Home बातम्या 5,000एमएएच बॅटरी आणि 4 जीबी रॅम सह लॉन्च झाला कमी किंमत असलेला Vivo Y12s स्मार्टफोन

5,000एमएएच बॅटरी आणि 4 जीबी रॅम सह लॉन्च झाला कमी किंमत असलेला Vivo Y12s स्मार्टफोन

91मोबाईल्सने दोन महिन्यांपूर्वी सांगितले होते कि टेक कंपनी वीवो आपल्या ‘वाय सीरीज’ च्या नवीन स्मार्टफोन वर काम करत आहे जो Vivo Y12s नावाने मार्केट मध्ये लॉन्च केला जाईल. काही दिवसांपूर्वी हा फोन गुगल प्ले कंसोल वर पण स्पॉट केला गेला होता, जिथे फोनचे स्पेसिफिकेशन्स समोर आले होते. अनेक लीक्स नंतर वीवोने आपला हा नवीन स्मार्टफोन अधिकृतपणे सादर केला आहे. कंपनीने Vivo Y12s ऑफिशियली लॉन्च केला आहे जो लो बजेट मध्ये आला आहे.

Vivo Y12s कंपनीने सध्या हॉंगकॉंग आणि वियतनाम मध्ये लॉन्च केला गेला आहे जो येत्या काही दिवसांत भारतासह इतर आशियातील बाजारांमध्ये एंट्री घेईल. हॉंगकॉंग मध्ये हा फोन 3 जीबी रॅम वर लॉन्च केला गेला आहे तसेच वियतनामच्या मार्केट मध्ये वीवो वाय12एसने 4 जीबी रॅम सह एंट्री घेतली आहे. हॉंगकॉंग मध्ये वीवो वाय12एस HK$ 1,098 मध्ये लॉन्च केला गेला आहे. हि किंमत भारतीय करंसीनुसार 10,500 रुपयांच्या आसपास आहे. टेक मार्केट मध्ये हा फोन Phantom Black आणि Glacier Blue कलर मध्ये आला आहे.

Vivo Y12s

वीवो वाय12एस वॉटरड्रॉप नॉच डिस्प्ले वर लॉन्च केला गेला आहे, ज्यात ‘यू’ शेप नॉच देण्यात आली आहे. स्क्रीनचे साईड पॅनल्स बेजल लेस आहेत तर खालच्या बाजूला रुंद चिन पार्ट आहे. हा फोन 20:9 आस्पेक्ट रेशियो वर सादर केला गेला आहे जो 720 x 1600 पिक्सल रेज्ल्यूशन असलेल्या 6.51 इंचाच्या एचडी+ आईपीएस एलसीडीला सपोर्ट करतो. Vivo Y12s अँड्रॉइड 10 आधारित फोन आहे जो फनटचओएस 11 सह चालतो. अश्याप्रकारे आक्टाकोर प्रोसेसर सह या फोन मध्ये मीडियाटेक हीलियो पी35 चिपसेट देण्यात आला आहे. हॉंगकॉंग मध्ये लॉन्च झाला वीवो वाय12एस मॉडेल 3 जीबी रॅम सह 32 जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो तसेच वियतनाम मध्ये लॉन्च झालेल्या वीवो वाय12एस मध्ये 4 जीबी रॅम सह 128 जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे.

हे देखील वाचा : 4,500एमएएच बॅटरी आणि 48एमपी क्वॉड कॅमेरा असलेला Vivo Y51 येत आहे भारतात, वेबसाइट वर झाला लिस्ट

फोटोग्राफी सेग्मेंट पाहता Vivo Y12s डुअल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनल वर एफ/2.2 अपर्चर असलेला 13 मेगापिक्सलचा प्राइमरी सेंसर आणि एफ/2.4 अपर्चर असलेला 2 मेगापिक्सलचा सेकेंडरी सेंसर देण्यात आला आहे. तसेच सेल्फीसाठी हा फोन 8 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. Vivo Y12s एक डुअल सिम फोन आहे जो 4जी वोएलटीईला सपोर्ट करतो. 3.5एमएम जॅक आणि अन्य बेसिक कनेक्टिविटी फीचर्स सोबतच सिक्योरिटीसाठी हा फोन साईड माउंटेड फिंगरप्रिंट सेंसरला सपोर्ट करतो तसेच फोन मध्ये फेस अनलॉक फीचर पण देण्यात आला आहे. तसेच पावर बॅकअपसाठी वीवो वाय12एस 5,000एमएएच च्या बॅटरीला सपोर्ट करतो.

वियतनाम मध्ये लॉन्च हुए वीवो वाय12एस मॉडेलची किंमत 42,90,000 Dong सांगण्यात आली आहे जो इंडियन करंसीनुसार 13,500 रुपयांच्या आसपास आहे. भारतीय बाजारात फोनचा कोणता रॅम वेरिएंट लॉन्च केला जाईल, हि माहिती तर अजूनही स्पष्ट झाली नाही पण लेकिन वीवो वाय12एस बद्दल असे म्हणता येईल कि भारतात हा फोन इंटरनेशनल प्राइसच्या तुलनेत आणि पण स्वस्त लॉन्च होईल.