Categories: बातम्या

Vivo Y200e 5G भारतात लवकर होऊ शकतो लाँच, बीआयएसवर लिस्ट झाला फोन

Highlights
  • Vivo Y200e 5G V2336 मॉडेल नंबरसह दिसला आहे.
  • लिस्टिंगमुळे याची भारतातील लाँच जवळपास कंफर्म झाली आहे.
  • हा फ्लॅट पंच-होल कटआउट डिजाइनमध्ये येऊ शकतो.


विवो लवकरच आपल्या Y-सीरीजमध्ये नवीन स्मार्टफोन्स जोडण्याची तयारी करत आहे. यानुसार Vivo Y200e 5G मोबाइल येण्याची शक्यता आहे. हा पहिला ब्लूटूथ एसआयजी, गीकबेंच आणि गुगल प्ले कंसोल सारखे प्लॅटफॉर्मवर समोर आला आहे. तसेच, आता बीआयएस लिस्टिंग आल्यामुळे याच्या इंडिया लाँचची बातमी जोर धरु लागली आहे. चला, पुढे तुम्हाला सर्टिफिकेशन आणि फोनच्या अन्य गोष्टी सविस्तर सांगतो.

Vivo Y200e 5G बीआयएस लिस्टिंग

  • Vivo Y200e 5G स्मार्टफोन भारतच्या BIS डेटाबेसवर V2336 मॉडेल नंबरसह दिसला आहे.
  • या मॉडेल नंबरसह डिवाइस ब्लूटूथ SIG आणि गीकबेंच डेटाबेसवर समोर आला होता.
  • बीआयएस लिस्टिंगमुळे याची भारतातील लाँच जवळपास कंफर्म झाली आहे.
  • या प्लॅटफॉर्मवर मोबाइलच्या दुसऱ्या कोणत्याही स्पेसिफिकेशनची माहिती मिळाली नाही.

Vivo Y200e 5G ची डिजाइन (गुगल प्ले कंसोल लिस्टिंग)

  • Vivo Y200e 5G काही दिवसांपूर्वी V2327 मॉडेल नंबरसह गुगल प्ले कंसोलवर दिसला होता. लिस्टिंगमध्ये फोन रेंडर मध्ये समोर आला होता.
  • फोन ब्लू कलर ऑप्शनमध्ये दिसला होता यात फ्लॅट डिस्प्ले आणि मोटे बेजेल्स सह पंच-होल कटआउट डिजाइन आहे. तर याची फ्रेम प्लास्टिकपासून बनलेली आहे.
  • कॅमेरा मॉड्यूलच्या मागे डावीकडे आहे, ज्यात ट्रिपल कॅमेरा सेटअप दिसून येत आहे. परंतु हा ऑरा लाइट फिचर नाही.
  • खाली डाव्या साइटवर विवो ब्रँडिंग आहे आणि उजव्या साइटवर पावर बटन आणि वॉल्यूम बटन देण्यात आले आहे.

Vivo Y200 चे स्पेसिफिकेशन्स

नवीन Vivo Y200e ची लाँच डेट लवकरच समोर येऊ शकते. खाली VivoY200 च्या स्पेक्सची माहिती देण्यात आली आहे.

  • डिस्प्ले: Vivo Y200 मध्ये 6.67-इंच FHD+ अ‍ॅमोलेड डिस्प्ले आहे. ह्यावर 2400 ×1080 पिक्सल रिजॉल्यूशन, 120Hz रिफ्रेश रेट आणि 800 निट्स पीक ब्राइटनेसला सपोर्ट मिळतो.
  • प्रोसेसर: फोनमध्ये जबरदस्त परफॉरमेंससाठी क्वॉलकॉमचा स्नॅपड्रॅगन 4 जेन 1 प्रोसेसर लावला आहे.
  • स्टोरेज: डिव्हाइसमध्ये 8GB LPDDR4x रॅम आणि 128GB UFS 2.2 इंटरनल स्टोरेजला सपोर्ट देण्यात आला आहे. ज्यामुळे मायक्रो एसडी कार्ड तुम्ही वाढवू शकता.
  • कॅमेरा: मोबाइलमध्ये LED फ्लॅश आणि Aura LED फिचरसह ड्युअल रिअर कॅमेरा सेटअप आहे. ज्यात f/1.79 अपर्चरसह 64MP चा प्रायमरी आणि f/2.4 अपर्चर असलेला 2MP चा पोर्ट्रेट सेन्सर मिळतो. तसेच, सेल्फीसाठी 16MP चा फ्रंट कॅमेरा आहे.
  • बॅटरी: बॅटरीच्या बाबतीत डिवाइस 44W फास्ट चार्जिंगसह 4,800mAh ची बॅटरीसह आहे.
  • ओएस: लाँचच्या वेळी हा फोन अँड्रॉइड 13 आधारित फनटच ओएस 13 वर आला होता.
Published by
Kamal Kant