यावर्षीच्या सुरवातीपासून दक्षिण कोरियन मोबाईल फोन निर्माता सॅमसंग खूप आक्रमक झाली आहे आणि कंपनी आतापर्यंत ऑनलाइन आणि ऑफलाइन अनेक नवीन फोन मॉडेल सादर केले आहेत. ये फोन फक्त स्पेसिफिकेशनच्या बाबतीत मजबूत नसून किंमतीच्या बाबतीत पण शानदार आहेत. यातून कंपनीचा प्रयत्न स्मार्टफोन बाजारातील आपला युजरबेस मिळवण्याचा आहे, परंतु ते सोप्पे नाही. अशी शाओमी आव्हान देत होती पण आता चीनी स्मार्टफोन फोन निर्माता कंपनी वीवो ने पण सॅमसंगला ध्यानात ठेऊन खास रणनीती बनवत आहे आणि कंपनी नवीन फोन लॉन्च करणार आहे.
91मोबाईल्सला याबद्दल खास माहिती मिळाली आहे. कंपनीच्या एका अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर आम्हाला महत्वाची माहिती दिली आहे. त्यांनी सांगितले कि “वीवो 2019 मध्ये आपला संपूर्ण स्मार्टफोन पोर्टफोलियो बदलणार आहे आणि अनेक नवीन सीरीजचे फोन लॉन्च केले जातील. तसेच वाय सीरीज पण बदलेल. आधी तुम्हाला वाय91, वाय83 आणि वाय71 सारखे डबल डिजिट वाले फोन मिळत होते पण आता कंपनी ‘वाय3’ आणि ‘वाय5’ सारखेच मॉडेल सादर करणार आहे.” इतकेच नव्हे तर त्यांनी आम्हाला सांगितले कि “हे फोन्स खास करून कंपनी सॅमसंग गॅलेक्सी ‘ए’ सीरीज आणि ‘एम’ सीरीजला टक्कर देण्यासाठी आणत आहे आणि प्राइस पण त्यानुसार असेल.”
प्राप्त माहितीनुसार सॅमसंग गॅलेक्सी वाय3 कंपनी 10,000 रुपयांपासून 15,000 रुपयांमध्ये लॉन्च करणार आहे त्यात वाय5 थोडा महाग असेल. वीवो वाय5 ची किंमत 15,000 ते 20,000 रूपांच्या दरम्यान असेल. पुढच्यावर्षी या सीरीज मध्ये 4-5 फोन लॉन्च होऊ शकतात. त्यांनी असे पण सांगितले आहे कि “भारतातील सर्वात मोठा खेळ आईपीएल आहे आणि याकाळात कंपनी खूप आक्रमक होईल. कदाचित याचकाळात वीवो वाय3 आणि वाय5 समोर येतील.”
स्पेसिफिकेशन बद्दल अजूनतरी जास्त माहिती मिळाली नाही पण आम्हाला मिळालेल्या बातम्यांनुसार वीवोच्या या फोन्सची यूएसपी याचा ट्रिपल कॅमेरा असेल. कंपनी कमी किंमतीत ट्रिपल कॅमेरा असलेल्या फोनची सुरवात करणार आहे. अलीकडेच कंपनी ने वीवो वी15 प्रो द्वारे याची सुरवात केली आहे आणि काही दिवसांतच ट्रिपल कॅमेरा सह वी15 येणार आहे. हे फोन थोडे महाग असतील पण वाय सीरीज पासून कमी किंमतीत ट्रिपल कॅमेरा आणि हॅलो नॉचची सुरवात होईल.
वर सांगितल्याप्रमाणे वीवो 2019 मध्ये आपला संपूर्ण पोर्टफोलियो बदलणार आहे. त्यात कंपनी हळू हळू आपला सर्व जुना स्टॉक संपवेल. त्यामुळे अलीकडेच अनेक मॉडेलच्य किंमती कंपनीने कमी केल्या आहेत. तसेच दुसऱ्या अनेक मॉडेलच्या किंमती पण कमी होतील. आम्हाला जी माहिती मिळाली आहे त्यानुसार येत्या काही दिवसांत वीवोच्या उपलब्ध सर्व फोन्सच्या किंमती कमी होतील.
