Home बातम्या चीनी स्मार्टफोन ब्रँड Vivo अडचणीत? देशात 44 ठिकाणी ईडीची धाड

चीनी स्मार्टफोन ब्रँड Vivo अडचणीत? देशात 44 ठिकाणी ईडीची धाड

चीनी स्मार्टफोन ब्रँड Vivo भारतात Enforcement Directorate म्हणजे अंमलबजावणी संचालनालयाच्या निशाण्यावर आलं आहे. ईडी विभागानं विवो कंपनीच्या 44 ठिकाणांवर धाड टाकली आहे. हे एक money laundering investigation आहे ज्यात Vivo वर आरोप करण्यात आले आहेत की, कंपनीनं भारतात सरकारपासून लपवून मोठ्याप्रमाणावर बेकायदेशीररीत्या पैसे चीनमध्ये पाठवले आहेत. या मनी लॉन्ड्रिंग केसचा तपास करण्यासाठी ED नं विवो कंपनीच्या जवळपास 44 ऑफिसेस तसेच फॅक्टरीजवर धाडी टाकल्या आहेत.

ईडी म्हणजे अंमलबजावणी संचालनालयनं चीनी मोबाईल फोन निर्माता विवोवर मोठी कारवाई करत कंपनीच्या जवळपास 44 ठिकाणांवर धाडी टाकल्या आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, या ED Raid उत्तर प्रदेश, बिहार आणि मध्य प्रदेश सोबतच दक्षिण भारतातील अनेक ठिकाणी पडल्या आहेत. Enforcement Directorate नं Vivo आणि संबंधित कंपन्यांच्या विरोधात मनी लॉन्ड्रिंगची केस नोंदवली आहे. विशेष म्हणजे CBI आधीपासूनच या प्रकरणाचा तपास घेत आहे आणि ED नं इतक्या ठिकाणी छापा टाकल्यामुळे चीन कंपनी विरोधात खूप मोठी कारवाई होत असल्याची चर्चा आहे. हे देखील वाचा: इलेक्ट्रिक वाहनांच्या खरेदीवर होणार लाखोंची बचत; बॅटरी असणाऱ्या व्हेइकल्ससाठी महत्वाचा निर्णय

Vivo वर ED ची धाड

समोर आलेल्या माहितीनुसार, ईडीच्या वीवो कंपनीवरील धाडी अजूनही सुरु आहेत आणि अंमलबजावणी संचालनालय कंपनीच्या डाक्यूमेंट्स इत्यादींचा तपास करत आहे. ईडीची ही कारवाई मनी लॉन्ड्रिंगच्या बाबतीत करण्यात आली आहे. Chinese phone maker Vivo गेले कित्येक दिवस अंमलबजावणी संचालनालय आणि इनकम टॅक्स विभागाच्या निशाण्यावर आहे. तसेच याआधी देखील विवो कंपनीच्या गुरुग्राम मधील बँक अकाऊंटमधून जवळपास 220 कोटी रुपयांची वसूली GST डिपार्टमेंटनं केली आहे. हे देखील वाचा: 151 रुपयांत रोज 2GB डेटा आणि अनलिमिटेड कॉलिंग; ‘ही’ कंपनीनं देतेय 30 दिवसांचा भन्नाट प्लॅन

ताज्या रेड बाबत बोलायचे झाले तर समोर आलेल्या रिपोर्ट्सनुसार, ही धड एका गुप्त इनपुटच्या आधारावर करण्यात आली आहे. enforcement agencies ला संशय आहे की चीनशी संबंध असलेल्या विवो कंपनीनं भारतात आपला महसूल कमी दाखवला आहे तसेच इनकम आणि प्रोफिट्सच्या आकड्यांमध्ये गडबड केली आहे. तुम्हाला माहित असेलच की, विवोच्या आधी Xiaomi वर देखील टॅक्स चोरीच्या आरोपामुळे कारवाई करण्यात आली आहे ज्यात भारतातील शाओमीचे अनेक असेट्स सीज करण्यात आले होते.

Vivo financial irregularities वर Enforcement Directorate ची ही रेड अजूनही सुरु आहे आणि ईडीकडून कोणतीही अधिकृत माहिती येताच ही बातमी अपडेट केली जाईल.