विवो येत्या 20 मे ला होम मार्केट चीनमध्ये Vivo Y200 5G, Vivo Y200t 5G आणि Vivo Y200 GT 5G सारखे तीन डिव्हाईस सादर करेल. काही दिवसांपूर्वी याला घेऊन टिझर आणि इतर माहिती शेअर केली होती. तसेच, आता Vivo Y200 लाँचच्या आधी चीनच्या टेलीकॉम वेबसाईटवर समोर आला आहे. ज्यात किंमत, संपूर्ण स्पेसिफिकेशनची माहिती मिळाली आहे. चला, पुढे लीक माहिती सविस्तर जाणून घेऊया.
Vivo Y200 ची किंमत (चीन टेलीकॉम लिस्टिंग)
- Vivo Y200 चा मॉडेल नंबर चीनच्या टेलीकॉम लिस्टिंगमध्ये V2343A आहे. हा चार स्टोरेज पर्यायामध्ये लिस्ट झाला आहे.
- लिस्टिंगनुसार स्मार्टफोन 8GB रॅम + 128GB स्टोरेज बेस मॉडेलसह येईल त्याचबरोबर 8GB रॅम + 256GB स्टोरेज, 12GB रॅम+ 256GB स्टोरेज आणि 12GB रॅम + 512GB स्टोरेज सामिल होतील.
- चीनच्या टेलीकॉम साईटवर सर्व मॉडेलची किंमत नाही, परंतु 8GB रॅम+256GB व्हेरिएंटला RMB 1,999 म्हणजे जवळपास 23,100 रुपयांचे सांगण्यात आले आहे.
- कलर पर्याय पाहता डिव्हाईस ब्लॉसम, रेड ऑरेंज आणि ब्राईट नाईट सारखे तीन कलरमध्ये लिस्टेड आहे.
Vivo Y200 चे स्पेसिफिकेशन (चीन टेलीकॉम लिस्टिंग)
- डिस्प्ले: Vivo Y200 फोनच्या डिस्प्ले साईजची माहिती नाही, परंतु या मोबाईलमध्ये 2400 x 1080 पिक्सल रिजॉल्यूशन असणारी स्क्रीन मिळू शकते.
- कॅमेरा: कॅमेरा फिचर्सबद्दल चीनच्या टेलीकॉम लिस्टिंगमध्ये माहिती मिळाली आहे की हा फोन ड्युअल रिअर कॅमेरा सेटअपसह ठेवला जाऊ शकतो. यात 50 मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा आणि 2 मेगापिक्सलचा सेकंडरी लेन्स मिळण्याची शक्यता आहे. तसेच, सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी 8 मेगापिक्सलचा कॅमेरा दिला जाऊ शकतो.
- बॅटरी: पावर बॅकअपसाठी स्मार्टफोनमध्ये जास्त वेळ चालणारी 6000mAh बॅटरी मिळू शकते.
- इतर: फिचर्स पाहता स्मार्टफोनमध्ये फिंगरप्रिंट सेन्सर, यूएसबी टाईप सी-पोर्ट, एनएफसी सारखे फिचर्स दिले जाऊ शकतात.
- ओएस: ऑपरेटिंग सिस्टम पाहता Vivo Y200 स्मार्टफोन अँड्रॉईड 14 वर आधारित ठेवला जाईल.
- वजन आणि डायमेंशन: चीनच्या टेलीकॉम लिस्टिंगमध्ये Vivo Y200 फोन 164.36 × 74.75 × 7.61 एमएम आणि 187 ग्रॅमचा आहे.
- प्रोसेसर: फोनची चिपसेटची माहिती चीनच्या टेलीकॉम लिस्टिंगमध्ये नाही, परंतु हा Qualcomm Snapdragon 6 Gen 1 असलेला असू शकतो.














