Home बातम्या Vodafone idea युजर्ससाठी मोठी बातमी, ‘या’ राज्यात बंद होणार आहे 3G सर्विस, जाणून घ्या क्या होईल परिणाम

Vodafone idea युजर्ससाठी मोठी बातमी, ‘या’ राज्यात बंद होणार आहे 3G सर्विस, जाणून घ्या क्या होईल परिणाम

साल 2019 मध्ये Airtel ने भारतीय टेलीकॉम बाजारात मोठे पाऊल उचलत हरियाणा राज्यात आपली 3G सर्विस बंद करण्याची घोषणा केली होती. आता वोडाफोन आयडियाने माहिती दिली आहे कि कंपनी आपली 3जी सेवा दिल्लीत 15 जानेवारी पासून बंद करत आहे. या महिन्याच्या सुरवातीला असे बंगलोर आणि मुंबई मध्ये पण असे झाले होते. इंडियन टेलीकॉम मार्केट मधील आणि कोट्यवधी लोकांना 3G इंटरनेट कनेक्टिविटी तसेच आपली सेवा दिल्यानंतर आता Vi 3G युजर्सना मेसेज पाठवून चालू असलेले 3जी सिम 4जी मध्ये अपग्रेड करण्याचा सल्ला देत आहे.

कशाप्रकारे होईल 3G सिम 4G मध्ये अपग्रेड

बोलले जात आहे कि हि नवीन मोहीम Vi च्या स्पेक्ट्रम री-फार्मिंगचा भाग आहे, ज्या अंतगर्त ऑपरेटर 4जी सर्विससाठी 3जी स्पेक्ट्रमचा वापर करत आहे. विआय (वोडाफोन आयडिया) ग्राहकांना आपले चालू सिम 4जी मध्ये अपग्रेड करण्यासाठी जवळच्या स्टोर्स वर जावे लागेल.

हे देखील वाचा : Xiaomi Mi 10i 5G उद्या होईल भारतात लॉन्च, जाणून कशाप्रकारे बघता येईल लाईव आणि कसे असतील स्पेसिफिकेशन्स

SMS पाठवत आहे Vodafone idea

दिल्ली सर्कल मधील 3G ग्राहकांना कंपनी SMS पाठवून याची माहिती देत आहे. या मेसेज मध्ये लिहिण्यात आले आहे, “प्रिय ग्राहक, कोणत्याही अडचणीविना सेवेचा आनंद घ्या. आपले जुने सिम 15-01-2021 च्या आधी 4जी मध्ये अपग्रेड करा कारण Vi आपले नेटवर्क फक्त 4जी मध्ये अपग्रेड करत आहे. कोणतेही डॉक्यूमेंट न देता मोफत सिम अपग्रेडसाठी आपल्या जवळच्या विआय स्टोर वर जा.”

हे देखील वाचा : 7 जानेवारीला लॉन्च होईल 64 मेगापिक्सल कॅमेरा असलेला पावरफुल स्मार्टफोन Realme V15

2जी वॉयस कॉलिंग राहुल सुरु

विआय आपल्या त्या ग्राहकांना 2जी वॉयस कॉलिंग सर्विस देणे सुरु ठेवणार आहे, ज्यांना आपले सिम 4जी मध्ये अपग्रेड करता येणार नाही. पण त्या युजर्सना डेटा सर्विसचा लाभ घेता येणार नाही. या बदलाचा परिणाम विआय 4जी सिम वापरत असलेल्या ग्राहकांवर पडणार नाही.

अलीकडेच कंपनीने आपल्या युजर्ससाठी खास ऑफर आणली होती जे Vi ऍपचा वापर करत आहेत. एक वोडाफोन युजरनुसार त्याला Vi ऍप ओपन केल्यावर कंपनीच्या 50GB फ्री डेटा ऑफरची माहिती मिळाली. कंपनी 1499 रुपयांच्या वोडाफोन-आयडिया मध्ये एक्सट्रा डेटा ऑफर करत आहे.

सोर्स