनल मार्केटमध्ये सादर करण्यात आला आहे. ज्याचा फ्री फायर स्पेशल एडिशन देखील आला आहे जो गरेना बॅटल रॉयल गेम निर्माता कंपनीसह मिळून बनवण्यात आला आहे. हा फोन Turbo Mecha डिजाइनसह बनवण्यात आला आहे ज्याचे फीचर्स व स्पेसिफिकेशन्स पुढे देण्यात आले आहेत.