Vivo Y52t 5G Launch: विवोनं आपल्या ‘वी’ सीरिजमध्ये अलीकडेच एक शानदार स्मार्टफोन सादर केला आहे. कंपनीनं भारतात Vivo V25 स्मार्टफोन 12GB RAM, MediaTek Dimensity 900, 64MP Rear Camera आणि 44W Fast Charging सारख्या शानदार स्पेसिफिकेशन्ससह 28 हजार रुपयांमध्ये सादर केला आहे. आता विवोनं टेक मंचावर आपल्या ‘वाय’ सीरीज अंतगर्त नवीन स्मार्टफोन सादर केला आहे. हा मोबाइल फोन Vivo Y52t 5G नावानं लाँच झाला आहे. विवो वाय52टी स्मार्टफोन 8GB RAM, MediaTek Dimensity 700 SoC, 13MP dual rear camera आणि 5,000mAh Battery सारखे स्पेसिफिकेशन्ससह सध्या चीनी मार्केटमध्ये आला आहे.
Vivo Y52t 5G Specifications
विवो वाय52टी स्मार्टफोन 6.56 इंचाच्या एचडी+ डिस्प्लेसह लाँच झाला आहे. फोनची स्क्रीन आयपीएस एलसीडी पॅनलवर बनली आहे जी 60हर्ट्ज रिफ्रेश रेट चालते. तसेच हा डिस्प्ले पॅनल 600निट्स ब्राइटनेसला सपोर्ट करतो. या फोनची जाडी 8.45 एमएम असून वजन 198 ग्राम आहे. हे देखील वाचा: 50MP सेल्फी कॅमेरा आणि 20GB RAM सह Vivo V25 ची भारतात एंट्री; बॅक पॅनल बदलतो रंग
Vivo Y52t अँड्रॉइड 12 आधारित ओरिजन ओएसवर चालतो. प्रोसेसिंगसाठी या स्मार्टफोनमध्ये 2.2गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीडवर चालणाऱ्या ऑक्टाकोर प्रोसेसरसह 7एनएम फॅब्रिकेशन वर बना मीडियाटेक डिमेनसिटी 700 चिपसेट देण्यात आला आहे.
फोटोग्राफीसाठी हा स्मार्टफोन ड्युअल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. बॅक पॅनलवर 13 मेगापिक्सलच्या प्रायमरी सेन्सरसह 2 मेगापिक्सलची सेकंडरी लेन्स देण्यात आली आहे. तर सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी हा स्मार्टफोन 8 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो.
Vivo Y52t ड्युअल सिम फोन आहे जो 5जी व एलटीई दोन्हीवर चालतो. फोनमध्ये 3.5एमएम जॅक व अन्य कनेक्टिव्हिटी फीचर्स देखील देण्यात आले आहेत. सिक्योरिटीसाठी या स्मार्टफोनमध्ये साइड माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर मिळतो. तर पावर बॅकअपसाठी हा विवो मोबाइल 10वॉट फास्ट चार्जिंग सपोर्टसह 5,000एमएएच बॅटरीला सपोर्ट करतो. हे देखील वाचा: 6GB RAM आणि 50MP Camera असलेला Vivo Y22 भारतात लाँच; किंमत फक्त 14499 रुपये
Vivo Y52t 5G Price
विवो वाय52टी 5जी फोन चीनमध्ये दोन व्हेरिएंट्समध्ये लाँच झाला आहे. मोबाइलच्या बेस व्हेरिएंटमध्ये 8 जीबी रॅमसह 128 जीबी स्टोरेज देण्यात आली आहे ज्याची किंमत 1299 युआन (जवळपास 14,800 रुपये) आहे. तसेच Vivo Y52t 5G स्मार्टफोनचा 8GB RAM व 256GB Storage व्हेरिएंट भारतीय चलनानुसार जवळपास 17,000 रुपयांच्या किंमतीत लाँच झाला आहे. हा फोन Peach, Blue आणि Black कलरमध्ये विकत घेता येईल. कंपनीनं Vivo Y52t 5G स्मार्टफोनच्या भारतीय लाँचबाबत कोणतीही अधिकृत माहिती दिली नाही, परंतु लवकरच हा हँडसेट भारतीयांच्या सेवेत देखील दाखल होईल.
