मोबाइल निर्माता कंपनी Vivo च्या दमदार फ्लॅगशिप X90 सीरीज बद्दल एक मोठी बातमी समोर आली आहे. Vivo X90 series, 3 फेब्रुवारीला जागतिक बाजारात सादर केली जाऊ शकते, अशी माहिती आली आहे. ही सीरिज भारतात येईल की नाही त्यांची माहिती मात्र अद्याप मिळाली नाही. लाँच पूर्वीच या शानदार Vivo X90 series बद्दल टिपस्टर Paras Guglani नं माहिती दिली आहे. त्याने या सीरिजच्या रिटेल बॉक्सची इमेज देखील शेयर केली आहे . याआधी ही सीरीज चीनमध्ये सादर करण्यात आली आहे. सीरीजमध्ये Vivo X90, Vivo X90 Pro आणि Vivo X90 Pro+ 5G सारखे तीन डिवाइस आले होते. जागतिक बाजारात यातील दोनच डिवाइस येतील असं दिसतं आहे.
Vivo X90, Vivo X90 Pro Launch
टिपस्टरनं दिलेल्या माहितीनुसार, Vivo X90 सीरीजचे फोन 27 जानेवारीपासून प्री-ऑर्डरसाठी उपलब्ध होऊ शकतात. तर 3 फेब्रुवारीला ही स्मार्टफोन सीरीज लाँच केली जाऊ शकते. कंपनीनं मात्र या सीरीज बद्दल कोणतीही ऑफिशियल घोषणा केली नाही, परंतु लवकरच विवो ही घोषणा करेल, अशी अपेक्षा आहे.
27 January pre sales! X90 Series Retail boxes
Global, 3 Feb Launch #Vivo pic.twitter.com/cWuliVZ2O4
— Paras Guglani (@passionategeekz) January 19, 2023
चीनमधील Vivo X90 चे स्पेसिफिकेशन्स
विवो एक्स90 स्मार्टफोनमध्ये पंच होल असलेला 6.78 इंचाचा OLED डिस्प्ले देण्यात आला आहे. डिस्प्लेचे रिजोल्यूशन 2800 x 1260 पिक्सल आणि रिफ्रेश रेट 120Hz आहे. तसेच हा फोन MediaTek Dimesnity 9200 प्रोसेसर आणि इमोर्टलिस-जी715 जीपीयूसह सादर करण्यात आला आहे. जोडीला 12GB पर्यंत RAM आणि 512GB पर्यंतची स्टोरेज देण्यात आली आहे. Vivo X90 5G स्मार्टफोन अँड्रॉइड 13 आधारित ओरिजनओएस 3 वर चालतो. हे देखील वाचा: जियोनं बंद केलं परंतु आता Airtel 3 नवीन प्लॅन्समध्ये देतेय Disney+ Hotstar चं सब्सस्क्रिप्शन; पाहा यादी
फोटोग्राफीसाठी फोनमध्ये Zeiss T ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. यातील प्रायमरी कॅमेरा 50MP Sony IMX866 चा सेन्सर आहे जो OIS ला सपोर्ट करतो. सोबत 12MP चा अल्ट्रा-वाइड सेन्सर आणि 12MP चा टेलीफोटो सेन्सर देण्यात आला आहे. सेल्फी व व्हिडीओ कॉलिंगसाठी फोनमध्ये 32MP चा कॅमेरा मिळतो. पावर बॅकअपसाठी 4,810mAh ची बॅटरी मिळते जी 120W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.
चीनमधील Vivo X90 Pro 5G चे स्पेसिफिकेशन्स
Vivo X90 Pro 5G मध्ये पंच होल असलेला 6.78 इंचाचा FHD+ OLED डिस्प्ले देण्यात आला आहे, जो 120Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. हा फोन MediaTek Dimesnity 9200 प्रोसेसर आणि इमोर्टलिस-जी715 जीपीयूसह बाजारात आला आहे. विवो एक्स90 प्रो स्मार्टफोन Android 13 बेस्ड OriginOS 3 वर चालतो. जोडीला 12GB पर्यंत RAM आणि 512GB पर्यंतची स्टोरेज देण्यात आली आहे. हे देखील वाचा: भारीच! 4 हजारांच्या रेंजमध्ये लाँच झाला स्वस्त 4G Smartphone; फीचर्स देखील आहेत कमाल
फोटोग्राफीसाठी फोनमध्ये Zeiss T ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. यातील प्रायमरी कॅमेरा OIS सपोर्ट असलेला 50MP Sony IMX866 सेन्सर आहे. सोबत 50MP Sony IMX663 चा अल्ट्रा-वाइड सेन्सर आणि 12MP Sony IMX663 टेलीफोटो सेन्सर आहे. सेल्फी व व्हिडीओ कॉलिंगसाठी फोनमध्ये 32MP चा कॅमेरा मिळतो. फोनमधील 4,870mAh ची बॅटरी 120W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. तसेच 50W वायरलेस चार्जिंगचा सपोर्ट देण्यात आला आहे.
