6,000 mAh ची बॅटरी, 16GB पर्यंत रॅमची शक्ती असणारा, Vivo Y28 4G जागतिक स्तरावर लाँच, जाणून घ्या काय आहे किंमत

वीवोने आपल्या Y-सीरीज स्मार्टफोनच्या पोर्टफोलिओ प्रोजेक्टचा विस्तार केला आहे. या अंतर्गत Vivo Y28 4G हा नवीन मोबाईल जागतिक मार्केट सिंगापूरमध्ये लाँच करण्यात आला आहे. हा मागील 5G मॉडेलपेक्षा बराच वेगळा आहे. यामध्ये यूजर्स व्हर्चुअल रॅमच्या मदतीने 16GB पर्यंत पॉवर मिळवू शकतात. तसेच यात युजर्संना मीडियाटेक हेलिओ जी85 चिपसेट, 6000mAh बॅटरी, 6.68 इंच डिस्प्ले यासारखे अनेक फिचर्स मिळू शकतील. चला, पुढे आपण याची किंमत आणि सर्व फिचर्स बाबत सविस्तर माहिती जाणून घेऊया.

Vivo Y28 4G चे स्पेसिफिकेशन

  • 6.68 इंचाचा एलसीडी डिस्प्ले
  • हेलिओ जी85 चिपसेट
  • 50MP ड्युअल रिअर कॅमेरा
  • 6,000mAh बॅटरी
  • 44W फास्ट चार्जिंग
  • IP64 रेटिंग
  • अँड्रॉईड 14

डिझाईन: Vivo Y28 4G चे डिझाईन नवीन आहे. त्यात मेटॅलिक हाय ग्लॉस फ्रेम देण्यात आली आहे. त्याचे वजन अंदाजे 199 ग्रॅम आहे. याच्या मागील पॅनलवर एलईडी फ्लॅश सोबत ड्युअल रिअर कॅमेरा उपलब्ध आहे. तसेच पुढे एक पंच होल स्क्रीन आहे.

डिस्प्ले: Vivo Y28 4G मध्ये 1608 × 720 च्या पिक्सेल रिझोल्यूशनसह 6.68 इंचाचा एलसीडी डिस्प्ले, 90 हर्ट्झ रिफ्रेश रेट, 264 पीपीआय पिक्सेल डेंसिटी आणि 1000 निट्स पीक ब्राईटनेस देण्यात आला आहे.

चिपसेट: परफॉर्मन्ससाठी फोनमध्ये मीडियाटेक हेलिओ जी85 चिपसेट देण्यात आला आहे. हे 12nm प्रोसेसवर आधारित आहे. सोबतच यात ग्राफिक्ससाठी माली G52 GPU आहे.

स्टोरेज: हा स्मार्टफोन 8GB एलपीडीडीआर 4 एक्स रॅम, 8GB व्हर्च्युअल रॅम आणि 256GB ईएमएमसी 5.1 मेमरीसह आणला जाणार आहे. तसेच यामध्ये मायक्रोएसडी कार्डद्वारे इंटरनल स्टोरेज 1TB पर्यंत वाढवण्याची सुविधा आहे.

कॅमेरा: फोनच्या रिअर पॅनलमध्ये 50MP मुख्य कॅमेरा आणि 2MP बोकेह सेकंडरी कॅमेरा असा सेटअप आहे. यासोबतच डायनॅमिक लाईटसह एलईडी फ्लॅशही उपलब्ध आहे. त्याच वेळी, सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी 8 मेगापिक्सलचा कॅमेरा आहे.

बॅटरी: Vivo Y28 4G हा मोबाईल 6,000mAh इतक्या मोठ्या बॅटरीने सुसज्ज आहे. ब्रँडचा दावा आहे की, हा मोबाईल 5 मिनिटांच्या चार्जवर 2.6 तास कॉल टाईम, 2.1 तास व्हॉट्सॲप, 2.8 तास फेसबूक आणि 36 मिनिटे PUBG गेमसाठी वेळ देऊ शकतो.

इतर: Vivo Y28 4G मध्ये IP64 डस्ट आणि वॉटर रेझिस्टन्स तंत्रज्ञान आहे. कनेक्टिव्हिटी साठी यात WiFi 5, ब्लूटूथ 5.0, यूएसबी 2.0, जीपीएस, ओटीजी आणि एफएम यासारखे पर्याय मिळतील.

ऑपरेटिंग सिस्टीम: Vivo Y28 4G हा मोबाईल Android 14 आधारित फनटच ओएस 14 सह कार्य करतो.

Vivo Y28 4G ची किंमत

  • Vivo Y28 4G मोबाईल फक्त 8GB RAM + 256GB या एका मेमरी व्हेरिएंट स्टोरेजमध्ये येतो. या मोबाईलची किंमत सिंगापूर मधील किरकोळ विक्रेत्यांच्या वेबसाईटवर $269 सिंगापूर डॉलर्स म्हणजेच अंदाजे 16,400 रुपये इतकी देण्यात आली आहे.
  • हा डिवाईस एगेट ग्रीन आणि ग्लेमिंग ऑरेंज अशा दोन कलरमध्ये मिळेल. याशिवाय तो भारतात येईल की नाही, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
LEAVE A REPLY
Please enter your comment!
Please enter your name here