जियोनं बंद केलं परंतु आता Airtel 3 नवीन प्लॅन्समध्ये देतेय Disney+ Hotstar चं सब्सस्क्रिप्शन; पाहा यादी

Highlights

  • Airtel आता एकूण 7 प्लॅन्समध्ये Disney+ Hotstar चं सब्सस्क्रिप्शन देत आहे.
  • आधीच्या चार प्लॅन्समध्ये आता कंपनीनं तीन प्लॅन्सची भर टाकली आहे.
  • काही प्लॅन्समध्ये डिज्नी प्लस हॉटस्टारसह अ‍ॅमेझॉन प्राइमचे सब्सस्क्रिप्शन देखील दिलं जात आहे.

जियो आणि एयरटेल या दोन्ही कंपन्या भारतातील टॉपचे टेलिकॉम ऑपरेटर आहेत. त्यामुळे दोन्ही कंपन्यांमध्ये नेहमीच ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी स्पर्धा सुरु असते. गेल्यावर्षी जियोनं आपल्या प्लॅन्ससोबत Disney+ Hotstar चे सब्सस्क्रिप्शन देणं बंद केलंतर यंदा Bharti Airtel आपल्या एकूण 7 प्लॅन्स सोबत Disney+ Hotstar सब्सस्क्रिप्शन देत आहे. एयरटेलनं देखील गेल्यावर्षी हे सब्सस्क्रिप्शन देणं बंद केलं होतं परंतु यंदा कंपनीनं प्लॅन्सची संख्या वाढवली आहे.

2022 च्या अखेरीस एयरटेलनं डिज्नी प्लस हॉटस्टार सब्सस्क्रिप्शन असलेल्या प्लॅन्समध्ये बरेच बदल केले होते. त्यामुळे कंपनीच्या 499 आणि 3359 रुपयांच्या प्रीपेड प्लॅन्समध्ये डिज्नी प्लस हॉटस्टार सब्सस्क्रिप्शन मिळत होतं. त्यानंतर वर्षअखेर त्यात 399 आणि 839 रुपयांच्या प्लॅन्सची भर टाकण्यात आली. आता Airtel नं डिज्नी प्लस हॉटस्टार सब्सस्क्रिप्शन फायदा 719 रुपये, 779 रुपये आणि 999 रुपयांच्या प्रीपेड प्लॅन्समध्ये देण्यास देखील सुरुवात केली आहे. चला जाणून घेऊया या प्लॅन्समधील फायदे. हे देखील वाचा: एकच WhatsApp नंबर 2 फोनवर एकाचवेळी कसा वापरायचा? जाणून घ्या नवी आणि सेफ पद्धत

एयरटेलचे 719 रुपये, 779 रुपये आणि 999 रुपयांचा प्रीपेड प्लॅन्स

719 रुपयांच्या प्रीपेड प्लॅनमध्ये एयरटेल 1.5जीबी डेली डेटा देत आहे. तसेच या प्लॅनमध्ये अनलिमिटेड व्हॉइस कॉलिंग, रोज 100 एसएमएस आणि 84 दिवसांची वैधता मिळते. प्लॅन सोबत कंपनी आता Disney+ Hotstar मोबाइलचं 3 महिन्यांचं सब्सस्क्रिप्शन देत आहे. तसेच एयरटेल एक्सस्ट्रीम अ‍ॅप, RewardsMini सब्सस्क्रिप्शन, अपोलो 24/7 सर्कल, मोफत हॅलो ट्यून, मोफत विंक म्युजिक आणि 100 रुपयांचा फास्टटॅग कॅशबॅक देखील या प्लॅनमध्ये मिळेल.

779 रुपयांच्या प्रीपेड प्लॅनमध्ये 1.5जीबी डेली डेटा दिला जात आहे. त्याचबरोबर अनलिमिटेड कॉलिंग आणि रोज 100 एसएमएस 90 दिवसांच्या व्हॅलिडिटीसह मिळते. युजर्सना या प्लॅनमध्ये डिज्नी प्लस हॉटस्टार मोबाइलचं 3 महिन्यांचं सब्सस्क्रिप्शन मिळत आहे. अपोलो 24/7 सर्कल, मोफत हॅलो ट्यून, मोफत विंक म्युजिक आणि 100 रुपयांचा फास्टटॅग कॅशबॅक देखील या प्लॅनमध्ये मिळेल.

शेवटच्या 999 रुपयांच्या प्रीपेड प्लॅनमध्ये युजर्सना 2.5जीबी डेली डेटा, अनलिमिटेड कॉलिंग, डेली 100 एसएमएस आणि 84 दिवसांची व्हॅलिडिटी मिळते. या प्लॅनमध्ये फक्त डिज्नी प्लस हॉटस्टार मोबाइलचं तीन महिन्याचं सब्सस्क्रिप्शन मिळत नाही तर अ‍ॅमेझॉन प्राइम मेंबरशिप, एयरटेल एक्सस्ट्रीम अ‍ॅप, RewardsMini सब्सस्क्रिप्शन आणि अपोलो 24/7 सर्कलचा फायदा देखील मिळेल. हे देखील वाचा: असा दिसेल आगामी OPPO Reno8 T 5G; ऑफिशियल टीजरमधून समोर आला हटके लूक

एयरटेलच्या डिज्नी प्लस हॉटस्टार सब्सस्क्रिप्शनचा फायदा आता एकूण सात प्रीपेड प्लॅन्समध्ये उपलब्ध झाला आहे. यात 399 रुपये, 499 रुपये, 719 रुपये, 779 रुपये, 839 रुपये, 999 रुपये आणि 3359 रुपयांच्या प्लॅनचा समावेश आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here