Vivo Y200 नवीन 5G फोन पुढील महिन्यात असू शकतो लाँच, स्पेसिफिकेशन्स झाले लीक

Highlights

 • Vivo Y200 चं ट्रेंनिंग मॅटेरियल लीक झालं आहे.
 • यात 2D ग्लास रियर पॅनल दिला जाऊ शकतो.
 • फोन 16GB पर्यंत रॅमसह येऊ शकतो.

विवोचा नवीन 5G डिवाइस Vivo Y200 बाजारात पुढील महिन्यात येऊ शकतो. परंतु अद्याप कंपनीकडून लाँचची कोणतीही बातमी समोर आली नाही. टेक आउटलुकनं डिवाइसच्या प्रमुख स्पेसिफिकेशन वरून पडदा उठवला आहे. कारण मोबाइलचं ट्रेंनिंग मॅटेरियल लीक झालं आहे. ज्यात फीचर्ससह अनेक महत्वपूर्ण माहिती आहे. चला, पुढे पोस्टमध्ये माहिती जाणून घेऊया.

Vivo Y200 5G डिजाइन (लीक)

 • Vivo Y200 फोनची डिजाइन पाहता युजर्सना स्मार्टफोनमध्ये 7.69 एमएमचा पातळ 2D ग्लास रियर पॅनल दिला जाऊ शकतो. हा फोन 190 ग्रामचा असण्याची शक्यता आहे.
 • तुम्ही इमेज मध्ये पाहू शकता की डिवाइसच्या बॅक पॅनलवर एक कर्व आयताकृती कॅमेरा माड्यूल देण्यात आला आहे. ज्यात एलईडी फ्लॅश आणि ऑरा लाइटसह दोन सर्कुलर कॅमेरा कट आउट आहेत.
 • एकंदरीत पाहता स्मार्टफोन खूप आकर्षक वाटत आहे.
 • अशा आहे की हा स्मार्टफोन बाजारात कमी बजेट रेंजमध्ये आणला जाईल.

Vivo Y200 चे स्पेसिफिकेशन्स (लीक)

 • डिस्प्ले: लीकनुसार Vivo Y200 फोनमध्ये 6.67 इंचाचा फुल एचडी प्लस अ‍ॅमोलेड अल्ट्रा व्हिजन डिस्प्ले दिला जाऊ शकतो. ह्यावर 120 हर्ट्झ रिफ्रेश रेट आणि 38 कलर टेंपरेचर लेव्हलचा सपोर्ट मिळू शकतो.
 • प्रोसेसर: ट्रेंनिंग मॅटेरियलमध्ये समोर आलेल्या माहितीनुसार Vivo Y200 क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 4 जेन 1 चिपसेटसह लाँच होऊ शकतो.
 • मेमरी: स्मार्टफोनमध्ये युजर्सना स्टोरेजसाठी 8GB रॅम आणि 128 जीबी इंटरनल स्टोरेजची सादर केली जाऊ शकते. इतकंच नव्हे तर ह्यात 8GB एक्सटेंडेड रॅमचा सपोर्ट देखील असेल. ज्याच्या मदतीनं 16GB पर्यंत रॅम वाढवता येईल.
 • कॅमेरा: कॅमेरा फीचर्स बाबत सांगण्यात आलं आहे की Vivo Y200 ड्युअल रियर कॅमेरा सेटअपसह येईल. ज्यात 64 मेगापिक्सलचा OIS सपोर्ट असलेला प्रायमरी कॅमेरा आणि 2 मेगापिक्सलचा बोकेह कॅमेरा दिला जाईल. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी फोनमध्ये 16 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा मिळू शकतो. ह्यात वेडिंग स्टाइल पोट्रेट मोडचं फिचर दिलं जाऊ शकतं.
 • बॅटरी: पावर बॅकअपसाठी स्मार्टफोनमध्ये 4800mAh ची बॅटरी आणि 44वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी असल्याची सांगण्यात आलं आहे.
 • ओएस: Vivo Y200 मोबाइल अँड्रॉइड 13 आधारित Funtouch OS 13 वरआधारित असू शकतो.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here