Water, dust आणि shock proof आहे हा नवीन स्मार्टफोन, सेल्फीसाठी मिळतो 50.3MP Camera

जापानी इलेक्ट्रॉनिक्स कंपनी शार्प कॉर्पोरेशनने जागतिक मार्केटमध्ये आपला नवीन स्मार्टफोन Sharp Aquos R9 लाँच केला आहे. हा मोबाईल न फक्त स्पेसिफिकेशनच्या बाबतीत दमदार आहे, उलट याची बिल्ड क्वॉलिटी पण खूप मजबूत आहे. Military Grade सर्टिफाईड या पावरफुल फोनची माहिती तुम्ही पुढे वाचू शकता.

दगडासारखी मजबूत बॉडी

Sharp Aquos R9 स्मार्टफोन ​MIL-STD-810G*5 रेटिंगसह आला आहे. हा मिलिट्री ग्रेड सर्टिफिकेशन या मोबाईलच्या मजबूतीचे विधान करतो. स्मार्टफोनला IPX5, IPX8 आणि IP6X रेटिंग प्राप्त आहेत, जो याला waterproof, dustproof आणि shockproof बनविते. हा स्मार्टफोन पाणी व धूळीसोबत जमीनीवर पडल्यावर तसेच दगडावर पण सुरक्षित राहिल.

जबरदस्त कॅमेरा

शार्प एक्वोस आर 9 ड्युअल रिअर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. याच्या बॅक पॅनलवर एफ/1.9 अपर्चर असलेला 50.3 मेगापिक्सल OIS कॅमेरा देण्यात आला आहे जो 23mm focal length तथा 84° वाईड एंगलला सपोर्ट करतो. त्याचबरोबर एफ/2.2 अपर्चर असलेला 50.3 मेगापिक्सलची अल्ट्रा वाईड अँगल लेन्स आहे जी 13mm focal length तसेच 122° अल्ट्रा वाईड एंगलला सपोर्ट करते.

सेल्फी काढणे तसेच रिल्स बनविण्यासाठी Sharp Aquos R9 50.3MP front camera ला सपोर्ट करतो. ही एफ/2.2 अपर्चरवर काम करणारी लेन्स आहे जी 84° वाईड एंगलला सपोर्ट करते.

Sharp Aquos R9 चे स्पेसिफिकेशन

  • 6.5″ 240 हर्ट्झ ओएलईडी स्क्रीन
  • क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 7+ जेन 3
  • 12 जीबी रॅम + 256 जीबी स्टोरेज
  • 5,000 एमएएचची बॅटरी

डिस्प्ले : Sharp Aquos R9 स्मार्टफोन 1080 x 2340 पिक्सल रेजोल्यूशन असणाऱ्या 6.5 इंचाच्या फुलएचडी+ प्रो डिस्प्लेला सपोर्ट करतो. ही IGZO OLED LTPO स्क्रीन आहे जी 240Hz रिफ्रेश रेट तसेच 1500nits पिक ब्राईटनेसला सपोर्ट करतो.

प्रोसेसर : हा मोबाईल फोन अँड्रॉईड 14 वर लाँच झाला आहे ज्यात प्रोसेसिंगसाठी क्वॉलकॉमची Snapdragon 7+ Gen 3 चिपसेट देण्यात आली आहे. हा ऑक्टा-कोर प्रोसेसर 2.8 गीगाहर्ट्झ पर्यंतच्या क्लॉक स्पीडवर रन करण्याची क्षमता ठेवतो.

मेमरी : जापानमध्ये हा शार्प स्मार्टफोन 12GB RAM वर लाँच झाला आहे. या फोनमध्ये 8 जीबी वचुर्अल रॅम पण देण्यात आली आहे जो फिजिकल रॅमसह मिळून याला 20 जीबी रॅमची ताकद प्रदान करतात. तसेच फोनमध्ये 256 जीबी स्टोरेज मिळते.

बॅटरी : पावर बॅकअपसाठी Sharp Aquos R9 मोबाइल फोनला 5,000 एमएएच बॅटरीसह करण्यात आले आहे.

इतर: शार्प एक्वोस आर 9 स्मार्टफोनमध्ये NFC, Bluetooth 5.4 आणि WiFi 7 सारखे कनेक्टिव्हिटी फिचर्स पण मिळतात.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here