इंडियाच्या ऑनलाइन बाजारात आपले नाव कमवल्यानंतर आता कंपनी भारतातील ऑफलाइन स्मार्टफोन मार्केट मध्ये पण नाव कमवत आहे. कंपनीने ऑफलाइन मार्केट मध्ये एक नवीन रेकॉर्ड बनवला आहे. कंपनीने अधिकृतपणे माहिती दिली आहे कि त्यांनी भारताच्या ऑफलाइन मार्केट मध्ये 10 लाखांपेक्षा जास्त स्मार्टफोन विकण्याचा रेकॉर्ड केला आहे. भारतात ऑनलाइन सेगमेंट मध्ये चांगल्या सेल्स नंतर आता कंपनीचा दावा आहे कि 10 जानेवारीला ऑफलाइन मार्केट मध्ये 10 लाखांपेक्षा जास्त शाओमी स्मार्टफोन यूनिट्सचा सेल झाला आहे.
कंपनीने याची माहिती मंगळवारी अधिकृतपणे दिली आहे. ऑफलाइन मार्केट मध्ये सेल दर वर्षी 70 टक्क्यांपर्यंत वाढला आहे. तसेच फेस्टिव सीजन मध्ये दार महिन्याला ऑफलाइन सेलच्या आकड्यांत 50 टक्के वाढ झाली आहे. शाओमीचा ऑफलाइन टीवी बिजिनेस पण दरवर्षी 400 टक्क्यांनी वाढला आहे.
शाओमी इंडियाचे हेड-ऑफलाइन ऑपरेशन्स सुनील म्हणाले कि शाओमी ने 2017 च्या पहिल्या तिमाहीपासून आपले ऑफलाइन एक्सपान्शन सुरु केले होते आणि यावर्षी आमच्या एनिवर्सरीच्या निमित्ताने काही खास करण्याचा निर्णय घेतला आहे.
चाइनीज कंपनीने गेल्या पाच वर्षात मार्केट मध्ये चांगली ग्रोथ बघितली आहे. भारतात सर्वात जास्त मार्केट शेयर असलेल्या या ब्रँड कडे सध्या 2500 पेक्षा जास्त Mi स्टोर, 75 पेक्षा जास्त Mi होम आणि 20 पेक्षा जास्त Mi स्टूडियो आहेत. इतकेच नव्हे तर कंपनी कडे 7000 पेक्षा जास्त पार्टनर स्टोर आहेत, जे भारतातील अनेक शहरांमध्ये आहेत. कंपनीने पहिला ब्रँड एक्सक्लूसिव रिटेल स्टोर ‘Mi Home’ 10 मे , 2017 ला लॉन्च केला होता आणि त्याने 12 तासाच्या आताच 5 कोटी पेक्षा जास्त रेवन्यू मिळवला होता.
