जापानी इलेक्ट्रॉनिक्स कंपनी शार्प कॉर्पोरेशनने जागतिक मार्केटमध्ये आपला नवीन स्मार्टफोन Sharp Aquos R9 लाँच केला आहे. हा मोबाईल न फक्त स्पेसिफिकेशनच्या बाबतीत दमदार आहे, उलट याची बिल्ड क्वॉलिटी पण खूप मजबूत आहे. Military Grade सर्टिफाईड या पावरफुल फोनची माहिती तुम्ही पुढे वाचू शकता.
Sharp Aquos R9 स्मार्टफोन MIL-STD-810G*5 रेटिंगसह आला आहे. हा मिलिट्री ग्रेड सर्टिफिकेशन या मोबाईलच्या मजबूतीचे विधान करतो. स्मार्टफोनला IPX5, IPX8 आणि IP6X रेटिंग प्राप्त आहेत, जो याला waterproof, dustproof आणि shockproof बनविते. हा स्मार्टफोन पाणी व धूळीसोबत जमीनीवर पडल्यावर तसेच दगडावर पण सुरक्षित राहिल.
शार्प एक्वोस आर 9 ड्युअल रिअर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. याच्या बॅक पॅनलवर एफ/1.9 अपर्चर असलेला 50.3 मेगापिक्सल OIS कॅमेरा देण्यात आला आहे जो 23mm focal length तथा 84° वाईड एंगलला सपोर्ट करतो. त्याचबरोबर एफ/2.2 अपर्चर असलेला 50.3 मेगापिक्सलची अल्ट्रा वाईड अँगल लेन्स आहे जी 13mm focal length तसेच 122° अल्ट्रा वाईड एंगलला सपोर्ट करते.
सेल्फी काढणे तसेच रिल्स बनविण्यासाठी Sharp Aquos R9 50.3MP front camera ला सपोर्ट करतो. ही एफ/2.2 अपर्चरवर काम करणारी लेन्स आहे जी 84° वाईड एंगलला सपोर्ट करते.
डिस्प्ले : Sharp Aquos R9 स्मार्टफोन 1080 x 2340 पिक्सल रेजोल्यूशन असणाऱ्या 6.5 इंचाच्या फुलएचडी+ प्रो डिस्प्लेला सपोर्ट करतो. ही IGZO OLED LTPO स्क्रीन आहे जी 240Hz रिफ्रेश रेट तसेच 1500nits पिक ब्राईटनेसला सपोर्ट करतो.
प्रोसेसर : हा मोबाईल फोन अँड्रॉईड 14 वर लाँच झाला आहे ज्यात प्रोसेसिंगसाठी क्वॉलकॉमची Snapdragon 7+ Gen 3 चिपसेट देण्यात आली आहे. हा ऑक्टा-कोर प्रोसेसर 2.8 गीगाहर्ट्झ पर्यंतच्या क्लॉक स्पीडवर रन करण्याची क्षमता ठेवतो.
मेमरी : जापानमध्ये हा शार्प स्मार्टफोन 12GB RAM वर लाँच झाला आहे. या फोनमध्ये 8 जीबी वचुर्अल रॅम पण देण्यात आली आहे जो फिजिकल रॅमसह मिळून याला 20 जीबी रॅमची ताकद प्रदान करतात. तसेच फोनमध्ये 256 जीबी स्टोरेज मिळते.
बॅटरी : पावर बॅकअपसाठी Sharp Aquos R9 मोबाइल फोनला 5,000 एमएएच बॅटरीसह करण्यात आले आहे.
इतर: शार्प एक्वोस आर 9 स्मार्टफोनमध्ये NFC, Bluetooth 5.4 आणि WiFi 7 सारखे कनेक्टिव्हिटी फिचर्स पण मिळतात.