6GB RAM आणि 50MP Camera असलेला Vivo Y22 भारतात लाँच; किंमत फक्त 14499 रुपये

50 megapixel camera phone vivo y22 launched in india at rs 14499 price know specs sale offer details

चिनी ब्रँड विवोनं अलीकडेच आपल्या बजेट स्मार्टफोन सीरिजमध्ये Vivo Y35 स्मार्टफोन 18,499 रुपयांमध्ये लाँच केला आहे. ज्यात 8GB RAM, Qualcomm Snapdragon 680, 50MP Camara तसेच 44W flash charging 5,000mAh Battery असे स्पेसिफिकेशन्स मिळतात. तसेच आज या वाय सीरीज अंतगर्त कंपनीनं नवीन मोबाइल फोन Vivo Y22 देखील भारतात लाँच केला आहे जो 14,499 रुपयांच्या बेस किंमतीत सेलसाठी उपलब्ध होईल.

Vivo Y22 Specifications

विवो वाय22 स्मार्टफोन 1612 × 720 पिक्सल रिजोल्यूशन असलेल्या 6.55 इंचाच्या एचडी+ डिस्प्लेला सपोर्ट करतो. फोनची स्क्रीन एलसीडी पॅनलवर बनली आहे जी 90हर्ट्ज रिफ्रेश रेटवर चालते. Vivo Y22 चे डायमेंशन 164.3 x 76.1 x 8.38एमएम आणि वजन 180ग्राम आहे. हा IPX4/X5 rated फोन आहे जो याला वॉटरप्रूफ बनवतो. हे देखील वाचा: सर्वात स्वस्त 5G Phone! कडक फीचर्ससह स्वस्त आणि मस्त iQOO Z6 Lite 5G ची भारतात एंट्री

50 megapixel camera phone vivo y22 launched in india at rs 14499 price know specs sale offer details

Vivo Y22 अँड्रॉइड 11 आधारित फनटचओएस 12 वर चालतो. प्रोसेसिंगसाठी या स्मार्टफोनमध्ये ऑक्टाकोर प्रोसेसरसह मीडियाटेक हीलियो एमटी6769 चिपसेट देण्यात आला आहे. हा विवो मोबाइल एक्सटेंडेड रॅम टेक्नॉलॉजीसह येतो ज्यात रॅम 2 जीबी एक्स्ट्रा वाढवता येईल.

50 megapixel camera phone vivo y22 launched in india at rs 14499 price know specs sale offer details

फोटोग्राफीसाठी हा स्मार्टफोन ड्युअल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनलवर एलईडी फ्लॅशसह 50 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर देण्यात आला आहे जो 2 मेगापिक्सल मॅक्रो लेन्ससह मिळून चालतो. अशाप्रकारे सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी Vivo Y22 मोबाइल 8 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. हे देखील वाचा: पुन्हा Xiaomi फोनचा स्फोट! Redmi 6A मध्ये झाला ब्लास्ट, झोपेत महिलेचा मृत्यू

Vivo Y22 ड्युअल सिम फोन आहे जो 4जी एलटीईला सपोर्ट करतो. सिक्योरिटीसाठी फोनच्या साइड पॅनलवर फिंगरप्रिंट सेन्सर इम्बेडेड पावर बटन देण्यात आला आहे. तसेच यात फेस अनलॉक फीचर देखील आहे. अशाप्रकारे पावर बॅकअपसाठी विवो वाय22 18वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी असलेल्या 5,000एमएएच बॅटरीला सपोर्ट करतो.

50 megapixel camera phone vivo y22 launched in india at rs 14499 price know specs sale offer details

Vivo Y22 Price in India

विवो वाय22 दोन व्हेरिएंट्समध्ये लाँच झाला आहे. फोनच्या बेस व्हेरिएंटमध्ये 4 GB RAM + 64 GB storage देण्यात आली आहे ज्याची प्राइस 14,499 रुपये आहे. मोठा Vivo Y22 6 GB RAM + 128 GB storage ला सपोर्ट करतो परंतु याची किंमत मात्र कंपनीनं सांगितली नाही. विवो वाय22 भारतात Starlit Blue, Summer Cyan आणि Metaverse Green कलरमध्ये सेलसाठी उपलब्ध होईल.

LEAVE A REPLY
Please enter your comment!
Please enter your name here