Samsung Galaxy A71 कंपनीने ‘A’ सीरीज मध्ये सादर केलेला लेटेस्ट डिवाइस आहे जो पॉकेट फ्रेंडली असण्यासोबतच आपल्या क्लास आणि फीचर्सच्या बाबतीत पण बेस्ट आहे. याची प्रीमियम डिजाइन आणि शानदार कॅमेरा इतर फोन्सच्या तुलनेत वेगळा आहे. राहिला प्रश्न परफॉर्मेंसचा तर त्या साठी फोन मध्ये 8nm फेब्रिकेशन असलेला Qualcomm Snapdragon 730 प्रोसेसर आहे जो खूप शानदार म्हटला जातो. त्याचबरोबर या फोन मध्ये 8GB RAM, 4,500mAh ची मोठी बॅटरी देण्यात आली आहे जी या फोनची उपयोगिता अजून वाढवते. भारतीय बाजारात या फोनची किंमत 32,999 रुपये आहे आणि आपल्या बजेटला साजेशी कामगिरी हा फोन करतो. चला तर मग बोलूया Galaxy A71 च्या त्या वैशिष्ट्यांबद्दल ज्यांच्यामुळे हा फोन एक योग्य निवड ठरतो.
स्लिम डिजाइन आणि प्रीमियम क्वालिटी
Samsung Galaxy A71 एक स्लिम डिजाइन असलेला फोन आहे ज्याची शानदार बिल्ट क्वालिटी तुम्हाला प्रीमियम अनुभव देते. फोन मध्ये 6.7-inch स्क्रीन देण्यात आली आहे. कंपनीने डिजाइनच्या बाबतीत छोट्या छोट्या गोष्टींची खूप काळजी घेतली आहे. स्क्रीनच्या चारही बाजूंना देण्यात आलेले बेजल खूप बारीक आहेत आणि स्क्रीनच्या वर देण्यात आलेला Punch-Hole पण इतर फोन्सच्या तुलनेत खूप छोटा ठेवण्यात आला आहे. या Punch-Hole कटआउट मध्ये तुम्हाला 32-megapixel फ्रंट कॅमेरा मिळेल. Samsung ने एम्बियंट लाइट सेंसर स्क्रीनच्या खाली दिला आहे आणि स्क्रीनच्या वर देण्यात आलेला ईयरपीस स्पीकरचा कटआउट पण खूप छोटा आहे. या कारणांमुळे मोठी स्क्रीन असूनही डिजाइन खूप कॉम्पॅक्ट आहे. फोन मध्ये सिक्योरिटीसाठी ऍडव्हान्स In-Display Fingerprint sensor देण्यात आला आहे.
फ्रंट नंतर जेव्हा तुम्ही मागच्या पॅनल वर येता तेव्हा पण Samsung Galaxy A71 ची प्रीमियमनेस कमी होत नाही. कंपनीने फोन ग्लास फिनिश स्मूद आणि एलिगेंट कर्व्ड ऐज डिजाइन सह सादर केला आहे. फोन फ्रंट आणि बॅक दोन्ही बाजूंनी कर्व आहे. त्यामुळे पकडताना हा चांगली ग्रिप देतो. बॅक पॅनल मध्ये कंपनीने प्रीमियम 3D क्रश पॅटर्नचा वापर केला आहे आणि जेव्हा त्यावर प्रकाश पडतो तेव्हा वेगवेगळे रंग दिसू लागतात. हा फोन Prism Crush Black, Prism Crush Blue आणि Prism Crush Silver सह तीन रंगांत उपलब्ध आहे. तिन्ही कलर खूप आकर्षक आहेत आणि जिथे तुम्ही हा फोन घेऊन जाल लोकांची नजर यावर पडेलच.
डिजाइन आणि डिस्प्ले नंतर कंपनीने याचे वजन आणि जाडी पण अश्याप्रकारे सांभाळली आहे ज्यामुळे कि तुम्हाला कोणतीही अडचण होणार नाही. यात मोठी स्क्रीन आणि 4,500mAh ची बॅटरी असूनही या फोनचे वजन फक्त 179 ग्राम आहे. तर जाडी फक्त 7.7mm आहे. स्लिम आणि कर्व्ड डिजाइनमुळे हा हातांना टोचत नाही. दुसरी बाब अशी कि या वजनामुळे तुम्ही हा फोन हातात ठेवा किंवा खिशात याचे वजन तुम्हाला जाणवणार नाही.
फ्रेम मध्ये उजवीकडे वाल्यूम रॉकर आणि पावर बटण मिळेल तर डावीकडे SIM कार्ड ट्रे आणि microSD कार्ड स्लॉट उपलब्ध आहे. बॉटम पाहता 3.5mm ऑडिओ जॅक, यूएसबी USB Type-C पोर्ट, माइक्रोफोन आणि लाउडस्पीकर देण्यात आला आहे.
शानदार डिस्प्ले आणि दामदार हार्डवेयर
आधी सांगितल्याप्रमाणे Samsung Galaxy A71 मध्ये 6.7-Inch च्या Infinity-O डिजाइन सह येतो. कंपनीने FHD+ रेजल्यूशन असलेल्या Super AMOLED Plus डिस्प्लेचा वापर केला आहे जो True-to Life कलर देतो. अर्थात तुम्हाला वास्तववादी रंगांचा अनुभव मिळेल. तसेच वीडियो बघताना किंवा गेम खेळताना याची छोटी कटआउट तुम्हाला जास्त त्रास देणार नाही. एकंदरीत या सर्व गोष्टी मिळून तुम्हाला बेस्ट एक्सपीरियंस देतात.
शानदार डिजाइन आणि डिस्प्ले नंतर याचे इंटरनल पण खूप खास आहेत आणि तुम्हाला कोणतीही समस्या यामुळे येणार नाही. या फोनला 8nm फेब्रिकेशन असलेल्या Qualcomm Snapdragon 730 प्रोसेसरची ताकद देण्यात आली आहे. तसेच हा 8GB RAM आणि 128GB इंटरनल स्टोरेज सह येतो. त्यामुळे तुम्ही फोन मध्ये गेम खेळा, मल्टिटास्किंग करा किंवा मग अजून काही करा तुम्हाला शानदार परफॉर्मेंस मिळेल. कंपनीने यात Game Booster टेक्नॉलॉजी दिली आहे त्यामुळे तुम्ही दीर्घकाळ गेम खेळू शकता. तसेच फोन मध्ये 4,500mAh ची मोठी बॅटरी देण्यात आली आहे. सामान्य वापर केल्यास हि संपूर्ण एक दिवस चालेल. एकदा पूर्ण चार्ज झाल्यावर हा फोन 24 तास वीडियो प्ले बॅक देऊ शकतो. जर फोनची बॅटरी लो झाली तर तुम्ही 25W Super-Fast Charging ती लगेच चार्ज करू शकता.
कॅमेऱ्यातून बघा जग
सर्वकाही बघितल्यानंतर कॅमेऱ्याबद्दल बोलायचे तर Samsung Galaxy A71 मध्ये आयताकृती क्वाड कॅमेरा सेटअप मिळेल. कॅमेरा सेंसर सोबत सिंगल LED flash देण्यात आला आहे जो L शेप मध्ये देण्यात आला आहे. फोनचा मेन कॅमेरा सेंसर 64-megapixel आहे. तर दुसरा सेंसर 12-megapixel चा आहे आणि हा Ultra wide अँगलला सपोर्ट करतो. त्याचप्रमाणे तिसरा सेंसर 5-megapixel चा आहे जो Macro सेंसर आहे. चौथा सेंसर पण 5-megapixel आणि Depth sensor काम करतो. फोनचा मेन सेंसर तुम्हाला तुम्ही जे बघत आहात ते शानदार डिटेलिंग सह कॅप्चर करू शकता याचा विश्वास देतो जेणेकरून तुम्ही कोणताही क्षण गमावत नाही.
त्याचप्रमाणे Ultra wide सेंसर 123 Degree field-of-view ला सपोर्ट करतो जो तुम्ही डोळ्यांनी बघू पण शकत नाही. याचा अर्थ असा आहे कि याचा कॅमेरा डिटेलिंग न गमावता सर्व गोष्टी एक साथ कॅप्चर करू शकतो ज्या तुम्ही डोळ्यांनी बघू शकत नाही. कदाचित त्याहून चांगले परिणाम मिळतील. तसेच याची अजून खासियत आहे कि यात Night Mode सह Ultra wide-angle देण्यात आला आहे जिथे तुम्ही कमी प्रकाशात पण शानदार फोटोग्राफी करू शकता. किंवा असे म्हणूया कि कमी प्रकाशात जे तुमचे डोळे बघू शकत नाहीत ते पण फोटो मध्ये येऊ शकते. या प्राइस रेंज मध्ये हे फिचर तुम्हाला दुसऱ्या कुठल्याही स्मार्टफोन मध्ये मिळणार नाही. तसेच फोनचा Macro सेंसर छोट्याश्या छोट्या गोष्टी पण स्पष्टपणे फोटोग्राफ करू शकतो. त्याचप्रमाणे या फोनची Depth सेंसिंग प्रो-ग्रेड पोर्ट्रेट शॉट्स मिळतील हे सुनिश्चित करते.
या व्यतिरिक्त याचा Live Focus फीचर पण तुम्हाला खूप इम्प्रेस करेल. Samsung Galaxy A71 मध्ये पोट्रेट फोटोग्राफी मध्ये तुम्ही स्वतः ब्लर इफेक्ट कंट्रोल करू शकता. फोन मध्ये Live Focus फीचर आहे जिथे तुम्ही फ्रेम मध्ये बॅकग्राउंड हवा तितका ब्लर करू शकता. त्याचप्रमाणे कंपनीने यात प्रीमियम फीचर AR Doodle पण सादर केला आहे. हा खूप इंट्रेस्टिंग फीचर आहे ज्यात तुम्ही तुमच्या वीडियो मध्ये यूनिक एनिमेटेड एलिमेंट टाकू शकता. खास बाब अशी आहे कि कंपनीने AR drawings हा ऍडव्हान्स Face Tracking फीचरने सुसज्ज केला आहे त्यामुळे डूडल तुमच्या हालचाली नुसार तुमच्या सोबत फिरतो. तुम्ही जिथे जात तिथे हा फिचर तुम्हाला ट्रॅक करतो.
अंतिम निर्णय
Samsung Galaxy A71 च्या रूपात कंपनीने एक चांगला स्मार्टफोन सादर केला आहे जो तुमच्या बजेटनुसार तुमच्या सर्व गरजा पूर्ण करू शकतो. मीड रेंज मध्ये असूनही हा प्रीमियम फीचर्स आणि यूनिक डिजाइन सह येतो. याची स्लिम डिजाइन लोकांचे लक्ष वेधेल तर Super AMOLED Plus डिस्प्ले तुम्हाला फोन कडे एकटक बघायला लावेल. या सर्व फीचर्स नंतर किंमत पण तुम्हाला निराश करणार नाही हा फोन फक्त 32,999 रुपयांचा आहे आणि या बजेट मध्ये हा फोन खूप स्मार्ट आहे.
