Home बातम्या “वापर जास्त असेल तर पैसे देखील जास्त द्यावे…”; Vodafone Idea च्या सीईओनं दिला दरवाढीचा इशारा

“वापर जास्त असेल तर पैसे देखील जास्त द्यावे…”; Vodafone Idea च्या सीईओनं दिला दरवाढीचा इशारा

Highlights
  • Vodafone Idea च्या CEO नी दिला दरवाढीचा इशारा.
  • अनलिमिटेड बेनिफिट्स प्लॅनवर लागू होऊ शकते दरवाढ.
  • प्रत्येकाला मोबाइल नेटवर्क सर्व्हिस वापरण्यासाठी द्यावे लागणार नाहीत जास्त पैसे.

पुन्हा एकदा मोबाइल डेटा आणि कॉलिंग महाग होणार आहे. Vodafone Idea युजर्ससाठी वाईट बातमी आहे कारण ही हिंट कंपनचे CEO (Chief Executive Officer), Akshaya Moondra यांच्याकडून आली आहे. अलीकडेच त्यांनी अर्निंग कॉलमध्ये टॅरिफ वाढवण्याविषयी आपलं मत व्यक्त केलं. मुंद्रा यांनी टॅरिफ दरवाढ कधी होईल हे सांगितलं नाही. परंतु त्यांनी याबाबत आपलं वैयक्तिक मत व्यक्त केलं.

जास्त डेटा आणि कॉलिंगसाठी द्यावे लागणार जास्त पैसे

Akshaya Moondra यांनी म्हटलं की, टॅरिफ वाढवणं आवश्यक आहे. मुंद्रा यांच्या मते कोणत्याही टेलिकॉम कंपनीसाठी सध्याच्या टॅरिफ दर खर्च वसूल करण्यासाठी पुरेसे नाहीत. त्यांनी म्हटलं की प्रत्येकाला मोबाइल नेटवर्क सेवेचा वापर करण्यासाठी जास्त पैसे देण्याची गरज नाही. परंतु जर युजर जास्त डेटा आणि कॉलिंगचा वापर करत असतील तर त्यांनी कमी वापर करणाऱ्या ग्राहकांपेक्षा जास्त पैसे दिली पाहिजेत. हे देखील वाचा: आयफोनच्या तोडीची OPPO Reno 10 सीरिज येणार बाजारात; लाँचपूर्वीच स्पेसिफिकेशन लीक

यावरून अंदाज लावला जात आहे की लवकरच विआय युजर्ससाठी फोनवर बोलणं आणि इंटरनेटचा वापर करणं महागणार आहे.मुंद्रा यांना वाटतं की टॅरिफची रचना अशी असावी की जास्त वापर करणाऱ्या हाय-एन्ड युजर्सना जास्त पेमेंट करावं लागलं पाहिजे आणि त्यामुळे प्रत्येकाला जास्त पैसे देण्यास मजबूर करायला नको.

वोडाफोन आयडियाला दरवाढीची गरज आहे का?

वोडाफोन आयडियाची परिस्थती पाहता कंपनीला दरवाढीची आवश्यकता आहे कारण टेलिकॉम कंपनीचा ऑपरेशनल कॅश फ्लो खूप वाईट स्थितीत आहेत. कंपनीला आपल्या सरासरी महसूल प्रति ग्राहक (एआरपीयू) च्या आकड्यांमध्ये सुधार करण्यासाठी दरवाढ कारण आवश्यक आहे. आपल्या Q3 FY23 रिपोर्टमध्ये, Vi नं म्हटलं आहे की त्यांचा ARPU 135 रुपयांपर्यंत पोहोचला आहे. तर आधीच्या तिमाहीच्या तुलनेत ARPU मध्ये वाढ झाली आहे (Q2 FY23 मध्ये 131 रुपये), हे आकडे कंपनीला बाजारात टिकू देणार नाहीत. हे देखील वाचा: अ‍ॅमेझॉनवरून विकला जाईल शाओमीचा आतापर्यंतचा सर्वात शक्तिशाली फोन; तारीख ठरली

Vi 99 plan

Vodafone-idea च्या नव्या 99 रुपयांचा प्लॅनमध्ये युजर्सना 28 दिवसांची वॅलिडिटी मिळते. तसेच 99 चा फुल टॉकटाइम आणि 200 एमबी इंटरनेट डेटा देखील दिला जात आहे. परंतु हा प्लॅन कोणत्याही SMS सुविधेविना येतो. म्हणजे जर या प्लॅनचा वापर करणाऱ्या युजर्सना एसएमएस पाठवण्यासाठी चार्ज द्यावा लागेल. तसेच टॉकटाइम संपल्यावर लोकल आणि नॅशनल कॉल्ससाठी 2.5 पैसे प्रति सेकंद शुल्क आकारलं जाईल. तुम्ही हा प्लॅन vodafone-idea च्या वेबसाइट किंवा इतर रिचार्ज अ‍ॅपवरून रिचार्ज करून वापरू शकता.