Home बातम्या Xiaomi Mi 11 Lite 4G लॉन्चच्या आधीच आला समोर, स्पेसिफिकेशन्स आणि डिजाईनचा खुलासा

Xiaomi Mi 11 Lite 4G लॉन्चच्या आधीच आला समोर, स्पेसिफिकेशन्स आणि डिजाईनचा खुलासा

Xiaomi ने गेल्या आठवड्यातच आपल्या होम मार्केट म्हणजे चीन मध्ये नवीन फ्लॅगशिप स्मार्टफोन Xiaomi Mi 11 लॉन्च केला आहे. पावरफुल स्पेसिफिकेशन्स असलेल्या या स्मार्टफोन नंतर बातम्या समोर आल्या होत्या कि कंपनी वर्षाच्या पहिल्या तिमाहीत Xiaomi Mi 11 Pro स्मार्टफोन पण टेक मंचावर सादर करेल. आता या सीरीजच्या अजून एका स्मार्टफोनचे नाव समोर येत आहे जो मार्केट मध्ये Xiaomi Mi 11 Lite नावाने येईल. माहितीनुसार सीरीजचे इतर दोन फोन 5G सपोर्टेड असतील तर मी 11 लाइट 4G फोन असेल.

Xiaomi Mi 11 Lite 4G एका वियतनामी यूट्यूबरने आपल्या चॅनेल वर शेयर केला आहे. या व्हिडीओ मध्ये फोनच्या फोटो सोबतच याच्या स्पेसिफिकेशन्सची पण माहिती देण्यात आली आहे. सर्वप्रथम लुक व डिजाईन पाहता मी 11 लाइट पंच-होल डिस्प्ले वर बनला आहे जो फ्रंट पॅनल वर डावीकडे आहे. बॅक पॅनल वर आयफोन 11 सारखा चौकोनी कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. व्हिडीओ मध्ये हा फोन ब्लू आणि ब्लॅक दोन कलर मध्ये दाखवण्यात आला आहे.

असे असतील स्पेसिफिकेशन्स

Xiaomi Mi 11 Lite चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स पाहता समोर आलेल्या लीकनुसार हा फोन फुलएचडी+ डिस्प्लेला सपोर्ट करेल जो 120हर्ट्ज रिफ्रेश रेट वर चालेल. लीकनुसार हि स्क्रीन आयपीएस एलसीडी पॅनल वर बनू शकते. त्यामुळे फोन मध्ये इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर मिळणार नाही. फिंगरप्रिंट सेंसर साईड पॅनल वर पावर बटन मध्ये दिला जाऊ शकतो.

लीकनुसार शाओमी मी 11 लाइट अँड्रॉइड 11 वर लॉन्च केला जाईल तसेच प्रोसेसिंगसाठी या फोन मध्ये क्वॉलकॉमचा स्नॅपड्रॅगॉन 732जी चिपसेट मिळू शकतो. विशेष म्हणजे मार्केट मध्ये POCO X3 हा एकमात्र असा स्मार्टफोन आहे जो या चिपसेट सह चालतो. लीक मध्ये Xiaomi Mi 11 Lite 6 जीबी रॅम सह येणार असल्याचे सांगण्यात आले आहे त्यासोबतच 128 जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे.

फोटोग्राफी सेग्मेंट पाहता लीकनुसार Xiaomi Mi 11 Lite स्मार्टफोन ट्रिपल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करेल. या सेटअप मध्ये 64 मेगापिक्सलचा प्राइमरी सेंसर असल्याचे सांगण्यात आले आहे. तसेच फोन मध्ये 8 मेगापिक्सलची सेकेंडरी लेंस आणि 5 मेगापिक्सलचा थर्ड सेंसर मिळू शकतो. लीकनुसार वियतनाम मध्ये या फोनची किंमत 20,000 रुपयांच्या आसपास असेल.

Xiaomi Mi 11

शाओमी मी 11 पाहता हा फोन चीन मध्ये तीन वेरिएंट्स मध्ये लॉन्च केला गेला आहे. या फोनचा 8GB + 128GB वेरिएंटसाठी CNY 3,999 (जवळपास 45,000 रुपये), 8GB + 256GB वेरिएंटसाठी CNY 4,299 (जवळपास 48,300 रुपये) आणि 12GB + 256GB वेरिएंटसाठी CNY 4,699 (जवळपास 52,800 रुपये) द्यावे लागतील. फोनची संपूर्ण माहिती व स्पेसिफिकेशन्स जाणून घेण्यासाठी (इथे क्लिक करा)