इलेक्ट्रिक वाहनांच्या खरेदीवर होणार लाखोंची बचत; बॅटरी असणाऱ्या व्हेइकल्ससाठी महत्वाचा निर्णय

पेट्रोल-डिझलच्या किंमती वाढल्यापासून ग्राहक इलेक्ट्रिक व्हेइकल्सकडे वळू लागले आहेत. परंतु इव्हीच्या किंमती देखील सर्वसामान्य ग्राहकांना परवडतील अशा नाहीत. परंतु आता सरकारनं एक असा निर्णय घेतला आहे ज्यामुळे येत्या काळात बॅटरीवर चालणारी वाहने स्वस्त होतील. भारत सरकारनं लिथियम-आयन बॅटरी पॅकवर लावण्यात येणाऱ्या जीएसटीचा दर कमी केला आहे. आता 18 टक्क्यांच्याऐवजी पाच टक्के जीएसटी लावण्यात येईल. संपूर्ण इव्ही इंडस्ट्रीमध्ये एकसारखा जीएसटी दर 5 टक्के झाला आहे. त्यामुळे भारतात इलेक्ट्रिक वाहनांच्या (Electric car) किंमती कमी होऊ शकतात. कारण इलेक्ट्रिक वाहनांमध्ये 50 टक्के भाग बॅटरीच असते. भारतात सरकारनं दुसऱ्यांदा बॅटरीपॅकवरील जीएसटीच्या दरात अशी कपात केली आहे. 2018 मध्ये देखील सरकारनं जीएसटी 28 टक्क्यांवरून 18 टक्के केली होती.

भारतीय इव्ही बाजाराला चालना

गेल्या काही वर्षांमध्ये भारतीय इव्ही बाजारात चालना मिळाल्याचं दिसत आहे कारण देशभरात मोठ्या प्रमाणावर इव्ही निर्मात्यांनी आपला सेटअप केला आहे. तसेच अलीकडेच अनेक नवीन स्टार्टअप देखील भारतीय बाजारात आले आहेत. अनेकांकडे ऑल-इलेक्ट्रिक प्रोडक्ट पोर्टफोलियो देखील आहे. हे देखील वाचा : 151 रुपयांत रोज 2GB डेटा आणि अनलिमिटेड कॉलिंग; ‘ही’ कंपनीनं देतेय 30 दिवसांचा भन्नाट प्लॅन

सरकारनं घेतला मोठा निर्णय

अर्थ मंत्रालयानं एका विधानातून म्हटलं आहे की, “इलेक्ट्रिक वाहनांमध्ये बॅटरी पॅक असो किंवा नसो, जीएसटी दरात 5 टक्के सूट मिळवण्यास पात्र आहेत. हा निर्णय जीएसटी परिषदेच्या 47व्या बैठकीत घेण्यात आला, ही मिटिंग 28 आणि 29 जून दरम्यान चंदीगढला आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत अर्थ मंत्री निर्मला सीतारमण अध्यक्षस्थानी होत्या.

इलेक्ट्रिक वाहने स्वस्त होण्याची माहिती गडकरींनी आधीच दिली होती

रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितिन गडकरी यांनी काही दिवसांपूर्वी हिंट दिली होती की तंत्रज्ञान आणि हरित इंधनात वेगाने होणाऱ्या प्रगतीमुळे इलेक्ट्रिक ऑटोमोबाईलचा खर्च आपोआप कमी होईल, त्यामुळे त्यांची किंमत पुढील दोन वर्षांमध्ये पेट्रोलवर चालणाऱ्या वाहनांच्या किंमतीइतकी कमी होईल. हे देखील वाचा : बंपर डिस्काउंटसह स्वस्त आणि मस्त वनप्लस; 12GB रॅम असलेल्या दमदार OnePlus Nord 2T चा पहिला सेल

गडकरी यांनी म्हटले होते की, “मला वाटते जास्तीत जास्त दोन वर्षांमध्ये इलेक्ट्रिक स्कूटर, कार, ऑटोरिक्शाच्या च्या किंमती पेट्रोलवर चालणाऱ्या स्कूटर, कार, ऑटोरिक्शा इतक्या असतील. लिथियम-आयन बॅटरीच्या किंमती कमी होत आहेत. आम्ही जिंक-आयन, अ‍ॅल्यूमीनियम-आयन, सोडियम-आयन बॅटरीचं रसायन शास्त्र विकसित करत आहोत.”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here