50MP Selfie कॅमेऱ्यासह भारतात लाँच झाला नवीन नॉन चिनी स्मार्टफोन HMD Crest Max, जाणून घ्या माहिती

Nokia चा मोबाईल फोन बनविणारी कंपनी एचएमडी ग्लोबलने आज भारतात आपली स्वत:ची ब्रँडिंग असलेला पहिला स्मार्टफोन लाँच केला आहे. कंपनीने दोन स्मार्टफोन मॉडेल HMD Crest आणि HMD Crest Max भारतीय बाजारात आणले आहेत. एचएमडी क्रेस्ट मॅक्सची किंमत, फिचर्स आणि स्पेसिफिकेशनची माहिती पुढे देण्यात आली आहे.

नॉन-चिनी मोबाईल कंपनी

सर्वप्रथम तर तुम्हाला सांगतो की HMD Global फिनलँडची कंपनी आहे जी आता भारतात आपल्या स्वत:चे स्मार्टफोन विकत आहे. HMD Crest आणि Crest Max च्या आल्याने भारतीयांसाठी एक आणि नॉन-चिनी पर्याय मिळाला आहे तसेच लोक OPPO, Vivo, Redmi, Realme आणि Tecno सारखे चिनी ब्रँड्स पुढे यावर पण विचार करू शकता.

HMD Crest Max चा फोटो

HMD Crest Max ची किंमत

हा एचएमडी 5 जी स्मार्टफोन भारतात 8GB RAM वर लाँच झाला आहे जो 256GB Storage ला सपोर्ट करतो. HMD Crest Max ची किंमत 16,499 रुपये आहे ज्याला डीप पर्पल (Deep Purple), रॉयल पिंक (Royal Pink) आणि अ‍ॅक्वा ग्रीन (Aqua Green) कलरमध्ये विकत घेता येईल. फोनची सेल Amazon Great Freedom sale मध्ये सुरु होईल जिथे हा 1500 रुपयांच्या डिस्काऊंटसह 14,999 रुपयांमध्ये विकण्यासाठी उपलब्ध होईल.

HMD Crest Max चे स्पेसिफिकेशन

  • 6.6-इंचाचा फुलएचडी+ ओएलईडी डिस्प्ले
  • यूनिसोक टी 760 प्रोसेसर
  • 8 जीबी रॅम + 256 जीबी स्टोरेज
  • 64 मेगापिक्सल बॅक कॅमेरा
  • 50 मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा
  • 33 वॉट 5,000 एमएएच बॅटरी

डिस्प्ले : HMD Crest Max 5G फोन 6.6-इंचाच्या फुलएचडी+ स्क्रीनवर लाँच झाला आहे. ही पंच-होल स्टाईल असणारा डिस्प्ले ओएलईडी पॅनलवर बनलेला आहे.

प्रोसेसर : भारतातील पहिला एचएमडी स्मार्टफोन Unisoc T760 ऑक्टा-कोर प्रोसेसरवर लाँच करण्यात आला आहे. ही 6 नॅनोमीटर फॅब्रिकेशनवर बनलेला मोबाईल चिपसेट आहे जी 2.2 गीगाहर्ट्झ क्लॉक स्पीडवर चालते.

मेमरी : HMD Crest Max 5G फोन भारतात 8 जीबी रॅमवर लाँच झाला आहे. हा मोबाईल 8 जीबी वचुर्अल रॅमला सपोर्ट करतो जो फिजिकल रॅमसह मिळून याला 16GB RAM ची ताकद प्रदान करतो. तसेच स्मार्टफोनमध्ये 256 जीबी स्टोरेज मिळते.

बॅक कॅमेरा : एचएमडी क्रेस्ट मॅक्स फोटोग्राफीसाठी ट्रिपल रिअर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो ज्यात 64 मेगापिक्सलचा मेन सेन्सर आहे. त्याचबरोबर रिअर कॅमेरा सेटअपमध्ये 5 मेगापिक्सल अल्ट्रा वाईड अँगल लेन्स तसेच 2 मेगापिक्सल मॅक्रो सेन्सर मिळतो.

फ्रंट कॅमेरा : सेल्फी काढणे, रिल्स बनविणे तसेच व्हिडिओ कॉलिंगसाठी HMD Crest Max 5G फोनमध्ये 50 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा सेन्सर देण्यात आला आहे.

बॅटरी : पावर बॅकअपसाठी एचएमडी क्रेस्ट मॅक्स 5 जी स्मार्टफोन 5,000 एमएएच बॅटरीला सपोर्ट करतो. तसेच ही मोठी बॅटरी फास्ट चार्ज करण्यासाठी मोबाईलला 33 वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीने सुसज्ज​ करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY
Please enter your comment!
Please enter your name here